Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for डिसेंबर, 2009

१) जेव्हा कधी एखादे संकट सामोरे येईल तेव्हा हृदयावर हात ठेवा आणि म्हणा, ‘All Izz Well’,  याने संकट टळणार नाही पण संकटाला सामोरे जायचे धेर्य मिळेल. चित्रपटात सांगितल्याप्रमाणे आपले हृदय फार भित्रे असते त्याला सारखे मूर्ख बनवावे लागते. जेव्हा त्याला सगळे काही ठीक आहे असे पटते तेव्हाच ते शांत बसते. नाही तर उगाच उद्याच्या संकटाने आत्ताच ग्रासले जाते. So say, ‘All Izz Well’

२) स्वतःला नेहमी कुठल्या न कुठल्या रेस मध्ये पाळायची सवय लावून घेवू नका, नाही तर आयुष्भर या ना त्या रेस मध्ये धावावे लागेल. आधी चांगल्या शाळेसाठी रेस, मग कॉलेज ची रेस, चांगल्या गुणांची रेस, नोकरीसाठी रेस, प्रियसी साठी मित्रांशी रेस :-), बायकोसाठी समाजातील इतर होतकरू वारांबरोबर रेस, लग्नानंतर मुलांच्या शिक्षणासाठी पुन्हा शाळेची रेस वगेरे वगेरे. त्यापेक्षा या रेस चा विचारच करू नका. जे काम आहे ते मनापासून करा मग आपोआप यश मिळेल. आभ्यास करताना काय वाचतोय त्याच अर्थ समजून घ्या, त्याचा नेहमीच्या आयुष्यात कसा उपयोग करता येईल हे पहा. मग आपोआप concepts समजतील आणि  त्या आरामात परीक्षेत लिहिता येतील. मग आपोआप चांगले गुण, चांगले कॉलेज, चांगली नोकरी मिळेल. आणि मग आपोआप चांगली प्रेयसी आणि मग चांगली बायको हि. 🙂

३) ज्या गोष्टीची आवड आहे तीच गोष्ट तुम्ही चांगली करू शकता. ज्याची आवड नाही ती इतरांच्या दाबावाखातर केल्यास गोष्ट होईल पण तितकी चांगली नाही. आणि ती करताना तुम्हाला आनंदही नाही मिळणार. career निवडताना हे नक्की ध्यानात ठेवा. ज्यांनी career कडे आधीच वाटचाल केली आहे किंवा मध्यावर पोहचले आहे, त्यांनी कमीत कमी ज्या गोष्टीची आवड होती (किंवा अजून आहे) ती सुट्टीच्या दिवशी तरी नक्कीच करावी.

४) संकटे हि येतात ती आपल्याकडून काहीतरी चांगले करून घेण्यासाठी. अनेक ‘invension’ चा शोध कुठली ना कुठली समस्या, संकट आल्यामुळेच झाला आहे. जसे चित्रपटात शॉक देण्यासाठीचे उपकरण किंवा virus inverter . त्यामुळे संकटाना भिणे सोडा आणि त्यांचे दोन्ही हातानी स्वागत करा.

५) आयुष्यात बिकट प्रसंग येतील. काही वेळा टोकाचा निर्णयही मनात येईल (जसे आत्महत्या), तेव्हा तुमच्या जवळच्या लोकांवर याचा काय परिणाम होईल याचा विचार करा. यासाठी तुमच्या जवळच्या लोकांचा (आई-वडील, बायको) एक फोटो जवळ, पाकिटात ठेवा. असा काही विचार आला तर त्याकडे फ़क़्त बघा, बस..

६) ‘आज’ मध्ये जगा. उगाच उद्याचा विचार, भविष्यकाळ , उद्याच्या समस्या, उद्याचे जीवन, घराची परिस्तिथी यांचा अति विचार करून आजचे हे सुंदर ‘क्षण’ वाया घालवू नका. आयुष्यात आनंदी राहायचा उत्तम क्षण म्हणजे आत्ता ‘हा’ क्षण.

