Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘प्रेम / मुलगी’ Category

सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये mail box उघडला. एका मित्राचा forwarded e -mail आलेला. subject होता, “जेव्हा एखादी तरुणी…”. लगेचच e -mail उघडला. आणि जे काही पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसेना. अहो तो forwarded e -mail म्हणजे चक्क माझ्या ब्लोग वरचा एक पोस्त होता. cc आणि bcc लिस्ट मध्ये ढिगान भर लोकं होती. आधीही बऱ्याच जणांना गेला होता तो e -mail . बयाच जणांचे ‘छान”, “nice mail”, “must read” वगेरे comments होते. wow …….. आज पर्यंत अनेक forwarded e -mails वाचले होते, पण स्वतःचाच पोस्त असा वाचायला मिळाल्यावर फार आनंद वाटला. छान वाटत. 🙂 माझ्या ब्लोग्गीण चा आजचा दिवस म्हणजे सोनियाचा दिवस होता.

Advertisements

Read Full Post »

दुपारची वेळ होती. बाहेर रखरखीतउन पडले होते. मी मस्त आरामात AC मध्ये काम (?) करत होतो. इतक्यात माझा mobile वाजला. एका नामांकित हॉस्पिटलमधल्या blood bank मधून एका (सुंदर आवाजाच्या) मुलीचा होता तो कॉल. एका लहान मुलीसाठी O-ve रक्ताची  तातडीने गरज होती. माझा रक्त गटहि O-ve च होता. तसा मी अशा emmergency च्या वेळी आवर्जून रक्तदान करतो. शेवटी आम्ही O-ve वाले हो, आमच्या लोकांना आम्हीच कामी पडतो.

मी संध्याकाळी येतो म्हणालो, पण तीकडून तातडीची गरज आहे असे कळाले. मग मी आर्ध्या तासातच पोहोचतो म्हणालो आणि लगेच निघालो. माझ्या कंपनीपासून हॉस्पिटल जवळच असल्याने जेमतेम १५ मिनिटात मी पोहचलो.
तिथे गेल्यावर त्या फोन मधल्या सुंदर आवाजाला सुंदर देहही आहे असे जाणवले. 🙂 मी लवकर आल्याबद्दल तिने माझे आभार वगेरे मानले. (स्मित हास्य) मग नॉर्मल forms वगेरे भरून झाल्यावर दुसऱ्या एका मुलीने (सिस्टर वगेरे म्हणतात ना त्या …… या मुलींना सिस्टर वगेरे म्हणणे अवघड जाते हो  🙂 ) हिमोग्लोबिन, रक्तदाब तपासाला. आणि मग रक्त काढण्यास सुरवात झाली. रक्त काढताना हातावर काही दाब वगेरे येतो का अशी विचारपूस करण्यात आली (‘ती’च्याकडून). तिथे मग आणखीन २-३ मुली जमल्या. त्यांचीही इतर मुलींप्रमाणे चर्चा चालू झाली. तिथला विषय होता ‘hair cut’. त्यामधल्या एका मुलीने नवीन hair cut केला होता. मग तिचा hair-cut कसा आहे या वरून कोणता hair cut मुलींनी ठेवावा वगेरे गोष्टीवर चर्चासत्र झालं. इतक्यात रक्त भरण्याची पिशवी भरल्याची बीप वाजली, आणि सगळ्या मुली पुन्हा आपापल्या कामाला लागल्या.
रक्तदान झाल्यावर मला चहासाठी विचारण्यात आले. मी फक्त चहाच घेईन असे सांगितल्यावर मला चहा सोबत बिस्कीट घेण्यासाठी तिच्याकडून आग्रह करण्यात आला. मी नको म्हंटल्यावर नाचणीचे का कुठले तरी बिस्कीट घ्या वगेरे म्हणण्यात आले. मग मी उगाच तिला नाही कसं म्हणायचं म्हणून एकंच बिस्कीट मागितले तर अजून २ घ्या म्हणून दोनाची चार बिस्कीट देण्यात आली. (एक स्मित हास्य … थोडेसे  broad) मग मी कुठे जॉब करतो वगेरे विचारपूस झाली.
आता पर्यंत आमचे मराठीतूनच संभाषण चालले होते. कंपनीचे नाव सांगितल्यावर (कदाचित मी एक संगणक अभियंता आहे हे समजल्यावर) अचानक तिच्याकडून इंग्लिश मध्ये संभाषण चालू झाले. (पण इंग्लिश हि गोड बोलते हो ‘ती’). आधीच या साऱ्या आदरा तीथ्याने मला एकदम भरून आल्यासारखे झाले होते, तेव्हा काय बोलावे हेच समजेना. मग माझ्या कंपनीत नुकतेच रक्तदान शिबीर झाल्याचे सांगण्यात आले. या सगळ्या गोष्टी बोलत असतानाच चहा (आणि ४ बिस्किटेहि ) कशी संपली ते समजलेच नाही.
मग मला रक्तदानाबद्दल हॉस्पिटलकडून एक प्रशातीपत्रक, एक pocket diary (तिच्या भाषेत ‘छोटी भेट’) देण्यात आली. अगदी मनापासून हं. (स्मित हास्य).  जाताना छानसं ‘bye’ करण्यात आलं.

