Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for ऑक्टोबर, 2009

२-४ आठवड्यापूर्वी ‘Start Plus’ वर ‘Lux Perfect Bride’ नावाचा एक कार्यक्रम चालू झाला. सुरवातीला कार्याक्रामध्ये १० मुली आणि ५ मुले सहभागी झाले. ५ मुलांबरोबर त्यांच्या आईहि होत्या. त्यांना एकाच मोठ्या घरामध्ये (महालामध्ये) ठेवण्यात आले. पण मुलांसाठी एक वेगळा विभाग (कुवर महाल) आणि मुली आणि मुलांच्या आई यांच्यासाठी वेगळा विभाग (Mummy महाल) करण्यात आला. दोन्ही group ला हे विभाग ओलांडायची परवानगी नव्हती. फ़क़्त जेव्हा कार्यक्रमवाल्यांकडून संदेश येईल तेव्हा कोणा एकाला किंवा group ला वगेरे दुसर्या विभाग (महाल) मध्ये  जाण्याची परवानगी मिळे.
दोन्ही विभागात अनेक कॅमेरे आहेत, तसेच प्रत्येकाकडे माईक आहे, त्यामुळे सगळ्यांच्या हालचाली, आणि बोलणे लगेच कळते.

मग ज्या कार्यासाठी कार्यक्रम होता, त्यानुसार ज्या मुलांना आणि मुलीना एकमेकात interest होता त्यानुसार त्यांच्या गाठी-भेटी, इशारे वगेरे होवू लागल्या. प्रत्तेकजण एकमेकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होते. एक-मेकांच्या विभागामध्ये जायला सवलत नव्हती म्हणून गेटवर येवून (दोन्ही विभाग जोडणारे गेट), किंवा  गच्चीवर येवून मुले-मुली एकमेकाशी बोलत होते. एक-मेकांना बोलवायच्या पण प्रतेक्काच्या वेगळ्या पद्धती होत्या. काहीजण चित्र-विचित्र आवाज करून आपल्या आवडत्या व्यक्तीला बोलावत होते, तर कोणी सांकेतिक खुणा करून बोलावत होते, तर कोणी ठरवलेली गाणी म्हणून.
मुली आणि मुलांच्या आई एकत्र होत्या त्यामुळे मुली आईना गोड बोलून, काम करून (काम करते असे दाखवून), जेवण बनवून इम्प्रेस करायचा प्रयत्न करत होत्या. आई देखील आपल्या मुलासाठी कोणती मुलगी योग्य हे पाहत होत्या, आणि तसे सल्लेही आपल्या मुलाला देत होत्या.
प्रत्येक आठवड्यात मुलांना काही टास्क(कार्य) दिले जायचे, आणि जो जिंकेन त्याला आपल्या आवडत्या मुलीबरोबर बाहेर ‘date’ वर जाण्याची सवलत दिली जायची. प्रत्येक आठवड्यात प्रेक्षकांच्या SMS नुसार ‘Bride Of the Week’ आणि ‘Mummy Of the Week’ निवडली जाई. ‘Mummy Of the Week’ mummy महालाची त्या आठवड्यासाठी प्रमुख बनत असे.
प्रत्येक आठवड्यातून एका मुलीची ‘बिदायी’ होते. ‘Mummy Of the Week’ सगळ्या मुलीमधून एका मुलीला कार्यकममधून बाहेर काढते (बिदा करते). तेव्हा थोडी राडा-रड पण होते.
मागील आठवड्यापासून ‘Bride Of the Week’ ला एका मुलाला कार्यक्रमामधून बाहेर काढायची संधी दिली गेली होती. म्हणजे आता एका आठवड्यात मुलगी जाईल, आणि दुसर्या आठवड्यात मुलगा जाईल.

मुले आणि मुली वेगवेगळ्या profession ची आहेत, २० ते ३० च्या वयातील आहेत. चांगल्या घरातील आहेत.

