Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for एप्रिल, 2010

तो : गेले काही दिवस अमृता येत नाही, त्यामुळे ट्रेनिंगला तनु एकटीच येते. शक्यतो मी थोडा लवकरच येतो. ट्रेनिंग रूम मध्ये आल्यावर तीची नजर मोकळ्या सीट ऐवजी माझा वेध घेते. तशी आता थोडीफार ओळख झाली आहे. पण ट्रेनिंग मधेच भेट होत असल्याने अजून फारसे बोलणे होत नाही.
परवा मात्र ट्रेनरला यायला अजून उशीर असल्याने pantry च्या gallery मध्ये एकत्र उभे होतो. दोघेच होतो. काहीतरी सुरवात करावी म्हणून तिच्या प्रोजेक्ट विषयी विचारले, पण तिने लगेच विषय बदलत माझ्या बद्दल चोकशी चालू केली. मी कुठला वगेरे वगेरे. बर्यापैकी आमचे बोलणे झाले, म्हणजे ती माझ्याविषयी विचारात होती, मी उत्तर देत होतो. थोडे फार interview सारखेच चालले होते असे ध्यानात आल्यावर तिच्याविषयी काही विचारावे म्हणतो तोच एकदम जोरात वारा आला आणि समोरच्या झाडाची सुकलेली पाने उडत इकडे आली, वाऱ्याने तीची ओढणी एकदम माझ्या चेहऱ्यावर आली. ओढणीने माझा पूर्ण चेहरा झाकला होता, पण तरी ओढनीतून ती स्पष्ट दिसत होती. वाऱ्याने तिचे केस हलकेसे विसकटले होते, तिने लगेच ते ठीक केले, चेहऱ्यावर आलेली धूळ रुमालाने झटकली. मी अजून असाच ओढणीआड तिला पाहत उभा होतो. तिने माझ्याकडे पहिले, ती हसली आणि माझ्या चेहऱ्यावरची तीची ओढणी हळुवार काढून घेतली. वाऱ्याने माझे देखील केस विसकटले होते आणि २-३ सुकी पाने केसात अडकली होती. तिने मला ते सांगितले, मी ती काढायचा प्रयत्न केला, पण मला काय ती निघाली नाहीत. मग तिने पुढे होवून माझ्या केसातली ती पाने काढली, आणि वर-वर माझे केस ठीक केले. मग आम्ही पुन्हा ट्रेनिंगला गेलो.
……..

आज ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता. रोज तनु ट्रेनिंगमुळे दिसत होती, भेटत होती, तिच्याशी थोडे फार का होईना बोलणे होत होते. पण आता ट्रेनिंग संपणार. पुन्हा ती तिच्या दिशेला मी माझ्या दिशेला. ट्रेनिंग नंतर पुन्हा आमचे असे एकत्र भेटणे-बोलणे होईल का? इतर वेळी तिच्या कडे कितीही मनात असले तरी एकटक पाहायला मिळेल काय? ट्रेनिंग दरम्यान ती जेव्हा ट्रेनरला एखादा प्रश्न विचारात असे तेव्हा तिच्याकडे एकटक पाहायला मिळत असे. अशा वेळेस कोण आपल्याकडे पहातंय का? कोण काय म्हणेल याची काळजी नसते. कारण अशा वेळेस इतरांच्या मते आपले तिच्या प्रश्नाकडे लक्ष असते. जितके तिच्याकडे एकटक बघू तितका आपला प्रश्नामध्ये जास्त रस, असे वाटते इतरांना. 🙂 अशा वेळेस ती काय बोलत असते याकडे कधी लक्षच लागत नाही माझे, त्यावेळेस तिचा आणि इतर जगाचा volumn एकदम low झालेला असतो, सगळे आजूबाजूचे लोक तिच्यापासून लांब गेलेले असतात, आणि फ़क़्त तिचा चेहरा माझ्या दृष्टीपथात असतो. सगळं काही slow motion मध्ये चालू असतं. तिचे हातवारे, तिचे हसणे, मधूनच तिचे बट कानामागे नेणे, तिच्या ओठांच्या हालचाली हेच तेवढे मला दिसते. पण आता ट्रेनिंगनंतर या सगळ्यांना मी मुकणार. हाच विचार मला शेवटच्या दिवशी खलत होता.