७) स्वतःला किंवा दुसऱ्याला त्याची शैक्षणिक पात्रता, पदवी, त्याचे कॉलेज, परीक्षेतील त्याचे गुण याने न पारखता त्याचे एखाद्या गोष्टीविषयी असलेले ज्ञान,  त्या विषयी असणारी तळमळ, ती गोष्टी करण्यासाठी असणारी इच्चाशक्ती, मेहनत, विचार करायची – काम करायची पद्धत, वेगळेपण या गोष्टी सुद्धा पहा. जगात अनेक मोठे मोठे लोक कोणतीही शैक्षणिक पात्रता नसतानाही मोठे झाले हे विसरू नका.

८) एखादी गोष्ट मिळण्यासाठी देवाला त्यासाठी ‘लाच’ देण्यापेक्षा त्याने दिलेल्या या सुंदर आयुष्याबद्दल त्याचे आभार माना.

९) एखादी गोष्ट कोणी मोठा माणूस सांगतोय म्हणून त्याला हं ला हं म्हणण्यापेक्षा जर तुमचे वेगळे विचार असतील तर ते जरूर मांडा.

१०) कॉलेज च्या जीवनाचा पुरेपूर आनंद लुटा, मार्क्स वगेरेच्या भानगडीत हे सुंदर दिवस वाया जाऊन देवू नका (म्हणजे आभास करू नका असे नाही :-)). पुरेपूर या दिवसांचा आनंद घ्या, नाहीतर नंतर पचतावे लागेल.

११)   एखादी मुलगी आवडत असेल तर तिचा बाप, भाऊ कोण आहे, काय करतात याचा फार विचार न करता तिला लगेच प्रोपोज करून टाका. 🙂

यातील अनेक गोष्टी नवीन नाहीत, पण त्या ज्या रीतीने चित्रपटात मांडल्या आहेत त्यामुळे कराव्याशा नक्कीच वाटतात.
सो ‘All Izz Well’

Advertisements

Read Full Post »

तो:  पुण्यात आल्यापासून दोन-तीन दिवस झाले, ‘ती’ चार-पाचदा समोरही आली, पण माझ्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले तिने. चुकून एखाद्या वेळेस समजू शकतो, पण पाच-सहा वेळा तसेच.  एक-दोनदा पाहिलेही तिने माझ्याकडे, पण त्या पाहण्यात एक वेगळाच भाव होता.  माझ्यासाठी तो नवीनच होता. ते पूर्वीसारखे पाहणे तर नक्कीच नव्हते.  कुठे तरी माझ्यावर जाम रागावल्याचा किवा मला खिजावायाचा भाव वाटत होता तो.  पण असे का? मी इथे २-३ महिने नव्हतो,  तिला कोणी दुसरा तरी एखादा भेटला नसेल? पण जरी भेटला असेल तरी मला हे ‘killer look’ का?  माझे काय चुकले आहे यात? काही समजेना.

ती:  US चे भूत उतरले वाटते साहेबांचे.  आज-काल पूर्वीसारखाच वाटतो,  i mean समोर आल्यावर नकळत माझ्याकडे पाहतो, अगदी पूर्वीसारखाच. पण आता मी नाही त्याला भिक घालणार. US वरून आल्या-आल्या कसा तोरा होता?  मी बिलकुल नाही दिले त्याच्याकडे लक्ष.  infact एक दोनदा तर अगदी खुन्नस देवूनच पहिले त्याच्याकडे.  अगदीच पडलेला त्याचा चेहरा तेव्हा.  पण पडूदेकि, मला काय त्याचे? आधी नाही केला याचा विचार? अशा लोकांशी असेच वागायला पाहिजे, मग येतात यांची डोकी ठीकाण्यावर.