वेग-वेगळे टास्क्स, लहान सहान भांडणे, हसी -मजाक, रडगाणे, politics वगेरे म्हणजे थोडक्यात typical reality show असल्याने interesting show वाटतो.
आता मी ‘यंदा कर्तव्य आहे’ असे घोषित केलेलं असल्यामुळे मला तरी interesting वाटतो. 🙂

मला या कार्यक्रमात आवडणाऱ्या दोन मुली म्हणजे : ‘गुरप्रीत’ आणि ‘नंदिता’.

आपण हा कायक्रम पाहत असाल तर आपल्या आवडणाऱ्या मुली/मुले यांची नावे शेअर करावीत.
तसेच काही comments असतील तर तेहि शेअर करावीत.

Advertisements

Read Full Post »

काहीच दिवसात मला लग्नासाठी मुलगी पहायच्या प्रसंगाला तोंड द्यावे लागणार आहे. 🙂
जेव्हा मुलीबरोबर एकटे बोलण्याची संधी मिळेल तेव्हा तिला समजुन घेण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत किंवा कोणते विषय तिच्याशी discuss करावेत, कोणत्या गोष्टीवर तिचे विचार समजुन घ्यावेत या विषयी सध्या मी विचार करत आहे.

मी एक संगणक अभियंता आहे, लग्नासाठी एक नोकरी करणारी मुलगी शोधत आहे, आणि पुढे लग्नानंतर पुणे या ठिकाणी होणार्या पत्नी समवेत राहीन, आशा वेळेस होणार्या पत्नीला जानूंन घेण्यासाठी कोणते प्रश् विचारावेत, कोणते विचार समजुन घ्यावेत या विषयी आपण काही tips वेवु शकाल तर आभारी असेल.

प्रश्न for example,

1) तुज्या आवडी, hobbies?
2) लग्ना नंतर joint family prefer करशील का एकटा नवर्या बरोबर(च) रहायला आवडेल?
3) (पुन्यासार्ख्या ठिकाणी) मुलाकडून स्वताच्या घराची अपेक्षा आहे की सुरवातीला काही दिवस (वर्ष) भाड्याच्या घरी रहायला आवडेल?

असे काही प्रश्न समजले तर नक्कीच मला त्याचा फायदा होईल.

आभारी आहे.

लग्नासाठी उभा असलेला एक ….

Read Full Post »

खरच अस वाटत कधी कधी. पहा ना एका अनोळख्या मुलीबरोबर तुम्ही आयुष्भर एकत्र राहणार, तुमची secrets (बँक balance सुद्धा) शेअर करणार…. पण तीचाशी लग्न करण्यापूर्वी खरच तुम्हाला ती पूर्णपणे माहित असते का हो? हा इथे love marriage वाले थोडे नशिबी ठरतील. पण arrange marriage वाल्यांच काय?

अहो तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून, ओळखीच्नाकडून, वधूवर सूचक मंडळातून (किंवा इकडून-तिकडून कुठून तरी) मुलीचं स्थळ येते. बरोबर एक identity size photo (आपण नशिबी असाल तर post कार्ड size मधला) असतो. आणि एक कुंडली. तुम्ही आपल्या गुरुजींकडून गुण जुळवून पाहता. जे थोडे चीखीत्सक आहेत ते एक नाड वगेरे वगेरे म्हणजे जरा खोलात जाऊन पाहतात. आणि या सगळ्यातून जर का कुंडली जमली तर, तुम्ही मुलीकडील लोकांना  मुली पाहायला येत आहोत म्हणून कळवता. (आता कुंडली पाहणार्यांना खरच त्यावर १००% विश्वास असतो का हा एक प्रश्नच  आहे, कारण कुंडली पाहूनही मग अनेक लोक काही ना काही कारणाने मुलगी नाकारतात. मग जर का मुलगी नंतर कोणत्यातरी कारणाने नाकारायची आहे तर मग कुंडलीच नाटक कशाला).