ट्रेनिंग संपल्यावर आज तिच्याबरोबर कॅफेटेरियात lunch केले तर? हम्म what an idea सरजी. त्या नादाने तिच्याशी बोलणे होईल. काल pantry मध्ये ती माझ्या विषयी एवढे काही विचारात होती, मी मात्र तिच्या विषयी काहीच विचारले नाही. पण ती येईल माझ्याबरोबर lunch ला ? आणि हो तीची ती अमृता पण नाही आज. विचारायला काही हरकत नाही. मला राहवलेच नाही आणि ट्रेनिंग चालू असतानाच मी एकदम तिला उद्देशून: “आज आपण…”. तिचे ट्रेनिंग मध्ये लक्ष होते, ती: “sorry … काय म्हणालास?”. मी : “ohh nothing.” हम्म्म्म ट्रेनिंग झाल्यावरच विचारलेले बरे.
ट्रेनिंग संपली, काहीजने गेलीही. आम्ही २-४ जने आणि ट्रेनर होती. वाटले आता बाहेर जाताना विचारू तनुला lunch विषयी. इतक्यात ट्रेनर म्हणाली, “lets go for lunch together”. सगळेही लगेच हो म्हणाले. सत्यानास!!!!! झाले आमच्या lunch चे तीन तेरा. मग काय आम्ही ४-५ जने जवळच्याच हॉटेल मध्ये lunch ला गेलो. ओर्डर देताना ती प्रत्येक वेळा मला काय आवडते ते विचारात होती, आणि ओर्डर मध्ये ते असेल याची काळजी घेत होती. infact आम्ही soup देखील दोघांनी शेअर केले. (वन बाय टू) 🙂  तीची आणि ट्रेनरची चांगलीच जमली होती. दोघी जवळच बसल्या होत्या. दोघींचे काहीतरी हळू आवाजात खुसुर-पुसुर चालले होते. ट्रेनरने तिला काही तरी विचारले, आणि ती एकदम लाजलीच. लाजतच “नाही असे काही नाही” असे तिने म्हंटलेले आम्ही सगळ्यांनी ऐकले. दुसऱ्या एका मुलीने विचारलेहि काय झाले, पण ट्रेनर लगेच “its secrete” म्हणाली. ती माझ्या कडे बघून हसली, ट्रेनरहि माझ्याकडे बघून हसली. मला काही कळेना, मी आपले चेहरा, केस ठीक आहेत ना ते चेक केले.
lunch घेवून आम्ही सगळे ट्रेनरला बाय करून निघालो.
पुढे काय होणार कोण जाणे, पुन्हा तनुशी बोलणे होईल का? फार फार तर येता जाता एखादी स्माईल आणि हाय, हेल्लो होईल.
Lets see.

.

