Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘घर’ Category

रविवारी संध्याकाळी सकाळने आयोजित केलेल्या पुणे आणि पुनेबाहेरील वेगवेगळ्या flats, row houses, open plots च्या प्रदर्शनाला भेट देवून आलो. सध्या घरांचे दर गगनाला भिडलेले आहेत असे सगळ्यांकडून ऐकले होते, पण ते खरच गगनाला भिडलेले आहेत याची तिथे प्रचीती आली. आजच्या बिल्डर लोकांनी १ BHK घरे बनवायचीच नाहीत असे काही ठरवले आहे कि काय असा सारखा प्रश्न प्रत्येक stall जवळ गेल्यावर येत होता. सगळीकडे २ BHK, ३ BHK, row houses वगेरे होते. चुकूनच एखाद्याकडे १ BHK असायचा, पण तोही विकला गेलेला असायचा. पुण्यातील लोक खरच इतकी श्रीमंत झाली कि बाहेरच्या लोकांनी येवून इतके दर वाढवले, कि हा नुसता दर वाढीचा फुगा आहे? काहीच कळत नव्हते.

काहीच दिवसांपूर्वी ‘दुबई’ मध्ये काय झाले हे सर्वांनी पहिले आहे. पण तरीही पुण्यात काही फरक नाही. इथल्या बिल्डर लोकांनी यातून काही धडा घेतला नाही कि हे लोक खरच बातम्या पाहत नाही कि वर्तमानपत्र वाचत नाही?

परवाच दुबईच्या संदर्भात एक लेख वाचला त्यात मुंबई आणि पुणे हे ‘next Dubai’ असू शकतील असे सांगण्यात आले होते. खरच एवढे दर वाढायचे कारणच काय? ५ वर्षात तिप्पट-चौपट दर वाढावेत? मान्य आहे कुठेतरी IT च्या लोकांचे मोठ-मोठे पगार याला कारणीभूत आहेत, पण असे किती IT चे लोक आहेत पुण्यात? आणि इतके दर IT च्या लोकांनाही आता परवडेनासे झालेत. (मी देखील IT मधलाच एक आहे).

बर दुबई आणि पुण्यातील एक फरक म्हणजे तिथे लोक investment म्हणून घर घेतात, पण इथे लोक स्वतःला राहायला म्हणून घर घेतात. investment म्हणून सुद्धा घेणारे आहेत पण त्यांची नक्की संख्या किती हे नाही ठावूक.

आणखीन एक. २०११ एप्रिल नंतर income tax चे नियम बदलणार आहेत. आणि त्यानुसार सध्या जे housing loan चे premium ८० C मध्ये दाखवून tax वाचवता येतो तसे करता येणार नाही. आणखीन बरेचसे नियम बदलणार आहेत.(मी कुठे चुकत असल्यास कृपया प्रतिक्रिया देवून सांगावे). त्यामुळे जे लोक investment म्हणून घर घेतात, किंवा tax वाचवायला घरे घेतात ती २०११ पासून नवीन घर घेण्याच्या फंदात पडणार नाहीत. त्यामुळे काही लोकांच्या मते घराची मागणी कमी होवून दर कमी यायची शक्यता आहे.

हे सगळे विचार डोक्यात घेवून फ़क़्त काय दर आहेत हेच पाहायला मी प्रदर्शनाला गेलो होतो. तिथे बरीच गर्दी होती. अगदी  तुडुंब गर्दी, इतकी कि पार्किंग ची जागा कमी पडल्याने दरवाजा बंद करावा लागला. अनेक stall होते. अगदी ११-१२ लाखापासून दीड-दोन करोड पर्यंतची घरे होती. ११-१२ लाख म्हंटल्यावर अगदी उत्साही झाला असशीला ना, काही गरज नाही. हे flats म्हणजे पुण्यापासून अगदी दीड दोन तास लांब अशा जागी. उदाहरणार्थ तळेगाव.

इतके लोक खरच घरे घेण्यासाठीच आली होती कि आणि कशासाठी हा प्रश्नच पडला, कारण कॉलेजची मुले-मुली किंवा नुकतेच पुण्यात जॉबसाठी आलेली मुले-मुली देखील भरपूर प्रमाणात होती. छान छान मुली अनेक stall वर त्यांच्या project ची माहित सांगायला होत्या. (त्यांच्याकडे पाहून का होईना इथवर आल्याचे सार्थक झाल्याचे वाटत होते :-)).

वाकडला २५ ती ३० लाखाला २ BHK , बाणेरला ३०- ४० पासून अगदी ६० लाखापर्यंत २ BHK होते. आंबेगाव, कोंढवा ला २२-२३ पर्यंत २ BHK , सिंहगड रोड ला ३०-४०-४५ लाखापर्यंत २ BHK . कर्वे रोड, बावधन, हडपसर या ठिकाणाचे दर माहित करूनही घेण्याचे भानगडीत मी पडलो नाही.

आता recession – recession येवूनही गेले तरी या बिल्डर लोकांनी काही दर कमी केले नाहीत. त्यामुळे आत्ताचे हे गगनचुंबी घरांचे दर पुढे हा फुगा फुटला तर कमी होतील ?(असे झाले तर आता किंवा आधी घर घेतलेल्या लोकांचे काय होईल?), कि असेच राहतील? कि असे काही झालेच नाही तर अजुनची वाढतील?

सध्याच्या महागाईशी मुकाबला करण्यासाठी Reserve Bank ने interest rates वाध्वयाचीही सूचना केल्याचे ऐकले.

हे सगळे पाहून खरच सामान्य पुणेकर यापुढे त्याच ‘स्वतःच’ घर घेवू शकेल?

Advertisements

Read Full Post »