मग मुलगी पाहायचा (कांदे पोहे) कार्यक्रम ठरतो. मुलगा आपल्या आई-वडील आणि २-४ वयस्कर स्त्री-पुरुष मंडळीच्या बरोबर (झाल्यास एखाद्या मित्राबरोबर) मुलींकडे येतो. आधी इकडच्या-तिकडच्या गप्पा होतात. मग ज्यासाठी मुलगा आतुर असतो ती घटिका येते. मुलगी चहाचा किवा कांद्या पोह्यांचा ट्रे घेवून येते. मुलगा मुलीकडे (डोळे फाडून) बघतो. मुलगी आपली सगळ्यांना चहा/कांदे पोहे देत जेव्हा मुलाची पाळी येते तेव्हा त्याकडे हळूच चहा/पोहे देताना पाहते. मग मुलगी आत जाते. आत तिला आई, बहिणी, मात्रिणी “कसा आहे गं – कसा आहे गं” वगेरे वगेरे विचारतात. पोहे-चहा फस्त केल्यावर मुलाचे वडील मुलीला पुन्हा बाहेर आण्यासाठी मुलीच्या वडिलांना सांगतात. मुलगी पुन्हा बाहेर येते. एका खुर्चीवर बसते. मग मुलाचे वडील किंवा इतर प्रौढ पुरुष मंडळी प्रश्न विचारायला सुरवात करतात. “नाव काय मुली?” (आता ज्या मुळीच नाव पण माहित नाही त्या मुलीला लग्नासाठी पाहायला कोण येईल का?… पण असे प्रश्न प्रश्न विचाराने कोणाकडूनही अपेक्षित नसते… मुलीकडून तर नाहीच नाही :-)),
मुलगी : “संगीता, वारेगे काहीतरी”
मग स्वयंपाक, शिवणकाम, गाणी म्हणणे येते का वगेरे प्रश्न विचारले जातात. मधेच मुलीचे आई-वडील मुलीने केलेले शिवणकाम, भरतकाम वगेरे दाखवतात.

मुलालाही त्याला काही प्रश्न विचारायायाचे असल्यास विचार असे सांगितले जाते. Normally मुले (चार-चौघात) काही प्रश्न  विचारात नाहीत. “तुम्हीच विचार” म्हणतात. अशा वेळेस “अरे लेका लग्न काय बाकीचे करणार आहेत का तू?” असा प्रश्न नक्कीच मुलीच्या मनात येत असेल. त्यात्ल्यातात एखादा धीट असेल तर, “तुमची आवड, hobbies” वगेरे विचारतो.

मग जरा शिकले सवरलेले (forward) लोक असतील तर, त्यातला एखादा, “मुला मुलीला काही बोलायचे असल्यास बोलुदे एकांतात. उगाच आपल्या मोठ्यांमध्ये ऑकवर्ड  होत असेल त्यांना. शेवटी लग्न त्या दोघांनाच करायचे आहे ना… हा हा हा”.

मग त्या दोघांना एखाद्या खोलीत, अथवा apartment असेल तर टेरेसवर थोडा वेळ एकटे बोलण्याची मुभा दिली जाते. मग पहिले १-२ मिनिट पेहेले आप -पेहेले आप करण्यातच जातात. मग शेवटी कोणी तरी पुढाकार करून सुरवात करते (normally मुलंच).

मुलगा : “तुमच्या hobbies काय?”
मुलगी : “वाचन, गाणी ऐकणे, tv पाहणे”
मुलगा : “छान. recently कोणते पुस्तक वाचले?”
मुलगी: “umm… ahhhh… (असेच २-४ सेकंद करून) फार दिवस कोणते पुस्तकच नाही वाचले. (यातून काय समजायचे ते समजून घ्यावे).
मुलगा : ok. लग्ना नंतर joint family आवडेल कि एकटे.
मुलगी : joint family (मनात एकटे)

म्हणजे जी काय १५-२० मिनिटे असतात, त्यात फ़क़्त एकमेकांची वरवरची माहिती मिळते.
तेवढ्यात कोणी तरी बाहेरून विचारते, “hmmmm… झाले का बोलणे?” (आता कोणता मुलगा मुलगी, “अहो कुठे? आत्ता तर सुरवात झाली आहे, अजून अर्धा एक तास लागेल” असे म्हणेल.). मुलगा आपला, “हो हो झालेच” म्हणत बाहेर येतो.

