Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for जुलै, 2009

तो : दोन दिवस झाले आमच्या cubicle पुढे चांद नझर नाही आया. I mean, दोन दिवस झाले तनु नाही दिसली. तशी माझ्याच wing मध्ये बसते, तरीही नाही दिसली. म्हंटल पाहून येवू आज आमच्या चांदला आणि तिच्या cubicle कडे निघालो. पण काय म्हणून जावं तिकडे? एक मन (पांढऱ्या dress मधलं, पांढरे पंख आणि डोक्यावर ती गोल रिंग असते ते) म्हटलं, “अरे कशाला हा उपद्व्याप? ज्या गावाला जायचे नाही त्या वाटेला जायचे कशाला?” पण लगेच दुसरे मन (काळ्या dress मधले, दोन शिंग आणि शेपटी असलेले) म्हणाले,”अबे भ्यायचं काय त्यात? प्यार किया तो डरना क्या? अन काय दिसती यार ती…… एकदम फटाका. चिकणीच आहे यार. जा बिनधास्त. जा आणि बोल तिला, आय लव्ह यू त… त… त… तनु.”.
आता दुसऱ्या मनाच अगदी तंतोतंत पटत नसलं तरी मी पुढे तिच्या cubicle कडे चालतच राहिलो. (दुसऱ्या मनाचे काही शब्द प्रयोग सभ्य वाटत नसले तर माफी असावी, पण काय करणार, इलाज नाही, शेवटी ते दुसरेच (काळ्या dress मधले) मन).
जणू काही एका नवीन प्रदेशात आपण आलो आहोत असं काहीसं वाटत होता. सगळे जणू माझ्याकडेच पाहत होते. हे सगळं कमी की काय म्हणून पुढून माझा project manager (हरी साडू type) आला. मनात मुळीच आनंदाचे भावं नव्हते तरी ओढून ताणून कसे बसे हसू (artificial smile) आणले. त्यानेही तसाच reply दिला. माझे पहिले मन (पांढरे in short) पुन्हा, “अहो राजे, संध्याकाळी client शी call आहे, status update द्यायचाय. आणि आत्ता status काय काय आहे ते माहितच आहे आपल्याला. बोम्बलेल client call च्या वेळेस, आणि Team Lead च्या शिव्या वेगळ्याच. हा पोरींचा नाद सोडा आणि चला back to work.”, मी मात्र हे सगळे अडथळे ignore करत अर्जुनासारखा फक्त पोपटाच्या डोळ्याकडे i mean तनुच्या cubicle कडे लक्ष केंद्रित केले. पुढे चालतच राहिलो. जस-जसा तिचा cubicle जवळ यायला लागला तसे माझे हृदयाचे ठोके वाढू लागले. आणि तिचा cubicle आला. cubicle च्या समोरच बसते ती, त्यामुळे लगेच दिसली. तर जोशीबाई मस्त पैकी iPod मध्ये गाणी ऐकत computer वर काहीतरी काम करत होत्या. मी समोर येताच एकदम माझ्याकडे लक्ष गेले, २ क्षण नजरेला नजर भिडली,  दोघेही एकदम स्थिर होतो. चालू होते ते फ़क़्त माझ्या हृदयाचे ठोके आणि ते हि ८० च्या भरदाव गतीने. जग जणू काही त्या क्षणाला थांबलेच होते.
‘अहो राजे आज इकडे कुठे वाट चुकलात?’, – अनिल ,माझा एक (फ़क़त नावाचा) मित्र मधेच कडमडला.
‘अरे hi, क .. क …काही नाही रे अ …अ …असाच’ असे म्हणत मी (पूर्णपणे गोंधळलेला) कशीबशी वेळ मारून नेली आणि (तिच्या) cubicle मध्ये शिरलो.
अनिल : “धन्य भागं हमारे जो आप हमारे cubicle में पधारे”.
मी : “अरे …. हि हि हि”. 
मग अशाच इकड-तिकडच्या गोष्टी केल्या. काय म्हणतो project? हा कुठे असतो रे? तो कोणत्या project मध्ये आहे? त्याने कंपनी सोडली का? (माझ्या बोलण्यात ‘तो’ च जास्ती होते :)) खर सांगायचं तर ती समोर होती त्यामुळे काय बोलावे काही सुचतच नव्हते. मग जास्ती कोणाला काही संशय यायच्या आत मी तिथून पळ काढला.

ती : आज मजाच झाली. तो माझ्या cubicle कडे आलेला. कसा काय आला कुणास ठावूक.  i mean सहजच काही आलेला वाटत नव्हता. थोडा uncomfortable च वाटत होता.  मी आपली मस्त पैकी गाणी  ऐकत काम करत होते, तो समोर आल्यावर एकदम माझे पण त्याच्याकडे लक्ष गेले. आणि काही क्षण आम्ही एक दुसर्याकडे नुसते पाहत होतो. माझ्या teammate अनिल, चा मित्र होता तो. मी पण मुद्दाम गाणी बंद केली. काय बोलतात पाहू म्हटलं. उगाच timepass च  बोलत होते. म्हणे हा कुठ असतो नि तो कुठं असतो वगेरे वगेरे. पण तो इकड कशाला आला असावा? या अनीलशी तर नक्कीच भेटायला आला नसणार. म्हणजे त्याच्या बोलण्यावून तरी असं वाटत नव्हतं. आणि हा अनिल ना, I tell you, piece च आहे. काय बकवास शायरी मारतो. आम्ही ना त्याला ‘भुरटा शायर’ म्हणतो (तो नसताना :-))
पण main point की तो इकडे आलेला का? मला पाहायला तर……. का त्या अमृताला ….. ‘मिस इंडिया’ च समजते  स्वताला, का त्या प्राजक्ताला, ती ऑफिस ला येते कि fashion show ला तिलाच ठावूक.
whatever …. त्यालाच ठावूक का आलेला ते. मला काय करायचय. मी का बर इतका विचार करतेय?

