Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2010

हेमंत आठलेंचा हा पोस्त वाचला आणि पुन्हा संगणक क्षेत्रात मराठी लोकांना नोकरी मिळण्यासाठी काहीतरी करावे हे विचार पुन्हा डोकं वर काढू लागले.
संगणक क्षेत्रामध्ये नवीन लोक घेण्यासाठी कंपनी त्यांच्या कॉलेज मध्ये जाते ज्याला कॅमपस रेक्रुइत्मेन्त म्हणतात. ज्या लोकांना त्यातून नोकरी मिळते ते नशीबवान. पण ज्या लोकांना नाही मिळत किंवा ज्या लोकांच्या कॉलेजमध्ये कंपनीच येत नाही त्यांना मात्र नोकरीसाठी फार कस्त करावे लागतात. अनेक वेळा कुठे नोकरी आहे हेच कळत नाही, किंवा काल इथे नोकरीसाठी interviews होवून गेले असे कळते. कंपन्यासुद्धा आपल्या कर्मचार्यांनाच नोकरीबद्दल सांगते आणि त्यांचे मित्र कोणी असतील तर त्यांना नोकरी साठी बोलावते (रेफेरल वाल्क-इन).
याच पद्धतीमुळे आपल्याला एकाच कंपनीमध्ये एका विशिष्ट भाषेचे, समाजाचे लोक सर्रास दिसतील. म्हणजे नोकरीसाठी जागा असते पुण्यात, पण त्याची माहित पुण्यातील कोणाला समजण्याआधी ती हैदराबादपर्यंत गेलेली असते आणि लगेच तेथून एखाद मुलगा येवून ती नोकरी घेवूनही जातो आणि इथले त्यांचे लोक सुद्धा त्याला इथे नोकरी मध्ये प्रस्थापित व्हायला मदत करतात, थोड्याफार चुका माफ करतात. (आपले मराठी तरुण मात्र प्रत्येक कंपन्यांच्या पायऱ्या चढत त्यांचे बूट झिजवतात). अन असे हे सर्रास चालते हं. अशावेळेस देश, राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी सोयीस्कर बाजूला ठेवल्या जातात, पण इथे बाकीच्या वेळेस मात्र आम्हाला राष्ट्रीय एकात्मतेचे धडे शिकवले जातात. असो. तो या पोस्टचा विषय नाही.

तर मला इतकेच सांगायचे आहे कि आपल्याला एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी जागा आहे असे माहित असेल तर ती आपल्या मराठी मित्रांना नक्की कळवा. आपल्या कंपनीत जर अशा जागा असतील तर आपल्या मित्रांना त्या आवर्जून कळवा. तसेच आपल्या ब्लोग चा सुद्धा अशा जागा इतर मराठी लोकांना कळवण्यासाठी वापर करावा. थोडी फार प्राथमिक मदतही त्यांना करा. कोणी मराठी व्यक्तीने त्याचा resume पाठवला तर शक्य तेवढ्या ठिकाणी तो जाईल असा प्रयत्न करा. कोणजाणे आपल्या अशाच प्रयत्नातून आपल्या एका मराठी बांधवाला ती जागा मिळून जाईल. इथे इतर कुणा ‘योग्य’ व्यक्तीला त्या जागेसाठी डावराने हा मुळीच हेतू नाही. पण फक्त एका मराठी व्यक्तीला त्या जागेची माहिती देणे आणि थोडी फार प्राथमिक मदत करणे हाच आहे. पुढे तो आपल्या ज्ञानावर  ती मिळवेलच.

एका नोकरी विषयी :
sqs-india.

Testing साठी requirement आहे.
sqs-india.com वर resume upload करा.
जागा:  नळ स्तोप जवळ

Advertisements

Read Full Post »

 ती  : काल सकाळी, pantry मध्ये चहासाठी गेले होते, तेव्हा आधी ३-४ जणे तेथे चहाच्या मशीन मधून चहा घायला उभे होते. मी देखील कप घेवून उभी राहिले. इतक्यात ‘तो’  आला. तोही कप घेवून उभा राहिला, माझ्या जवळच. अर्धा-एक मिनिट दोघे चहासाठी नंबर येईल याची वाट पाहत उभे राहिलो. मग मीच त्याला स्मित हास्य दिले. तोहि हलकासा हसला. पण वाटले काही उपयोग नाही. तो नेहमीप्रमाणे शांतच उभा राहील, आणि चहा घेवून निघून जाईल. म्हंटले आपणच बोलावे आज. काय बर बोलावे याचा विचार करत होते इतक्यात ‘हाय’ म्हणून आवाज आला. बघते तर काय चक्क त्याने मला ‘हाय’ म्हंटले. तो माझ्या समोरच होता पण मी आपली त्याच्याशी काय बोलावे या विचारात होते, त्यामुळे पहिल्यांदा काही कळलेच नाही. पण समोर तोच होता आणि ते त्याचेच शब्द होते. माझा माझ्या कानावर आणि डोळ्यावर विश्वासच बसेना, त्याने चक्क स्वतःहून मला ‘हाय’ म्हंटले. wow…. अखेर आली म्हणायची याला थोडी अक्कल.  पण त्यासाठी आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय? 🙂 पश्चिमेला असो वा उत्तरेला, पण तो स्वतःहून माझ्याशी बोलला. आणि यासाठी सूर्याच्या उगवण्याची दिशा कारणीभूत असेल तर जरूर सूर्याने रोज पश्चिमेला वा उत्तरेला उगवावे. 🙂 पण त्याच्याकडून ‘हाय’ म्हणणे  मला बिलकुल अपेक्षित नव्हते. तो जरा मितभाषी आहे. एवढा नाही मुलींशी बोलत, म्हणजे नाही दिसत. मग मीही स्मित हास्य देत “हाय” म्हणाले. (ते हास्य स्मित पेक्षा जरा जास्तीच होते :-)). तोवर आधीच्या लोकांचे चहा घेवून झालेले, मी चहा घेतला, त्यानेही घेतला. आता त्याच्या बरोबर galary मध्ये चहा घ्यावा असा विचार करते  इतक्यात “अगं तनु तुला कळले का?” असे म्हणत एक ब्रेकिंग न्यूज घेवून माझी मैत्रीण अमृता आली. ही अमृता नं, नको त्या वेळी कडमडते. हे पाहून ‘तो’ ही निघून गेला. पण आज गाडी कुठेतरी रुळावर आली असे वाटले, आता अशीच जोरात धावूदे म्हणजे झालं.