ती : अमृताला सध्या बरं नाही त्यामुळे ती ऑफिसला येत नाही. त्यामुळे मला ट्रेनिंग मध्ये रोहितजवळ बसायला कोणी अडवणारे नाही 🙂 तो देखील नेहमी एखादी जवळची सीट मोकळी असेल अशाच ठिकाणी बसतो. मी देखील त्याच्या जवळच बसते. नेहमी भेट ट्रेनिंग मधेच होते त्यामुळे इतर गोष्टींवर फारसे बोलणे होत नाही पण तरीही थोडी फार मैत्री झाली आहे. …..हम्म्म्म खरच मैत्री म्हणता येईल का कि फ़क़्त तोंड ओळख. Whatever
परवा pnatry च्या galary मध्ये दोघेच उभे होतो. तेव्हा पहिल्यांदाच ऑफिस सोडून इतर बाबींवर थोडं फार बोलणं झालं. actually त्याने सुरवात “सो कसा चालू आहे प्रोजेक्ट?” म्हणतच केली. याला ना कोणत्या प्रसंगी काय बोलावे याची अक्कलच नाही …. i mean कोणत्या प्रसंगी काय बोलावे हे कधी कळणार देव जाणे. अरे समोर एखादी मुलगी आहे ना, मग त्या प्रोजेक्ट ची कशाला काळजी तुला? मला त्याच्याकडून येणारे पुढचे सर्व प्रश्न डोळ्यापुढे दिसू लागले. म्हणून मीच लगेच विषय बदलत त्याने कोठून कॉलेज केले, मुळचा कुठला, सध्या कुठे राहतो वगेरे कडे मोर्चा वळवला. तर तो मुळचा सांगलीचा. माझी मावशीही सांगलीचीच. मी लहानपणी जायचे सांगलीला. आता फारसे आठवत नाही पण छान आहे सांगली, i mean तेव्हा तरी होती. बर्यापैकी बोलणे झाले आज. बोलणे कसले हो……मी विचारत होते, आणि हा उत्तर देत होता. मी कुठे राहते, मुळची कुठली, मला काय आवडतं वगेरे विचारायची काही पद्धतच नाही. असो. थोड्याच वेळात ट्रेनर आल्याचे कळले आणि आम्ही ट्रेनिंग रूम कडे गेलो.
…………..

४-५ दिवस ट्रेनिंग सुरु होवून झाले, आणि शक्यतो आम्ही दोघे रोज एकत्रच बसतो. अजूनही एकमेकांकडे नकळत तिरक्या नजरेने पाहणे चालू असते.
अमृता आता बरी होवून ऑफिसला येत आहे, पण २-३ दिवसाच्या सुट्टी मुळे तिची काही कामे पेंडिंग आहेत म्हणून ट्रेनिंगला यावे का या बद्दल ती विचार करत होती, मी देखील तिला, “अगं इतके session मीस झाल्याने आता काही कळणार नाही ग तुला” असे सांगून तिचे बाकीच्या session ला न येणे पक्के केले 🙂
……………..

काल ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता. ट्रेनिंगला आज मोजकेच लोक होते. ट्रेनरशी सुद्धा आता चागलीच मैत्री झाली होती. त्यामुळे हसत खेळत चाललेलं. ट्रेनरचा ‘मानस शास्त्राचा’ पण चांगला आभ्यास होता. अजून वेळ होता म्हणून तिने सहजच आम्हाला बोर्ड वर आपल्या मनातील घर या विषयावर प्रत्येकाला जमेल तसं चित्र काढायला सांगितलं. प्रत्येकाने बोर्डवर चित्रे काढली. माझी चित्रकला म्हणजे अगदी दिव्य. एक घर, दारापासून पुढे जाणारा रस्ता, जवळच झाड, आजूबाजूला ५-६ लोक, मागे डोंगर आणि झाले माझे चित्र 🙂 त्यानेही त्याच्या मनातील घर काढले. चित्र काढताना त्याच्याकडे मी पहात होते, अगदी मनापासून काढत होता तो चित्र जणू काही खरच स्वतःचे घर बनवत होता. अगदी सुबक नाही पण छान काढले होते त्याने त्याचे घर. शेवटी आमच्या ट्रेनरने प्रत्येकाच्या चित्रावरून त्या व्यक्तीची स्वभाव वैशिस्ते सांगितली. एक मुलाला ट्रेनर म्हणाली तो फार ambitious आहे आणि इतरांचा तो विचार करत नाही, तर एका मुलीला ती म्हणाली, तिला तिच्या आयुष्यात कोणी लुडबुड केलेली आवडत नाही. माझ्या चित्राकडे पाहून तिने मी साधी simple आहे, मला लोकांमध्ये राहायला, मिसळायला आवडते वगेरे सांगितले. शेवटी ती त्याच्या चित्राकडे आली, थोडा वेळ त्याच्या चित्राकडे पाहून ती म्हणाली हा फार ‘romantic’ आहे. तो फ़क़्त हलकासा हसला…. कि लाजला? 🙂 मी देखील चिकित्सेने ट्रेनरला विचारले, “कशावरून?”. ती हसली आणि म्हणाली. “याच्या चित्रात चंद्र आहे, चांदण्या आहेत, रम्य रात्र आहे, घराजवळच्या तलावात एका बोटीत एक जोडपं आहे, नारळाची दोन झाडे एकमेकांकडे झुकलेली आहेत. या गोष्टी दर्शवतात कि…..” इतक्यात कोणीतरी आले आणि तो विषय तिथेच थांबला. पण तो romantic आहे. wow. let see 🙂
ट्रेनिंग संपल्यावर आम्ही ४-५ जन ट्रेनर सोबत lunch ला गेलो. तेव्हा ट्रेनरने मला माझ्या आणि रोहित विषयी विचारले. मी शक्य तेवढं तिला काय म्हणायचे आहे हे समजूनही न समजल्याचा भाव आणला. तेव्हा तिने स्पष्ट विचारले की, एकमेकांना अजून बोललात कि नाही?. मी एकदम लाजतच आमच्यात असे काही नसल्याचे सांगितले. लाजतच मी त्याच्याकडे पहिले तर तो पुरता गोंधळलेला होता. पण ट्रेनरच्या१२-१३ वर्ष्याच्या soft-skill क्षेत्रातल्या अनुभावापुढे माझ्या हे नाते लपवण्याच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. शेवटी ती फ़क़्त म्हणाली, “he is nice guy. don’t loose him”. 🙂
या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेनिंगचा आज शेवटचा दिवस आहे हे विसरलेच होते मी. उद्या पुन्हा ते routine work, आणि ते हि त्याच्या विना. 😦