Read Full Post »

अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी चित्रपटसृष्टी मधले दोन दिग्गज अभिनेते. दोघांचीही अभिनयाची वेगळी पद्धत, म्हणजे जरी दोघांचीही विनोदावर जबरदस्त पकड असली  तरी
दोघांचीही विनोद करण्याची शैली मात्र वेगळी. हा तसे काही गंभीर चित्रपट केले दोघांनी (खास करून आशिक सराफ यांनी) पण ते तसे नगण्यच. दोघेही आठवतात ते त्यांची विनोदी भूमिकेसाठीच. आजही दोघांना दूरसंच वाहिनीवर पाहायला छान वाटते. दोघेहे मेहनती, हुशार कलाकार. पण दोघांच्याही कलेच, त्यांच्यात असलेल्या उच्च दर्जाच्या कलाकारीचे चीज झाले असे पाहायला दिसत नाही.  दोघे जरी हुशार (talented) अभिनेते असले तरी, जशा चित्रपटांची त्यांना आवशकता होती असे त्यांना मिळाले असे नाही जाणवत. त्यांच्या अभिनयाच्या तोडीचे चित्रपट हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच. एकाच प्रकारचे विनोदी चित्रपट, तेच तेच विनोद, तेच विषय, तोच चित्रपटाचा सुमार दर्जा, यांमुळे नंतर नंतर लोक त्यांच्या चित्रपटना कंटाळू लागले. तेच विषय किंवा तेच विनोद त्यांनी टाळायला पाहिजे होते असं वाटत. पण कदाचित तेव्हा त्यांच्याकडे फारसे पर्यायही नव्हते. मराठी चित्रपट सृष्टी तेव्हा वाईट काळातून जात होती.

आज मात्र दिवस पालटले आहेत. मराठी सृष्टीला सोन्यासारखे चांगले असे नाही म्हणता येणार, पण (नुसते) चांगले दिवस आले आहेत असे नक्कीच म्हणता येईल. वेग-वेगळे विषय, धाडसी आणि हुशार दिग्दर्शक, मोठे banners (काही हिंदी चित्रपट सृष्टीतलेही ), उच्च तंत्रज्ञ आणि आपले हुशार मराठी कलाकार यामुळे मराठी चित्रपट वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात (अनेक विदेशीही) आणि box office वरही आपली छाप सोडत आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतले या काळाचे ‘भरत जाधव’ आणि ‘मकरंद अनासपुरे’ हे दोन आघाडीचे कलाकार. दोघात आणि ‘अशोक सराफ’, ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांत बरेच साम्य दिसते. दोघांनीही स्वतःच्या मेहनतीने स्वतःचे नावं कमावले, आपली एक image बनवली, चाहतावर्ग बनवला, दोघांचीही विनोदी शैली आणि विनोदावर जबरदस्त पक्कड, दोघांनीही एकत्र कामे केली. दोघांचे पहिले काही चित्रपट चांगले चाललेही.

पण पुन्हा इतिहास गिरवला जातोय कि काय असे वाटते. कुठेतरी ते दोघे ‘अशोक सराफ’, ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ यांच्या वाटेवर चालले आहेत असे वाटते. दोघात भरपूर talent आहे पण पुन्हा तेच तेच विषय, तेच-तेच विनोद याची पुनरावृत्ती होतेय. एखादी गोष्ट एकदा बरी वाटते, दुसऱ्यांदा बरी वाटते, पण सारखी तीच-तीच होवू लागली तर मात्र कंटाळा येतो.

दोघांनीही चित्रपट निवडताना तेच विषय आणि विनोद याचा मोह आवरला पाहिजे. बर आता पूर्वीसारखी स्थिती नाही, चांगले विषय येत आहेत, चांगले दिग्दर्शक आहेत, फक्त चांगला विषय निवडण्याची खबरदारी घ्यायला हवी.

कारण कुठेतरी प्रत्तेक मराठी चित्रपटप्रेमीला आजच्या ‘भरत जाधव’ आणि ‘मकरंद अनासपुरे’ यांना कालचे ‘अशोक सराफ’ आणि ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ झालेले नाही पाहायचे. म्हणजे त्यांच्या सारखे उत्कृस्त कलाकार झालेले नक्कीच आवडेल पण तेच रटाळ मराठी विनोदी चित्रपट किंवा हिंदी चित्रपटातले ‘नोकर’ नकोत.