आणि अशा प्रकारे कांद्या पोह्याचा कार्यक्रम संपवून नंतर कळवतो म्हणून मुलाकडचे तिथून निघतात.

घरी त्यांची बोलणी होतात. मुलगी पसंद असेल तर पुन्हा एकदा मुलाच्या बहिणी, काका-काकू वगेरे लोक पुन्हा एकदा मुलगी पाहायला जातात. तेव्हा शक्य असल्यास पुन्हा एकदा मुला-मुलीला बोलायची संधी मिळते.

आणि सगळे काही (मान-पान, देण्या घेण्याची बोलणी) व्यावास्तित्त पार पडली तर दोघांचे लग्न ठरते.

वरील प्रसंगातील मुलगा – मुलगी (आणि त्यांचे घरातले) शिकलेले (शुशिक्षित) असतील तर मुला-मुलीला बाहेर (हॉटेलमध्ये) एकटे भेटायला chance मिळतो. पण हा chance एकदाच…. जास्तीत जास्त दोनदा. आणि तुम्हाला आपला काय तो निर्णय सांगावा लागतो.

पण शेवटी असा प्रश्न पडतो कि, खरच एक-दोन भेटीत तुम्ही तुमचा life partner पर्खू शकता? after all जिच्याबरोबर तुम्ही तुमचे उरलेले आयुष्य पार पाडणार आहे, एकाच घरात (आणि bedroom मध्येहि) राहणार आहे, सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे, ती जोडीदार पारखायला इतकासा वेळ पुरेसा आहे का?

आता अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी पूर्वीच्या लग्नांची वगेरे उदाहरणे दिली जातील. पण पूर्वीचा काळ वेगळा होता, पूर्वी मुलीना काहीच choice वा सवलत नसायची.एक प्रकारच्या धाकातच असायच्या त्या. पण आता तसे नाही, आताच्या मुली स्वतः कमावत्या आहेत, स्वताच्या पायावर उभ्या आहेत.

मग खरच arrange marriage ठरवताना दोघांना एक-मेकांना जाणून घेण्यासाठी दिला गेलेला इतका(सा) वेळ पुरेसा आहे का?

Read Full Post »

१३ ओक्टोम्बरला महारास्ट्र विधानसभेसाठी मतदान आहे. अणि मागील लोकसभेच्या मतदानाला सुट्टी देवुनही मिळालेला अल्प प्रतिसाद पाहून या वेळेस इलेक्शन कमीशन ने १३ ओक्टोम्बरला सुट्टी सोबतच महारास्ट्रमधील सर्व होटेल, चित्रपटगृहे, नाट्यमंदिर, shopping malls वगेरे बंद ठेवायचा निर्णय घेतला आहे. म्हणजे लोक तिथे जान्याऐवजी मतदानाला जातील. वाह काय सुरेख कल्पना आहे.
आता ज्याना मतदानाचे गांभीर्य आहे त्याना सुट्टीची गरजच काय? इतराना काय हो, सिनेमा हॉल्स बंद तर घरी DVD आणून बघतील.

पण खरच या सुट्टीची कही गरज आहे का? आता जे नोकरीसाठी घराबाहेर पडले आहेत ते काय त्या शहरात मतदान करू शकणार नाहीत, अणि ५००-१००० रुपये घालून फ़क्त मतदानालाही आपल्या गावी जाणार नाहीत (भले तुम्ही सुट्टी दया). सुट्टी द्यायाचिच असेल तर फक्त त्यानाच दिली पाहिजे ज्यानी त्या दिवशी मतदान केले असेल. लोक आशा सुट्टीना मस्तपैकी पिकनिक ला जातात.

बाहेर गावी नोकरीला गेलेल्याना कामित कमी पोस्टाने तरी मतदानाचा हक्क द्यावा.
सुट्टीमुले काही फरक पडेल असे काही वाटत नाही.