रात्री मी पहिल्यांदाच त्याच्या विषयी माझ्या लहान बहिणीला म्हणजे अनुला बोलले. actually मी तिच्यापासून काहीच लपवत नाही. पण त्याच्याविषयी कोणाला काही बोलायचे नाही हेही ठरवले होते, पण शेवटी अनुला बोललेच. ती देखील फार excite झाली त्याच्या विषयी ऐकून. तो कोण, कसा दिसतो, काय करतो, स्वभावाने कसा आहे वगेरे वगेरे एक ना शंभर प्रश्न विचारले तिने 🙂

.

अनु : काल ताईने पहिल्यांदाच रोहितबद्दल सांगितले. थोडक्यात काय तर आमच्या बहिणा बाई प्रेमात पडल्या आहेत. म्हणजे अजून ती तसे मान्य नाही करत. अगं अजून एकमेकांना ओळखत पण नाही गं, फारसे बोलणे पण नाही झाले अजून, may be just attraction असेल, त्याला काय वाटते कोणास ठाऊक वगेरे वगेरे म्हणाली, पण त्याच्या विषयी बोलताना एक वेगळाच उत्चाहा होता तिच्यात. प्रेमात असंच होतं. आपण प्रेमात पडलोय हे आपल्यालाच कळत नाही, पण आपल्या जवळचे ते लगेच हेरतात. किंवा आपण कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी इतरांना काय ते कळतेच.
तिच्या बोलण्यातून रोहित थोडा soft spoken आहे असे कळले. आता या soft spoken लोकांचा प्रोब्लेम म्हणजे जिथे बोलायची खरच गरज आहे तिथे देखील हि लोकं स्वभाव सोडून वागत नाहीत, आणि प्रेमात तर बोलूच नका. त्यांच्याकडून त्यांच्या मनातील भावना कळणे म्हणजे महा अवघड. एकवेळ रेडा द्यानेश्वरी च्या ओळी म्हणेल, पण हि लोक मनातील भावना बोलतील तर शप्पथ. त्यामुळे मी ताईलाच पुढाकार घ्यायला संगीलता. पण आमच्या ताईचे म्हणजे कसे तर ऐन लढाईत राजीनामा. म्हणजे एरवी पुढे पुढे करेन पण पाहिजे तेव्हा बाईसाहेब मुग गिळून बसतील. त्यामुळे तिला पुढाकार घ्यायचा बराच डोस पाजला. आता बघू या डोसचा काही उपयोग होतो का ते, नाहीतर पेहले आप, पेहले आप करण्यात गाडी निघून जायची.