Read Full Post »

रविवारी संध्याकाळी सकाळने आयोजित केलेल्या पुणे आणि पुनेबाहेरील वेगवेगळ्या flats, row houses, open plots च्या प्रदर्शनाला भेट देवून आलो. सध्या घरांचे दर गगनाला भिडलेले आहेत असे सगळ्यांकडून ऐकले होते, पण ते खरच गगनाला भिडलेले आहेत याची तिथे प्रचीती आली. आजच्या बिल्डर लोकांनी १ BHK घरे बनवायचीच नाहीत असे काही ठरवले आहे कि काय असा सारखा प्रश्न प्रत्येक stall जवळ गेल्यावर येत होता. सगळीकडे २ BHK, ३ BHK, row houses वगेरे होते. चुकूनच एखाद्याकडे १ BHK असायचा, पण तोही विकला गेलेला असायचा. पुण्यातील लोक खरच इतकी श्रीमंत झाली कि बाहेरच्या लोकांनी येवून इतके दर वाढवले, कि हा नुसता दर वाढीचा फुगा आहे? काहीच कळत नव्हते.

काहीच दिवसांपूर्वी ‘दुबई’ मध्ये काय झाले हे सर्वांनी पहिले आहे. पण तरीही पुण्यात काही फरक नाही. इथल्या बिल्डर लोकांनी यातून काही धडा घेतला नाही कि हे लोक खरच बातम्या पाहत नाही कि वर्तमानपत्र वाचत नाही?

परवाच दुबईच्या संदर्भात एक लेख वाचला त्यात मुंबई आणि पुणे हे ‘next Dubai’ असू शकतील असे सांगण्यात आले होते. खरच एवढे दर वाढायचे कारणच काय? ५ वर्षात तिप्पट-चौपट दर वाढावेत? मान्य आहे कुठेतरी IT च्या लोकांचे मोठ-मोठे पगार याला कारणीभूत आहेत, पण असे किती IT चे लोक आहेत पुण्यात? आणि इतके दर IT च्या लोकांनाही आता परवडेनासे झालेत. (मी देखील IT मधलाच एक आहे).

बर दुबई आणि पुण्यातील एक फरक म्हणजे तिथे लोक investment म्हणून घर घेतात, पण इथे लोक स्वतःला राहायला म्हणून घर घेतात. investment म्हणून सुद्धा घेणारे आहेत पण त्यांची नक्की संख्या किती हे नाही ठावूक.

आणखीन एक. २०११ एप्रिल नंतर income tax चे नियम बदलणार आहेत. आणि त्यानुसार सध्या जे housing loan चे premium ८० C मध्ये दाखवून tax वाचवता येतो तसे करता येणार नाही. आणखीन बरेचसे नियम बदलणार आहेत.(मी कुठे चुकत असल्यास कृपया प्रतिक्रिया देवून सांगावे). त्यामुळे जे लोक investment म्हणून घर घेतात, किंवा tax वाचवायला घरे घेतात ती २०११ पासून नवीन घर घेण्याच्या फंदात पडणार नाहीत. त्यामुळे काही लोकांच्या मते घराची मागणी कमी होवून दर कमी यायची शक्यता आहे.

हे सगळे विचार डोक्यात घेवून फ़क़्त काय दर आहेत हेच पाहायला मी प्रदर्शनाला गेलो होतो. तिथे बरीच गर्दी होती. अगदी  तुडुंब गर्दी, इतकी कि पार्किंग ची जागा कमी पडल्याने दरवाजा बंद करावा लागला. अनेक stall होते. अगदी ११-१२ लाखापासून दीड-दोन करोड पर्यंतची घरे होती. ११-१२ लाख म्हंटल्यावर अगदी उत्साही झाला असशीला ना, काही गरज नाही. हे flats म्हणजे पुण्यापासून अगदी दीड दोन तास लांब अशा जागी. उदाहरणार्थ तळेगाव.

