Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for नोव्हेंबर, 2009

लग्नासाठी उभारलेल्या मुलींच्या अनेक अपेक्षा असतात.

मुलगा understanding, down to earth (या दोन गोष्टींचा मला खरच अजून अर्थ नाही कळला) well cultured, well educated, well settled, चांगल्या पगाराची नोकरी असलेला, चांगल्या घरातील, संस्कारी, निर्व्यसनी, स्वतःचा flat असलेला (भले तो पुण्या-मुंबईत का राहत असेना) असावा.

असाच मुलाचा स्वताचा flat असावा या विषयावर माझ्या एका मित्राचा त्याला एका लग्नासाठी आलेल्या मुलीबरोबर झालेला संवाद.

स्थळ : पुण्यातील एक हॉटेल

भेटण्याचे कारण : लग्नासाठी मुला-मुलीची पहिली भेट

(मुला-मुलीचे नाव बदलले आहे :-))

रोहित : हाय

अर्चना : हाय

………. (थोडी फार आवड वगेरे विषयी झाल्यावर)

अर्चना : मला लग्नाआधी तू स्वतःचा २ BHK flat घ्यावास अशी अपेक्षा आहे.

रोहित : (२ सेकंद थांबून) ठीक आहे. मग लग्नानंतर येताना तुही Honda City घेवून ये.

अर्चना : (आशर्यचकित होवून) काय ?

रोहित : अगं हो. लग्नानंतर मी जर तुझ्यासाठी ३० लाखाचा flat घेणार असेल तर तुला कमीत कमी ७-८ लाखाची Honda City नको आणायला माझ्यासाठी.

अर्चना : अरे पण ….

रोहित : मला सांग. तुम्ही कधी घेतला स्वताचा flat?

अर्चना : ४ वर्ष झाली.

रोहित : बर म्हणजे तुझ्या वडलांनी वयाच्या चाळीशी नंतर स्वताच घर घेतलं आणि तू तुझ्या होणार्या नवर्याकडून पंचविशीत स्वताच्या घराची अपेक्षा ठेवतेस?

अर्चना : hmmmmmm I mean

रोहित : अगं हो मानलं काही मुलं घेतात लग्नाआधी स्वताच घर (घरच्यांचं तसं आर्थिक पाठबळ असतं त्यांना), म्हणून काय सगळ्यांकडूनच ठेवायची हि अपेक्षा?

अर्चना : actually आईनेच सांगितलं होतंअसा विचारायला.

………………………..

 

असं होतं बघा. नक्की मुलीच्या अपेक्षा कोणत्या आणि तिच्या आईच्या (घरचांच्या) कोणत्या, हेच समजणं अवघड आहे.

पण मुलाचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी, त्यावरचे संस्कार, इतरांशी त्याची वागणूक वगेरे या महत्वाच्या गोष्टींकडे मुली किती सहजपणे काना-डोळा करतात आणि घर, नोकरी, पैसा वगेरे गोष्टीना अधिक महत्व देतात. याचा अर्थ त्या महत्वाच्या नाहीत असे नाही, पण ज्यावर तुमचा पुढचा संसार उभा असणार आहे त्याकडे जास्ती महत्व द्यावे.

Advertisements

Read Full Post »

मागच्या आठवड्यात नांदेडला जाण्याचा प्रसंग आला. माझा नांदेड म्हणजे जरा ‘outdated’ शहर असा पूर्वी समज होता. पण तिथे पोहचल्यावर तो बराचसा चुकीचा असल्याचे जाणून आले. रोड, flyovers वगेरे एकूणच शहारची परिस्तिथी चांगली आहे. (हा आता ट्राफिकचा थोडा प्रोब्लेम आहे … पण तो काय सगळीकडेच आहे हो). तिथे तेथील लोकांकडून समजले ‘चव्हाण’ साहेब मुख्यमत्री झाल्यापासून बरेच बदल घडून आले.