तो : सकाळी चहासाठी pantry मध्ये जातो तर काय पुढे ‘ती’ होती. काही करून आज तिच्याशी बोलायचेच म्हंटले. परवा लिफ्ट मध्ये झालेल्या प्रकाराबद्दल आधीच स्वतःला भरपूर शिव्या घातलेल्या. एवढा देवाने योग घडवून आणलेला, दोघंच लिफ्ट मध्ये होतो आणि माझ्या तोंडातून ब्र देखील निघाला नाही. ‘काही नाही उपयोग रे रोहीत्या तुझा, तुझ्या हातून काही होणार नाही. तू आपला ‘ में और मेरी तन्हाई’ करत बस,  चुल्लू भर पाणी में डूब जा’ वगेरे  बोल रूम मेट्स कडून ऐकायला मिळाले होते. हो रूम मेट्सला तिच्या बद्दल बोललो. परवा असाच मुली, प्रेम यावर रूममध्ये चर्चासत्र चालू असताना मी ‘ती आणि  तीच्या बद्दलचे माझे विचार’ हा विषय घेवून त्या चर्चासत्रात उडी मारली.  आणि त्यानंतर विचारू नका, हे माझे रूम मेट्स मी जणू काही आत्ताच शाळा संपवून कॉलेजमध्ये पहिले पाऊल ठेवले असल्यासारखे मुलीला पटवायचे नाना तर्हेचे फोर्मुले सांगत असतात. हा आता  त्यांच्या बोलण्यामुळे कधी प्रेरणाहि  मिळते तर कधी इर्षा पण होते.

असो पण आज तिच्याशी बोलायचे हे नक्की. चहासाठी उभा राहीलो. तीने माझ्याकडे पाहून नेहमीची पेटेन्ट स्माईल दिली. त्याने तर मला आणखीणच हुरूप आला. ‘हाय तनु’ नको तनु नको, तन्वीच बरे. पहिल्यांदा एकदम तनु जरा जास्तीच होते.  ‘हाय तन्वी’ ‘हेलो तन्वी’ ‘Excuse mi तन्वी’. Excuse mi काय? तिला काय request करतोयस का?  ‘हाय तन्वी’ च बरे. असे तिच्याशी कसे बोलायचे याचे विचार चालू होते. आणि अखेरीस मी म्हंटले. हो हो मी म्हंटले. ‘हाय’.  हं …… म्हणजे नुसतेच ‘हाय’ म्हंटले. पण म्हंटले खरं. दोन सेकंद तिचा काही प्रतिसादाच नाही, मी जाम tension मध्ये. आमचे हृदय नेहमी प्रमाणे ८० प्रती  मिनिटाच्या वेगात.  पण मग तीही हसली आणि ‘हाय’ म्हणाली. हुशशश….. माझा जीव भांड्यात पडला. खळळळ……..  आवाजही जोरात आला. हममम… कोणाच्यातरी  हातातून कप पडल्याचा आवाज होता तो. 🙂 पण शेवटी मी गड सर केलाच. सर नाही म्हणता येणार पण पहिले पाऊल तरी टाकले हे नक्कीच.

Read Full Post »

तुम्ही कामात व्यस्त आहात, ‘bug’ solve करण्यासाठी आटापिटा करत आहात, आपल्या प्रियसीबरोबर एकांतात बसला आहात, आणि अशा वेळेस नेमका एखाद्या क्रेडीट कार्ड कंपनीचा, बँक मधून लोन साठी किंवा विमा कंपनीचा फोन येतो. अशा वेळेस तिकडची व्यक्ती काही केल्या ऐकायला तयार नसते, माहिती सांगण्यासाठी हट्टी असते.

अशा वेळी त्यांना कसे टाळायचे.

अशा वेळेस, “मला हिंदी आणि इंग्रीजी येत नाही, कृपया मराठीतून आपली माहिती द्या.” असे नम्र भाषेत सांगावे. अनेकदा हि लोकं इंग्रजाळलेले असतात त्यामुळे, त्यांना मराठी यायची शक्यता कमीच असते. आणि जर का एखादा असलाच मराठी मुलगा किंवा मुलगी तर नंतर मला यात फारसा रस नाही म्हणावे.

यातून दोन फायदे. एकतर लगेच फोन बंद करत येतो, आणि जर का सगळ्या मराठी लोकांनी हा मार्ग स्वीकारला तर नक्कीच या लोकांना मराठी शिकायला त्या कंपन्या सांगतील अथवा मराठी लोकांना या कामासाठी प्राधान्य देतील.

नक्की करून पहा.

टीप : जो पर्यंत आपण मराठीसाठी आग्रह धरणार नाही तोवर कोणीही स्वताहून मराठी शिकणार नाही. प्रत्येकाशी मराठीतून ‘च’ बोला (महाराष्ट्रात तरी, आणि हो मुंबई महाराष्ट्रातच आहे, भले हे मोबाईल फोनवाले मुंबई वेगळी धरत असले तरी).

Read Full Post »