इतके लोक खरच घरे घेण्यासाठीच आली होती कि आणि कशासाठी हा प्रश्नच पडला, कारण कॉलेजची मुले-मुली किंवा नुकतेच पुण्यात जॉबसाठी आलेली मुले-मुली देखील भरपूर प्रमाणात होती. छान छान मुली अनेक stall वर त्यांच्या project ची माहित सांगायला होत्या. (त्यांच्याकडे पाहून का होईना इथवर आल्याचे सार्थक झाल्याचे वाटत होते :-)).

वाकडला २५ ती ३० लाखाला २ BHK , बाणेरला ३०- ४० पासून अगदी ६० लाखापर्यंत २ BHK होते. आंबेगाव, कोंढवा ला २२-२३ पर्यंत २ BHK , सिंहगड रोड ला ३०-४०-४५ लाखापर्यंत २ BHK . कर्वे रोड, बावधन, हडपसर या ठिकाणाचे दर माहित करूनही घेण्याचे भानगडीत मी पडलो नाही.

आता recession – recession येवूनही गेले तरी या बिल्डर लोकांनी काही दर कमी केले नाहीत. त्यामुळे आत्ताचे हे गगनचुंबी घरांचे दर पुढे हा फुगा फुटला तर कमी होतील ?(असे झाले तर आता किंवा आधी घर घेतलेल्या लोकांचे काय होईल?), कि असेच राहतील? कि असे काही झालेच नाही तर अजुनची वाढतील?

सध्याच्या महागाईशी मुकाबला करण्यासाठी Reserve Bank ने interest rates वाध्वयाचीही सूचना केल्याचे ऐकले.

हे सगळे पाहून खरच सामान्य पुणेकर यापुढे त्याच ‘स्वतःच’ घर घेवू शकेल?

Read Full Post »

तो : “I am back…… finally”.  होय नागपूरची onsite ची ट्रीप संपवून मी परत पुन्हा आपल्या पुण्यात आलो आहे. जाम बोर झालं राव तिथे. म्हणजे तसं शहर, लोक चांगली आहेत, पण कोणी ओळखीच नाही, आणि आपला स्वभाव तसा बोल-बच्चन सारखा नाही. २-४ महिने कसे घालवले माझ मलाच ठाऊक. जाऊदे कशाला उगाच त्या जुन्या आठवणी. आता मी पुण्यात आलोय. शुक्रवारी नाग्प्र्वरून सरळ घरी गेलो. मग रविवारी रात्री पुण्यात आलो. सगळ्या मित्रांना भेटलो, आणि सोमवारी सकाळी ऑफिसला. सहसा लोक onsite ला जाऊन आल्यावर तिथून चोकलेटस आणतात. आता मी काय आणणार? मी आपल त्यात्ल्यातात तिथली ओरेंगची प्रसिद्ध चोकलेटस आणली. सगळ्या मित्रांना ‘sweets @ desk’ चा मेल पाठवला. नागपूर मधले २-४ महिने, तिथले किस्से (शक्य तेवढे रंगवून) सांगितले.  ऑफिस मध्ये येवून तास दोन तास झालेले, पण अजून काय आमचा चांद का मुखडा दिसला नव्हता. सोडून तर गेली नसेल ती कंपनी? उगाच असले विचार मनात यायला लागले. पण नाही हो. दुपारच जेवण करून येताना दिसली ‘ती’. जसं सोडून गेलेलो तशीच होती ती . (अगदी शब्दशः अर्थ नका घेवू हं :-)). छान yello सलवार मध्ये होती. मी माझ्या मित्रांबरोबर floor वरून खाली येत होतो तेव्हा दिसली. तेव्हा नेमका असाच मुली-प्रेम (नेहमीचाच) विषय चाललेला. मुद्दाम जरा तिच्याकडे न बघितल्यासारखं केलं. आणि खाली आलो. नाहीतर या आमच्या मित्रांना मला ती आवडते वगेरे काही समजलं असतं तर मग झालाच मग. (मुला-मुलींच्या एकमेकांकडे पाहण्यावरून या लेकांना समजत दोघांत काय चाललंय ते.)