Advertisements

Read Full Post »

तो : मागच्या आठवड्यात माझे ‘accent neutrilization’ चे ट्रेनिंग होते. मी वेळेत पोहोचलो. फारसे कोणी अजून आले नव्हते. गालावर एक हात ठेवून कसला तरी विचार करत मी बसलो होतो, तेवढ्यात पुढून दारातून दोन नाजूक पायांनी प्रवेश केला. नाजुकशी हाय हिल्सचे sandal, पायात नाजूक पैंजण (नुसतेच शोसाठी, कारण त्यापेक्षा ते हाय हिल्सच फरशीवर जास्त आवाज करायचे), आकाशी रंगाचा अंगाला अगदी चिकटून सलवार कमीज, एका बाजूला जास्त झुकलेली ओढणी, उजव्या खांद्याला पर्स, हातात ड्रेसला शोभेल अशा बांगड्या, मोकळे सोडलेले केस, आणि एक जाना पेहचाणा पर्फुमचा सुगंध. त्या सुगंधाचा आस्वाद घेत हळुवार माण वर करून पाहतो तर काय पुढे ‘ती’ म्हणजे तन्वी होती. wow ….. तरीच म्हंटले हा पर्फुम ओळखीचा वाटतो. 🙂 तिच्या बरोबर तिची नेहमीची मैत्रीण अमृता होती. तनुने माझ्याकडे पाहिले थोडी थांबलीही, इतक्यात अमृताने तिला माझ्या विरुद्ध बाजूला मोकळ्या जागेकडे बसायला नेले. तेथे बास्ल्यावर नकळत माझ्याकडे वळून पाहून तिने पुन्हा तेच तिचे नेहमीचे स्मित हास्य देवून मला ग्रीट केले. मीही तिला त्याच भाषेत प्रत्युतर दिले. माझे हास्य अजून तोंडावर होते तोच अमृताने माझ्याकडे killing look देवून पाहिले, आणि माझ्या ओठांचा राउंड शेप एकदम flat झाला. मीही लगेच पुढे माण वळवली. हि अमृता माझ्याकडे अशी का पाहते कोण जाणे?
मग एक modern टाईपची मुलगी माझ्या जवळ येवून बसली. कपड्यांवरून जरा अतीच morern वाटत होती, आणि जरा over react हि करत होती. तिने आधी याच trainer चे एक session attend केले होते त्या बद्दल काहीतरी उगाच अति हाव भाव करत सांगत होती. थोडी जास्तच express करत होती, मलाच तीच ते वागण थोडं अवघडल्यासारखं होत होतं. पण काही इलाज नव्हता.
नंतर training चालू असताना तनुकडे अधून मधून पाहिले पण ती काही इकडे पाहायला तयार नाही.
दुसऱ्या दिवशी पुन्हा मी एकटा होतो, आज तनु एकटीच आली होती, तिची नेहमीची अंगरक्षक अमृता नव्हती 🙂 ती आली, तिने आजू- बाजूला पाहिले. मी माझी बाजूच्या सीट वरची  bag लगेच उचलून बाजूला ठेवली. ती माझ्याजवळ आली, पुन्हा आजू – बाजूला पहिली, माझ्या जवळ कोणी बसले आहे का या बद्दल विचारले, मी नुसती नकारार्थी माण डोलावली. आणि ती माझ्या जवळच्या सीट वर बासली. देवा गजानना आभारी