तिकडे लातूर विषयी असेच आहे, देशमुख आल्यावर बदल झाले. कोकणवासियांकडून देखील राणे विषयी असेच समजले.

आणि पवारांच्या बारामतीचा विकास अक्ख्या महाराष्ट्राला माहित आहे.

 

…… म्हणजे जर एखादा मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या क्षेत्राचा जोरदार विकास करत असेल तर, माझ्यामते ६-६ महिन्यांनी प्रत्येकाला मुख्यमंत्री बनायचा मोका दिला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचा जोरदार विकास होईल.

काय म्हणता ?

Read Full Post »

तुम्ही नेहमी प्रमाणे महिन्यातून एकदा पुण्याहून घरी बसने निघता. ४-५ तासाचा प्रवास असतो. वाटत मस्तपैकी एखादी छान मुलगी जवळ येवून बसावी. आणि काय …. खरच एखादी मस्त मुलगी जवळ येवून बसते. आपण नेहमी प्रमाणे reservation करून बसलो असतो, ती येते, जवळ पासच्या seats पाहते, आणि स्मित हास्य करत म्हणते, “इथे कोणी बसले आहे का?”. अहो काय मजाल आहे “होय” म्हणायची. आणि असलाच कोणी तर उठवू ना आपण त्याला. “नाही नाही, कोणी नाही” म्हणत आपण मोकळ्या seat वरही तिला अजून जागा करून देतो. ती तिची bag वगेरे वर ठेवते. केस वगेरे सावरते. comfortable होते. आपण हे सगळं तिरक्या नजरेने पाहत असतो. 🙂

आता पुढे काय? काहीतरी करून तिच्याशी बोलायला सुरवात करायची. simple म्हणजे बस सुरु झाल्यावर १०-१५ मिनिटांनी, “खिडकी (बसची) उघडी असेल तर चालेल ना” असे विचारायचे. मग ती, “चालेल. no problem” म्हणते. (पुन्हा एक स्मित हास्य). मग तू सांगलीचीच/कोल्हापूरचीच (तुम्ही ज्या गावाला जात असाल त्या प्रमाणे) का गं? विचारून ओळख वाढवयास सुरवात करावी. असे करत करत, आधी कुठल्या कॉलेजला होतीस, गावी कुठे राहतेस, तुला ती (पूजा, अमृता वगेरे कोणतेही common नाव) माहित आहे का गं? पुण्यात कुठे जॉब करतेस, कुठे राहतेस, कोणत्या मेस ला जातेस? रूम पार्टनर कोण आहेत? कोणत्या गावाचे? वीक-एन्डला काय करतेस …करत करत पुन्हा पुण्याला कधी निघणारे ते विचारावे आणि आपणही त्याच वेळी निघावे. आणि मग पुन्हा पुण्यात येताना, जवळ ती नसली तरी, मध्ये गाडी थांबते तिथे तिला भेटावे. अरे what a coincidence वगरे म्हणावे 🙂 तिचा mail -id आधी घ्यावा. मग तिचा positive response वाटत असेल तर लगेच cell number घ्यावा. वीक-एंडचा प्लान विचारावा. मग पुण्यात deccan ला भेटावे, पुढे z-bridge, संबाजी पार्क, लक्ष्मी रोड, सारस बाग, तुळशी बाग करत करत खडकवासला, सिंहगड, लोणावळा पर्यंत मजल मारावी. मग प्रत्येक वीक-एंडला भेटावे, तासंतास mobile वर बोलावे, movies ला  जावे, वगेरे वगेरे करत एका valentine day ला तिला propose करावे, तिचा होकार  मिळाल्यावर, पुढच्या आयुष्याची planning करावी. मग एक दिवस घरी तिच्या विषयी बोलावे. पहिल्यांदा आपल्या इतक्या शांत सरळ पोरग्या कडून ‘हे ‘ ऐकल्यावर थोडा घरच्यांना धक्काच बसेल, कदाचित थोडा विरोधही होईल, तिच्या घरच्यांकडूनहि  होईल, थोडी तनहाईहि सहन करावी लागेल , पण नंतर घरचे काय मुला-मुलीच्या मनाविरुद्ध जाणार आहेत, आणि मग घरचेच पुढाकार घेवून दोघांच ‘शुभ मंगल’ लावून देतील. आणि मग …….