ती : आज दिसला ‘तो’. २-३ महिन्यांनंतर आज दिसला. lunch ला जाताना दिसला. पण चक्क माझ्याकडे पाहूनहि न पाहिल्यासारखे केले त्याने. काय समजतो काय स्वतःला? २-३ महिन्यांनतर आलाय म्हणजे नक्कीच US ला onsite जाऊन आला असेल. अरे म्हणून काय झालं. बाकी कोणी गेले नाही कि काय US ला? भलताच मॉड दिसतोय. US डोक्यात शिरलंय वाटत. आधी काय वाटलेला मला तो, आणि आता…. शी….. उगाच मी त्याच्याविषयी…. बरे झाले लवकर कळला त्याचा स्वभाव. पुन्हा कधी ढुंकूनही नाही पाहणार त्याच्याकडे.

Read Full Post »

परवा याच नावाचा एक लेख वाचनात आला. या विषयी माझे काही विचार.
पूर्वी आई-बाबा म्हणतील तिथे मुलींची लग्न व्हायची. एकदम पूर्वी मुलीला तिचा नवरा मांडवातच बघायला मिळायचा. मग पुढे रीतसर बघायच्या कार्यक्रमामध्ये मुलीला मुलगा दिसायचा, पण तेव्हाही मुलीला तिचे मत वगेरे काही विचारले जात नसत. नंतर मग मुला-मुलीला वेगळं बोलायची संधी देवू जावू लागली. मुलीचे विचार जाणून घेवू लागले. पुढे तर मुला-मुलींनाच बाहेर हॉटेल मध्ये भेटायला सांगू लागले, आणि जर एकमेकांना दोघ पसंद असतील तर मग रीतसर कांदापोह्यांचा कार्यक्रम होवू लागला. जमाना अजून पुढे बदलला आणि मग मुलगीच आपला जोडीदार शोधून आई-बाबांना दाखवू लागली. एकूणच काय मुलीना त्यांना हवा तसा जोडीदार पारखायची मुभा मिळाली.
जोडीदार पारखायची मुभा मिळाली, त्याप्रमाणे प्रत्येक मुलीचे आपल्या जोडीदाराविषयी काही pre-defined अपेक्षा असतात. जशी हाताची पाचही बोटेसारखी नसतात, तशा सगळ्या मुलीही सारख्या नसतात. प्रत्येकीच्या मुलाविषयीच्या वेग-वेगळ्या अपेक्षा. पण तरीही काही समान अपेक्षा असतातच सगळ्या मुलींमध्ये. त्यातील ‘वेल सेटलड’ हि एक महत्वाची.
बर प्रत्तेकीच्या ‘वेल सेटलड’ च्या व्याख्याही वेगळ्या. कमी शिकलेल्या रमाला एखादा कारकून मुलगा ‘वेल सेटलड’ वाटतो. ५-७ हजार कमावणाऱ्या शिक्षिका असणाऱ्या ‘जानकी’ला १० एक हजार आणि राहायला भाड्याच्या दोन खोल्या असलेला एखादा ‘वेल सेटलड’ वाटतो. बँकेत नोकरी करून १५-२० एक हजार कमावणाऱ्या अर्चनाला २५-३० हजार कमावणारा आणि भाड्याचा का होईना 1 BHK flat असणार आणि हो आई-बाबा जवळ नसणार (बहिण-भाऊ तर लांबच) म्हणजे ‘वेल सेटलड’. MBA करून finance /HR ची नोकरी करत ३०-३५ हजार कमावणाऱ्या अमृताला मात्र ४०-५० हजार कमावणारा प्लस स्वताचा १ किंवा २ BHK flat असणारा आणि साहजिकच आई-बाबा जवळ नसणारा ‘वेल सेटलड’. तर संगणक अभियंता, ५० हजार कमावणाऱ्या प्राचीला स्वतःचा २ किंवा ३ BHK flat (रो हौसे असेल तर उत्तमच)असणारा ६०-७० हजाराची नोकरी आणि आई -बाबा जवळ नसलेला म्हणजे ‘वेल सेटलड’.