आहे रे (असे मनातल्या मनातच म्हंटले) इकडे आमचे हृदय नेहमीच्या सवयीप्रमाणे ८० प्रती सेकॅन्दाच्या वेगात. तिचे माझ्याकडे पाहून नेहमीचे हास्य. माझाही तोच नेहमीचाच प्रतिसाद. पुन्हा काही क्षण दोघे शांत. काय बोलावे काही समजेना. ‘हाय’ म्हणून सुरवात करावी तर मागच्या वेळेप्रमाणे संवाद ‘हाय’ वरच संपेन याची भीती. काय बर बोलावे? तुझे नाव तन्वी ना? का तुझी activa आहे ना? कि तू कोथरूड मध्ये राहतेस ? कशी बर सुरवात करावी? shut यार मुलींशी बोलायची सवय नसली कि असं होतं. पुढे मुलगी आली कि काय बोलावे हेच सुचत नाही. अखेरीस तू अनिकेतच्या टीम मध्ये आहेस ना म्हणत मी कशीबशी दबकतच सुरवात केली. तिने देखील माझ्या प्रश्नाची वाटच पाहत असल्याप्रमाणे लगेच हं म्हंटले. तिने लगेच “हाय मी तन्वी” म्हणत हात पुढे केला. मीहि तिच्या हातात माझा हलकासा थरथरणारा हात देत “मी अ ….. रोहित”. वाह काय सुंदर हात आहे तिचा, एकदम मऊ-मऊ. (I guess सगळ्या मुलींचा असाच असतो) जणू काही कापसाचा गोळाच. आयुष्यातील सोनेरी अक्षरांनी लिहायचा क्षण होता तो माझ्यासाठी. डोळ्यापुढे ती होती आणि हातात तिचा हात होता. वाटत होतं कधी ती समोरून जाऊच नये, आणि हा हात आयुषभर माझ्या हातात राहावा.stachu म्हणावस वाटत होतं. सगळं जग असंच या क्षणाला स्थिर व्हावं. मुलीचा स्पर्श current वगेरे देतो अस ऐकलेलं, हा current तर नव्हता पण संपूर्ण शरीरात एक नवं चैतन्य निर्माण करणारा होता. अक्षरशहा ४-५ सेकंद आसाच तिचा हात हातात घेवून तिच्याकडे एकटक पाहत होतो. इतक्यात trainer आली आणि मी (आणि तीही कदाचित) या उघड्या डोळ्यांनी पाहत असलेल्या स्वप्नातून जागा झालो. लगेच मी माझा हात सैल केला, आणि तिने तिचा हात माझ्या हातातून काढून घेतला. तिचा हात जरी माझ्या हाती नसला तरी तिच्या हाताच्या ओलाव्याने माझ्या हातावर छाप सोडली होती. नंतर पूर्ण traing मध्ये मी ज्या हाताने तिचा हात पकडला होता त्याचा सुगंध घेत होतो. infact दिवस भर त्या हाताने काम करायचे, इतर गोष्टीना स्पर्श करायचे मी टाळत होतो. 🙂
नंतर training session संपले आणि आम्ही दोघे एकत्र बाहेर पडलो. अजून फारशी ओळख नसल्याने जगात कधी कोठेही दोन संगणक अभियंते एकत्र आल्यावर त्यांचे जे प्रश्न असतात तेच सध्यातरी आमचेही होते, whcih platform? which technology? how much experimence? 🙂