असे सगळे प्लान्स ती शेजारी येवून बसल्यावर चालू होतात. (अजून यातलं काहीही घडलं नसतं, फ़क़्त ती जवळ येवून बसलेली असते) 🙂
पण अजून गाडी चालूच होते तोवर तिची एखादी मत्रिण जवळच बसली असते म्हणून ती seat बदलून तिथे बसते (आणि जेमतेम १०-१५ मिनिट काय ते बोलतात, आणि मस्तपैकी झोपतात), किवा एखादी दुसरी बाई जवळ असते म्हणून ती seat बदलून घेते (जणू काही मी तिला काही करणारच आहे), किवा जवळ बसलेल्या एका पुरुषाला वाटते म्हणून तो तिला जवळ असलेल्या बाई जवळ बसायला सांगतो, आणि नाहीच कोणी उठवलं तर दारा-दूर झोपतात  या पोरी, आणि शेवटचा stop आल्यावरच उठतात.

असेच काही आज काल होत आहे माझ्या बरोबर. एवढी लग्नापर्यंत पाहिलेली स्वप्ने एका क्षणात चकनाचूर होतात.

हे असा होतं बघा.

Read Full Post »

महाराष्ट्राचे दोघेहे आपापल्या क्षेत्रातील दिग्गज. आज मात्र एकमेकांपुढे उभे आहेत.

खरे पाहत वादाचे काही कारणही नाही. कदाचित मुंबई भारताची, आणि त्यावर कोण्या एकाचा हक्क नाही असे काहीतरी सचिनने बोलण्याने बालासाहेबाना खटकले असावे. आता हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा तो मुद्दाम वाद उठाव्ण्यासाठीच, हे सचिनला कळले नसावे का? एवढा ‘आपला’ सचिन तेव्हा ‘no comments’, मला यावर भाष्य नाही करायचे वगेरे म्हणून शांत बसलाही असता, after all ती press conference सचिनच्या कार्कीद्दीला २० वर्षे पूर्ण झाल्याची होती, मग तिथे मुंबई कुणाची हा प्रश्नच उपस्तीत करायचे काय कारण?

दुसरीकडे बाळासाहेब यांना तरी लगेच यावर इतके तिखट भाष्य करायची काय गरज होती. त्यांचे तंतोतंत नाही पण थोडे फार पटते.

ज्या मुंबईला मिळवण्यासाठी१०० हून अधिक लोकांनी प्राणाची आहुती दिली ती काय यासाठी कि उद्या याच महाराष्ट्राचा एक कोहिनूर हिरा मुंबई हि भारताची वगेरे म्हणेल. अहो मुंबई हि भारताचीच आहे हो, कोण नाही म्हंटले आहे, पण ते कुणी, कुठे, कोणाला, कसे विचारले आहे, हे पण पाहायला हवे.

आणि या सगळ्या हिंदी आणि इंग्लिश news channel वाल्यांना विचारावेसे वाटते, मुंबई हि तेव्हाही भारताचीच होती, मग कशासाठी त्या सगळ्या लोकांनी प्राणाची आहुती दिली?

अहो मुंबई तेव्हाही भारताचीच होती, आजही आहे आणि उद्याही राहीनच, पण ती महाराष्ट्राला मिळावी म्हणून त्या सगळ्या लोकांनी प्राणाची आहुती दिली ना.

वाईट फक्त इतकेच वाटते कि, इतिहास पुन्हा गिरवला जातोय. दोन मराठी मानस भांडताहेत आणि बाकीचे मजा बघताहेत.

Read Full Post »