मुलींच्या या ‘वेल सेटलड’ मुलाला शोधता शोहता मात्र त्यांच्या पालकांची चांगलीच दमछाक होते. ते नातेवाईकांकडून, ओळखीन्च्याकडून, वधु-वर सूचक मंडळामधून, net वरून या मुलीना ‘वेल सेटलड’ मुलगा शोधण्याचा अमाप प्रयत्न करतात. काहीना मिळतो, तर काही कम नशिबी ठरतात. मग या मुलींचं होतं काय? काही आपल्या ‘वेल सेटलड’ च्या व्याखेत बदल करून त्यातल्या त्यात एखादा बरा मुलगा बघून शुभ-मंगल सावधान उरकून टाकतात. पण काही मुली मात्र निर्धारी असतात बर का. मिळाला तर ‘वेल सेटलड’च नाहीतर नाही असे म्हणत आपल्या ‘वेल सेटलड’ च्या व्याखेवर ठाम असतात. त्यांच्या मते (किंवा जवळपास सगळ्याच मुलींच्या मते ) लग्न म्हणजे ‘बंधन’, स्वतःच्या स्वातंत्र्यावर निर्बंध वगेरे वगेरे. (तसे पाहायला गेले तर थोडे फार तथ्यही आहे हो त्यात.), मग स्वातंत्र्य घालावायाचेच आहे तर इतर गोष्टी तरी मनासारख्या मिळवाव्यात. (पोइन्त आहे हं.)
पण घराचे काही शांत बसतात होय. दर आठवड्याला एखादा मुलगा पुढे करतातच मुलीपुढे. मग त्यातल्या निर्धारी सरळ ‘नाही’ म्हणतात. मग काही हा सगळा प्रोब्लेमच नको म्हणून higher studies च्या नादाला लागतात. लग्नानंतर नाही जमणार शिक्षण वगेरे अशी उत्तरेही असतात तयार पालकांना द्यायला. 🙂 (पण पुन्हा पोइन्त आहे हं.). काही बऱ्याच स्पस्त वक्त्या असतात. त्या म्हणतात, नाही मिळाला तर नाही, कुठे बिघडले. राहेन मी एकटी (स्वतंत्र). कुणाचे बंधन नाही, कि कुणाची गुलामी. (गुलामी? अहो पण मी तर ‘जोरू का गुलाम’ वगेरे ऐकलं होतं :-)). आणि अशा अनेक सुशिक्षित चांगल्या नोकरी असलेल्या मुली सध्या समाजात आपल्याला दिसतात. पण काहीही म्हणा आयुष्यातएखादा जोडीदार, साथीदार हवाच. आता नाही त्याचे महत्व कदाचित जाणवणार, पण एखाद्या कठीण प्रसंगी किंवा उतार वयात त्याची किती मोलाची साथ ठरते.
हि झाली शिकलेल्या मुलींची गोस्ट. पण शेतकऱ्याच्या मुलींचं काय? अहो म्हणे आजकाल शेतकऱ्याशी लग्नाला कोणी तयारच होत नाही. कितीही चांगल्या घरातला असुदे, भरपूर शेती वगेरे असू दे, पण शेतकऱ्याशी लगनाला मुली तयारच होत नाहीत. एक तर शेती हा पूर्णपणे पाऊस, हवामानावर अवलंबून, सध्या शेतीची अवस्था काही बरी नाही, ठराविक असे उत्पन्न नाही, शेती म्हणजे शक्यतो खेडेगाव वगेरे कारणे मुलीना शेतकऱ्याला ‘वेल सेटलड’ गटापासून लांब ठेवतात.