ती : मला एका soft-skill चे ट्रेनिंग attend करायचे होते. soft-skill ची ट्रेनिंग मला बाई आवडतात, तिथे काही code, architecture वगेरे ची भानगड नसते, आणि मुख्य म्हणजे शेवटी कोणत्या टेस्ट किंवा case study नसतात:-) त्यामुळे मस्त एन्जोय करता येते, नवीन लोक एकत्र येतात, मित्र बनतात.
पहिल्या दिवशी मी ट्रेनिंग साठी रूम मध्ये गेले, अमृताही होती बरोबर. अजून बर्याचशा सीट्स मोकळ्या होत्या एखादी मोकळी सीट शोधावी म्हणून समोर दोन्ही बाजूने नजर फिरवली तर पुढे ‘तो’ ….. रोहित माण खाली घालून कसला तरी विचार करत (साऱ्या विश्वाची चिंता मला वगेरे टाईप मुद्रा करून :-)) बसला होता, हळुवार त्याची नजर वर माझ्याकडे गेली, आणि त्याच्या चेहऱ्यावरचा भाव एकदम बदलला. जेवढे मला त्याला पुढे पाहणे उनपेक्षित पण हवेसे होते, तेवढेच त्यालाही होते. त्याची विश्वाची चिंता संपली होती कदाचित :-). दोघे काही क्षण असेच होतो, अमृताला हे लगेच जाणवले आणि तिने मला दुसरीकडे बसायला नेले. मी २-३ वेळा नकळत त्याच्याकडे नजर वळवली, त्याची नजर देखील नकळत माझ्या नजरेचीच प्रतीक्षा करत असल्याचे जाणवले.
इतक्यात एक टाइट jeans आणि short t-shirt घातलेली एक बया आली, आणि ती सगळ्या मोकळ्या जागा सोडून त्याच्या जवळ जाऊन बसली. दिसायला सो-सो च होती पण तोडक्या कपड्यांमुळे(च) उठून दिसत होती. नंतर सहज पाहिले तर काय नखरे करत होती ती बया. जरा over-react च करत होती. सारखे केस काय सावरतेय (अंबाडा करून बांध म्हणाव), t-shirt सारखा मागे कबरेखाली काय घेतेय (मी म्हणते घालायचाच कशाला इतका तोडका तो t-shirt), लिपस्टिक खराब होवू नये म्हणून सारखी ओठ काय चेक करतेय, उगाच ती कृत्रिम हास्य काय देतेय. आणि बघतेय तर काय दोघे एकमेकांशी अगदी हसत खेळत बोलत होती. वाह रे बहाद्दरा. माझ्याशी बोलायला तोंडातून शब्द पडेल तर शप्पथ, आणि तिच्याशी मात्र अगदी गुलु-गुलु बोलत होता. नाही …. अमृता म्हणते तेच बरोबर. शेवटी सगळी मुले सारखीच. जरा चांगली…. चांगली कसली…. कमी कपड्यातली मुलगी दिसली कि चालले माग-माग. मी पण नंतर नाही लक्ष दिले माग  त्याच्याकडे. पण नंतर जाणवलं तिच्या या over react करण्याने तोच कुठतरी ऑकवर्ड फील करत होता. so cute ना. एकदम साधा आहे तो.
दुसऱ्या दिवशी अमृता सुट्टीवर होती, त्यामुळे मी एकटीच होते. त्याच्या जवळ देखील कोणी नव्हते मीही मग त्याच्या जवळ जाऊन बसले. पहिले काही क्षण दोघे ढम्म होतो, तरी मी स्माईल देवून त्याला ग्रीट केले, तोही हसला. पण पुन्हा दोघे शांतच. बस म्हंटले आता पुरे हा अबोला, आपणच बोलावे काही, इतक्यात तो काहीतरी बोलला, मला काही कळलेच नाही मी आपली उगाच हं म्हणाले. लगेच मी माझी ओळख करून देत शेक हंड्ससाठी हात पुढे केला, त्यानेही त्याची ओळख करून देत माझा हात त्याच्या हातात घेतला. हलकासा कापत होता त्याचा हात. कदाचित या नवीन नात्यासाठी तो तयार नव्हता की कोणती शंका होती त्याला या नात्याविषयी? की आणखी काही, i don’t know. मी त्याचा हात firmly पकडत हलकासा त्याच्या हातावर दाब देत मी या नात्यासाठी पूर्णपणे तयार आहे असे सूचित करत माझा trust आणि confidence दाखवला. दोघे काही क्षण असेच स्वतःचे हात दुसऱ्याच्या हातात देवून जगापासून दूर गेलो होतो. आम्ही कुठे आहोत, इथे का आहोत, आजू- बाजूला कोण आहे हे सगळं विसरलो होतो. त्या क्षणाला एकमेकांशिवाय सार जग शुल्लक झालं होतं. आजूबाजूला असलेल्या AC च्या थंड वातावरणात देखील त्याच्या हाताची उब मी जाणवू शकत होते. काही वेळा पूर्वी हलकासा कापणारा त्याचा हात आता स्थिर झाला होता, जणू काही या सुंदर नात्यासाठी आता तो तयार असल्याची अनुमतीच तो दर्शवत होता. मला हा क्षण असाच माझ्या डोळ्यात साठवून ठेवायचा होता.
इतक्यात दरवाजाचा आवाज आला आणि मी ध्यानावर आले, लगेच त्याच्या हातातून माझा हात काढून घेतला. पुन्हा त्याच्याकडे पहिले आणि लाजून लगेच माण दुसरीकडे वळवली. पुढे पूर्ण ट्रेनिंगमध्ये अधून मधून केस कानामागे घेत माण तिरकी करत त्याच्याकडे नजर फिरवत होते, तिरक्या नजनेने त्याच्या हालचाली टिपत होते. तो देखील नकळत अधून मधून माझ्याकडे पाहत होता. चुकून भिडलीच एकमेकांच्या नजरेला नजर तर लगेच दोघ एकमेकांना जाणवू न देत लाजून पुढ पाहत होतो, पण पुन्हा एकमेकांकडे पाहायला मात्र राहवत नव्हतं.
ट्रेनिंग संपल्यावर दोघे एकत्रच बाहेर पडलो. बोलत-बोलतच आमच्या floor वर आलो आणि आपापल्या डेस्क वर गेलो.Read Full Post »