Read Full Post »

२ ओक्टोम्बर, गांधी जयंती, सरकारी सुट्टीचा दिवस. त्यात या वर्षी वीकएंड ला जोडून आलेली त्यामुले बरयाचशा लोकानी लॉन्ग वीक एंडचा प्लान केला होता. त्यादिवाशिच TV वर शशी थरूर यांचे भाषण ऐकले, ते म्हणाले, गांधी नेहमी म्हणायचे ‘वर्क इज वर्कशिप’, आणि आपण लोक त्यांचीच जयंती सरकारी सुट्टी म्हणुन एन्जॉय करतो.

आहे ना गम्मत.

खरच विचार कर्न्याजोगी गोस्ट आहे.

Read Full Post »

आज काल राज आणि उद्धव (दोघेही ठाकरे) असे का वागतात याचे आश्चर्य वाटते.
दोघेही ‘मराठी’ माणसासाठी भांडतात (म्हणे), मग दोघे वेगळे वेगळे का? एकत्र मिळून भांडा ना इतरांशी. पण ते शक्य नाही. कारण मग श्रेष्ट कोण हे कसे समजणार, भले मग त्यासाठी मराठी लोक विभागले जाओ आणि दोघांच्या भांडणात तिसरा विजयी होवो. आता हे समजायला दोघे काय इतके राजकीय अ-परिपक्व नाहीत हे खरे, पण ego येतो ना अडवा.
दोघांचे थोडे-थोडे म्हणणेही तसे पटते, पण शेवटी दोघे कुठेतरी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी माणसालाच खाईत ढकलत आहेत असे वाटते.

एक मराठी माणूस म्हणून याचा फार त्रास होतो. specially ते हिंदी-इंग्लिश चानेल वाले दोघांच्या भांडणाला अजून मीठ-मसाला लावून सांगतात तेव्हा. ‘राज ने फिर से उगला झहेर’ वगेर वाचून खरच वाईट वाटत.

तसा राज चा आक्रमकपणा impress करतो, लोकांना संघटीत करायला, पक्ष वाढवायला, लोकांवर आपले विचार बिंबवायला, सभा जिंकायला तो नक्कीच कामी येतो. पण पुढे जाऊन राज्य चालवायचे असेल तर, समाजाला दिशा दाखवायची असेल, योग्य निर्णय घ्यायचे असतील तर, उद्धवचा शांतपणा, समंजसपणा पण तितकाच महत्वाचा.

देव दोघांना सूद-बुद्धी देवो, आणि दोघे एकत्र येवून मराठी माणसाच्या विकासासाठ्ठी काही करो हीच श्रींच्या पुढे प्राथना.

Read Full Post »

तो : किती दिवस झाले तिला पाहून. किती दिवस काय राव किती महिने. जाम miss करतोय यार तिला.
तर मी असे का म्हणतोय तर…….. सध्या मी पुण्यात नाहीये. सध्या मी onsite वर आहे. म्हणून तिला miss करतोय. तर हे onsite चे कसे झाले. सांगतो ….. Flashback मध्ये जाऊ. 2-3 महिन्यांपूर्वीची दुपार, म्हणजे 2-3 वाजले असतील.