पैसा, घर, नोकरी हे सगळे महत्वाचेच (पैसा बहोत कूच हे लेकीन सब कूच नही … dialog ऐकलेला कुठे तरी हो :-)) पण या सगळ्यात ‘मुलगा’, त्याचा स्वभाव, त्याचे पालक, त्याचे घराणे, त्यावरचे संस्कार, त्याचे इतरांशी वागणे, त्याच्या आवडी निवडी, त्याच्या ‘काही’ सवयी (compatibility, relationship, chemistry ….. botany, zoology वगेरे वगेरे) याकडे या मुली हवं तेवढंनाही लक्ष देत याचे वाईट वाटते.
शेवटी प्रत्येक मुलीला तिच्या मनासारखा ‘वेल सेटलड’ मुलगा (स्वप्नातला राजकुमार) मिळो हीच ईश्वर चरणी प्राथना. आणि हो प्रत्येक मुलालाही त्याच्या स्वप्नातील राजकुमारी मिळो हीसुद्धा प्राथना हो.

Read Full Post »

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे कि ज्याचा अर्थ होतो, ‘जगात प्रत्तेक पाच पैकी एका माणसाला आजुबाजुच सगळंच चुकीच आहे असं वाटत असतं’.

माझ्या मते संजय मांजरेकर हा माणूस याच गटात येतो. या माणसाला सगळंच चुकीच दिसत. परवाच भारत टेस्ट क्रिकेट मध्ये ICC रेटिंग मध्ये एक नंबर झाला. तर हे महाशय म्हणतातकि, “भले भारत एक नंबर झाला असेल पण त्यांनी ऑस्ट्रेलिया किवा दक्षिण आफ्रिका यांना त्यांच्या देशात कुठे हरवले आहे?”. अरे याला काय अर्थ आहे? मग गेली कित्तेक वर्ष ऑस्ट्रेलिया एक नंबर होता, त्यांनी भारताला भारतात कितीवेळा हरवले आहे हो? गेल्या वीस वर्षात फ़क़्त एक सेरीज त्यांना जिंकता आली आहे भारतात. मग तेव्हा हे महाशय काय झोपले होते?

आणि सचिन तेंडूलकर हा तर साहेबांचा आवडता विषय (नावे ठेवायला). या – ना त्या कारणाने सचिन तेंडूलकरच्या उणीवा काढणे आणि त्या अगदी तिखट-मीठलावून जाहीर करणे यामध्ये परम भाग्य वाटते यांना. नुसते कारणच शोधत असतो हा मनुष्य.

परवा ऑस्ट्रेलियाच्या बरोबर सचिनने १७५ धावा काढत शेवट पर्यंत लढला. पण अखेरीस भारत ३ धावांनी हरला. याच सामन्यात सचिनने १७००० धावा पूर्ण केल्या. सगळ्यांनी त्याचे कोतूक केले. पण सचिनविषयी चांगला बोलेल तो ‘संजय मांजरेकर’ कसला? ‘सचिनने पुन्हा एकदा आपण match winner नाही हे सिद्ध केले’ असे म्हणतात हे सभ्य गृहस्त. जणू काही त्याने स्वतःने शंभर एक matches जिंकून दिल्या आहेत भारताला. अरे शेवटी आहे सांघिक खेळ आहे, प्रत्तेकाने खेळायला पाहिजे, तर match जिंकता येतील. पण नाही एवढे केले तरी दोष सचिनचाच.

पण कसे असते, लोकांच लक्ष आपल्याकडे करून घ्यायचा सोपा मार्ग म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीवर काहीई आरोप करावे. झालं मग. आपला प्रिंट-मेडिया असल्या बातम्याला हपापलेला असतोच. मिळाली प्रसिद्धी. पण अशी प्रसिद्धी किती टिकणार?

पण ज्याची लायकीच नाही त्याला थोडी आणि जास्त काय, प्रसिद्धीशी मतलब.

देव करो आणि या माणसाला सुद्बुद्धी मिळो.

Read Full Post »

Older Posts »