काही दिवसांपूर्वी demat account चालू केले.

नवीन account असल्यामुळे पैसे शेअर मार्केट मध्ये घालायला हात अगदी शिवशिवत होते.
तरी इतरांच्या सल्ल्यानुसार थोडा धीर धरला. तसा काही महिन्यांपासून मार्केट study करतोय. tax  saving साठी Mutual Fund मध्ये पण ३-४ वर्षापासून पैसे टाकतोय. पण actual शेअरची हे पहिलीच वेळ.

आणि एका खास व्यक्ती कडून ‘आतल्या गोटातून’ माहिती मिळाली कि एक शेअर २-३ महिन्यात दुप्पट -तिप्पट वाढणार आहे. पहिले काही दिवस थांबलो. आणि अचानक तो शेअर १०-१५ % ने वाढला. आणि काय मग मी पण टाकले माझे पैसे त्यात. आणि काय म्हणता तो शेअर २५-३०% ने खाली आला. 😦 पुन्हा खाली आला मग पुन्हा दोनदा त्यात पैसे टाकून average केले.

२-३ महिन्यांनंतर काल पहिल्यांदाच तो शेअर माझ्या portfolio मध्ये positive (ग्रीन) दाखवत होता. फार बरे वाटले. 🙂

या वरून मार्केटचा पहिला नियम (जो मी विसरलो होतो) तो सांगतो, कधीही कोणावर विश्वास ठेवू नका, TV वरच्या लोकांवर, वेग-वेगळ्या sites वर, किंवा ब्रोकर्स वर तर मुळीच नको.
हा त्यांचे ऐका. पण शेवटचा निर्णय स्वतः त्या कंपनीचे  fundamentals , future plans, management वगेरे पाहून करा.

Happy Trading.

Read Full Post »

videocon mobile service ची नवीन जाहिरात आज काल IPL च्या सामन्यांदरम्यान दिसते. एरवी ती हिंदी मध्ये असते, पण चेन्नईचा सामना असला कि अधून-मधून ती तमिळ का तेलगु मध्ये येते. का? मी म्हणतो का?
राष्ट्रीय वाहिनीवर प्रादेशिक भाषेतून जाहिरात प्रसारणाची आवशकताच काय?
का अशा वेळेस ‘राष्ट्रीय एकात्मता’ नाही का धोक्यात येत? या वेळेस नाही का राष्ट्रीय भाषेचा अपमान होत?
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी लोकांपुढे मराठीला डावरून हिंदीत शपथ घ्यायला विरोध केला तर राष्ट्रीय भाषेचा अपमान होतो, आणि साऱ्या भारतापुढे हिंदीला डावरून तमिळ का तेलगुत जाहिरात दाखवली तर तो नाही का मग राष्ट्रीय भाषेचा अपमान?
असे दोन मापदंड का?

आता कुठे आहेत हिंदी TV news channel वाले? आता का सगळे मुग गिळून बसले आहेत?

Read Full Post »