(तो त्यावेळी स्वतःशीच): प्रत्येक software engineer ला, (specially पहिल्या 2-4 वर्षात) onsite चे जाम craze असते. तसेच मलाही होते, अन ते प्रत्यक्षात अवतरणार हे म्हटल्यावर तर जाम excited होतो. अशीच उडत-उडत बातमी मिळाली होती की onsite ला जायचे chances आहेत. Client पण US चा म्हटल्यावर जाम excited होतो. या सगळ्या excited मध्ये onsite ला जायचे म्हंटल्यावर ‘ती’च्या पासून दूर जावे लागणार याचे भानच राहिले नाही. मी आपला माझ्याच onsite च्या स्वप्नादुनियेत.
अखेर onsite च्या बोलणीसाठी project-manager कडून official बोलणे आले. मी आपला फुल-टू तयारीत होतो. US बद्दलची बरीच माहिती net वरून, US वारी केलेल्या मित्रांकडून (हो फ़क़्त मित्रच) जमवलेली, तिथे आता कोणता season असेल, कोणत्या प्रकारचे कपडे घ्यावेत वगेरे वगेरे. Infact US accent ची तयारीही चालू केली होती.
तर मी माझ्या manager च्या cabin मध्ये गेलो, manager ने हि एक स्मित हास्य देवून मला ग्रीट केले, आणि ज्याची मी आतुरतेने वाट पाहत होतो त्याची news दिली. मी पण अगदी official language मध्ये, thanks, आणि तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ करेन वारेगे बोललो. मग त्यांनी मला काही official papers दिले, वाचता वाचता एका क्षणी माझे डोळेच पांढरे पडले. onsite….. आणि ती हि…. नागपूरला? आईची घो…. मग हे onsite चे प्रकरण माझ्या ध्यानात आले. तर ज्या project वर मी काम करतो, त्या प्रोजेक्ट वर आमच्याच ऑफिस च्या नागपूर ब्रांचची पण एक team काम करते. आणि त्या team साठी आमच्या team मधल्या कोणाची तरी (एका बकर्याची) short-term साठी requirement होती. आणि त्यासाठी मला हे लोक तिथे (onsite) पाठवणार होते. हाय रे मेरी किस्मत……….. 😦
मी सुद्धा एका award winning actor सारखे तोंडावर कोणतेही निराशेचे भाव नदाखवता तोंडावर एक अ-नैसर्गिक हास्य आणत thanks म्हणालो आणि तिथून जड पावलांनी बाहेर आलो.

माझी सगळी स्वप्ने चकना चूर……. कुठे ते US आणि कुठे नागपूर, तुथे US ची थंडी, बर्फ, आणि कुठे नागपूरचा उकाडा, कुठे US च्या गोऱ्या गोऱ्या hot slim पोरी (बाकीची विशेषणे वाचकांनी समजून घ्यावीत) आणि कुठे… जाऊदे…

बाहेर teammates ‘वाट’च पाहत होते, त्यांना या onsite ची बातमी सांगितल्यावर मग काय, आणकीनच जले पे नमक. जाम खेचली सगळ्यांनी माझी. मी बापडा शक्य तेवढे नागपूरचे फायदे त्यांना (आणि स्वतालाही) पटवून देण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो.
शेवटी म्हणतात ना, सरड्याची झेप कुंपणापर्यंत….. असंच काहीतर i guess.

आणि अशा प्रकारे मला ह्या लोकांनी नागपूरला onsite ला पाठवले, आणि आमच्या Love Story चा start व्ह्यायाच्याच आधी ‘The End’ झाला. आता मी जितका तिच्या विषयी विचार करतोय तितका ती थोडाच माझा विचार करत असेल? आपल्या friends बरोबर मस्तपैकी enjoy करत असेल.

ती : किती दिवस झाले ‘तो’ नाही दिसला. कुठे गायब झालाय कुणास ठाऊक. त्याच्या cubicle कडे पण जाऊन आले, तिथेही नसतो. कुणाला विचारू तरी कसे? job change तर नाही केला त्याने? पण नाही……. कारण कंपनीच्या intranet site वर आहे त्याचा data available. मग गेला तरी कुठे? (मुझे ऐसे बीच माझ्दार में छोड के … 😦   )
त्या दिवशीच तर आला होता माझ्या cubicle मध्ये, दोघांची नजरेला नजरही भिडलेली, काही क्षण दोघेही फ़क़्त एकमेकांकडे पाहत होतो, जणू काही एकमेकांना फार काळापासून जाणतो. कुठे तरी click झालेला तो. पण एवढे सगळं होवून लगेचच कुठे गेला मग? आणि जर जायचंच होतं, तर मग आला कशाला होतं इथ.
आता त्याला थोडंच माहित आहे त्याची इथे कुणीतरी आतुरतेने वाट पहातंय…. हा आता मीही पहिल्यांदी तो दिसेनासा झाल्यावर ignore केलं, पण इतके दिवस झाले म्हंटल्यावर ……. i mean …. रोज एक-मेकांना पहायची सवय झाली होती ना, i mean एक-मेकन्च लक्ष नसताना. 🙂 … आणि असे असताना एखाद्याने एकदमच निघून जावे म्हणजे काय …..
जाऊदे ……..मी कशाला काळजी करतेय एवढी….

Read Full Post »