Advertisements

Read Full Post »

हि गोष्ट आहे ‘तो’ आणि ‘ती’ यांच्या मधली.

तो :
तर आज जोशी  बाई ऑफिस पार्किंग मध्ये दिसल्या. ११.२० वाजलेले, त्यामुळे ऑफिस ला वेळ झालेला (आता ११.२० म्हणजे त्यांना late वाटत असेल …… आम्हाला काय …  not too late). जरा गडबडीतच होत्या. जवळ एक पार्किंग स्लॉट होता म्हणून मी माझी bike reverse  घेत होतो, इतक्यात जोशी बाई झार्र्र्र्र्र्र्र कन आल्या आणि जवळच्याच पार्किंग स्लॉट मध्ये त्यांची activa पार्क केली. गडबडीतच होत्या. पांढरा-लाल सलवार कमीज घातला होता. छान (नेहमीसारख्या) चं दिसत होत्या. तोंडाला लावलेला scarf (अतिरेकी style) काढला. केस जरा विस्कटलेले होते, ते नीट केले. आरशात पाहत मेक-उप check केला, एक cute शी smile दिली (स्वतःलाच) आणि गडबडीत लिफ्ट च्या दिशेने गेल्या.

आता या जोशी बाई कोण? तर या आहेत, ‘तनवी जोशी’. मी जोशी बाई म्हणतोय म्हणून या कोणी पस्तीशी-चाळीशीतल्या ‘बाई’ असतील असा तुमचा समज झाला असेल, पण तसे काही नाही. मीच आपला कधी कधी जोशी बाई म्हणतो. आणि कधी नुसत तनु (लाडात).  ह्म्म्म्म ….. तर पुन्हा गैरसमज करून घेवू नका, मी हे जे काही जोशी बाई वा तनु म्हणतो ना, हे मझं माझ्याशीच. तिच्याशी अजून ‘hi’  म्हणायचं पण झालं नाही.

काही दिवसा पासूनच दिसतेय, project change झाल्यामुळे आमच्या ऑफिसच्या branch ला आली असणार.
दिसायला तशी ठीक-ठाकचं आहे, नाकी-डोळी हि बरी, गहू वर्ण … थोडाफार गोराच,उंची अंदा जे ५.७ (५.५ स्यान्द्ल काढली तर), सडपातळ बांधा….   म्हणजे तशी छानच आहे, म्हणजे गोडच म्हणा ना. dress पण भारी (तले कधी कधी) घालते. modern आणि traditional दोन्हीहि

आणि ….. मी रोहित, ….. नाम तो सुना होगा. 🙂 पुण्यात एका software कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतो.


ती :
शी बाई.आज जरा गडबडच झाली ऑफिसला. काल मामा, मामी आणि कंपनी आलेली .त्यामुळे कालचा दिवस म्हणजे नुसती धम्माल. संध्याकाळी तुळशी बाग, आणि मग लक्षी रोड पालथा घातला पण मामीला पाहिजे ते मिळेल तर शप्पथ. सगळ्या दुकानदारांच्या नाकी नऊ आणले (आणि आमच्या ही). पण ऐकेल ती मामी कसली. नंतर मस्त पैकी सगळे मिळून गंधर्व ला जेवलो, येता-येता मस्त मस्तानी खाल्ली, आणि मग रात्री सगळ्याची जी मैफिल जमली ती संपायला रात्रीचे २.३० वाजले. त्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला. त्यात पुण्याच traffic. त्यामुळे कंपनीत पोहचायला ११.३० वाजले. अक्षरशा अवतार झाला होता माझा.
आज पार्किंग मध्ये ‘तो’ दिसला. bike park करत होता. तर ‘तो’ कोण? well नावं तर नाही माहित त्याच,  पण एक मुलगा आहे.  आज काल दिसतो वरचे वर. माझा project change झाला ना, त्यामुळे मी इकडच्या ऑफिसला shift झाले.  नकळत समोरा-समोर येतो आम्ही कधी-कधी. तसा सो-सो च आहे. i mean इतका पण सो सो नाही,  i mean simple आहे.

by the way, मी तन्वी, ‘तन्वी जोशी’

Read Full Post »

नमस्कार.

आज काल सगळेच लोक ब्लोग लिहित आहेत, म्हणून म्हटलं चला आपण पण प्रयत्न करून पाहावा.
पण लिहायचं काय?
खरच लिहायचं काय?

काहीजन आपले अनुभव लिहितात, काहीजन आपल्या आठवणी, तर काही आपले विचार ….
मी काय बर लिहू?
….. पाहू जमेल तसं काहीतरी लिहित जाईन.

पण लिहीन हे नक्की.
डोक्यात काहीतरी शिजतंय….. पूर्ण शिजून झाल्यावर आपल्यापुढे वाडेन.

– तो

Read Full Post »

Hello world!

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!

Read Full Post »