तुम्ही कामात व्यस्त आहात, ‘bug’ solve करण्यासाठी आटापिटा करत आहात, आपल्या प्रियसीबरोबर एकांतात बसला आहात, आणि अशा वेळेस नेमका एखाद्या क्रेडीट कार्ड कंपनीचा, बँक मधून लोन साठी किंवा विमा कंपनीचा फोन येतो. अशा वेळेस तिकडची व्यक्ती काही केल्या ऐकायला तयार नसते, माहिती सांगण्यासाठी हट्टी असते.
अशा वेळी त्यांना कसे टाळायचे.
अशा वेळेस, “मला हिंदी आणि इंग्रीजी येत नाही, कृपया मराठीतून आपली माहिती द्या.” असे नम्र भाषेत सांगावे. अनेकदा हि लोकं इंग्रजाळलेले असतात त्यामुळे, त्यांना मराठी यायची शक्यता कमीच असते. आणि जर का एखादा असलाच मराठी मुलगा किंवा मुलगी तर नंतर मला यात फारसा रस नाही म्हणावे.
यातून दोन फायदे. एकतर लगेच फोन बंद करत येतो, आणि जर का सगळ्या मराठी लोकांनी हा मार्ग स्वीकारला तर नक्कीच या लोकांना मराठी शिकायला त्या कंपन्या सांगतील अथवा मराठी लोकांना या कामासाठी प्राधान्य देतील.
नक्की करून पहा.
टीप : जो पर्यंत आपण मराठीसाठी आग्रह धरणार नाही तोवर कोणीही स्वताहून मराठी शिकणार नाही. प्रत्येकाशी मराठीतून ‘च’ बोला (महाराष्ट्रात तरी, आणि हो मुंबई महाराष्ट्रातच आहे, भले हे मोबाईल फोनवाले मुंबई वेगळी धरत असले तरी).
अगदी बरोबर. कालच एका विमा कंपनीचा मला फोन आला होता. त्यांना मी मराठीत बोलायला सांगितलं तर, त्याने एका मराठी मुलीकडे फोन दिला. ती तर काही विचारूच नको. मागेच लागली. काहीही करून विमा घ्याच. कस बसं टाळाल. पण मराठीतच बोलायला हव, हे मत अगदी बरोबर आहे.
हे मार्केटिंगचे लोक असतातच असे. त्यांचा कामच आहे ते.
त्यांच्याशी मराठीत बोललात. छान. अनाद वाटला.
एका युक्तीमुळे दोन प्रश्न सुटतात. छान आहे. मला एम.टी.एन.एल.कडून फोन येतात, तेही दिल्लीवरून. हा, हा, हा. त्यांच्याशी मराठीत बोलताना मजा येईल.
नक्कीच!!!!!
जरूर प्रयत्न करा!!!!!