मी या आधीही त्याच हॉस्पिटलमध्ये  रक्तदान केले आहे, पण अशी special treatment, मला या आधी कधी अनुभवायला मिळाली नव्हती.
मी यावेळेस इतका भारावून गेलेलो कि, “रोज रक्तदान केले तर चालेल का हो” असे विचारू वाटत होते. 🙂

Read Full Post »

तुम्ही नेहमी प्रमाणे महिन्यातून एकदा पुण्याहून घरी बसने निघता. ४-५ तासाचा प्रवास असतो. वाटत मस्तपैकी एखादी छान मुलगी जवळ येवून बसावी. आणि काय …. खरच एखादी मस्त मुलगी जवळ येवून बसते. आपण नेहमी प्रमाणे reservation करून बसलो असतो, ती येते, जवळ पासच्या seats पाहते, आणि स्मित हास्य करत म्हणते, “इथे कोणी बसले आहे का?”. अहो काय मजाल आहे “होय” म्हणायची. आणि असलाच कोणी तर उठवू ना आपण त्याला. “नाही नाही, कोणी नाही” म्हणत आपण मोकळ्या seat वरही तिला अजून जागा करून देतो. ती तिची bag वगेरे वर ठेवते. केस वगेरे सावरते. comfortable होते. आपण हे सगळं तिरक्या नजरेने पाहत असतो. 🙂

आता पुढे काय? काहीतरी करून तिच्याशी बोलायला सुरवात करायची. simple म्हणजे बस सुरु झाल्यावर १०-१५ मिनिटांनी, “खिडकी (बसची) उघडी असेल तर चालेल ना” असे विचारायचे. मग ती, “चालेल. no problem” म्हणते. (पुन्हा एक स्मित हास्य). मग तू सांगलीचीच/कोल्हापूरचीच (तुम्ही ज्या गावाला जात असाल त्या प्रमाणे) का गं? विचारून ओळख वाढवयास सुरवात करावी. असे करत करत, आधी कुठल्या कॉलेजला होतीस, गावी कुठे राहतेस, तुला ती (पूजा, अमृता वगेरे कोणतेही common नाव) माहित आहे का गं? पुण्यात कुठे जॉब करतेस, कुठे राहतेस, कोणत्या मेस ला जातेस? रूम पार्टनर कोण आहेत? कोणत्या गावाचे? वीक-एन्डला काय करतेस …करत करत पुन्हा पुण्याला कधी निघणारे ते विचारावे आणि आपणही त्याच वेळी निघावे. आणि मग पुन्हा पुण्यात येताना, जवळ ती नसली तरी, मध्ये गाडी थांबते तिथे तिला भेटावे. अरे what a coincidence वगरे म्हणावे 🙂 तिचा mail -id आधी घ्यावा. मग तिचा positive response वाटत असेल तर लगेच cell number घ्यावा. वीक-एंडचा प्लान विचारावा. मग पुण्यात deccan ला भेटावे, पुढे z-bridge, संबाजी पार्क, लक्ष्मी रोड, सारस बाग, तुळशी बाग करत करत खडकवासला, सिंहगड, लोणावळा पर्यंत मजल मारावी. मग प्रत्येक वीक-एंडला भेटावे, तासंतास mobile वर बोलावे, movies ला  जावे, वगेरे वगेरे करत एका valentine day ला तिला propose करावे, तिचा होकार  मिळाल्यावर, पुढच्या आयुष्याची planning करावी. मग एक दिवस घरी तिच्या विषयी बोलावे. पहिल्यांदा आपल्या इतक्या शांत सरळ पोरग्या कडून ‘हे ‘ ऐकल्यावर थोडा घरच्यांना धक्काच बसेल, कदाचित थोडा विरोधही होईल, तिच्या घरच्यांकडूनहि  होईल, थोडी तनहाईहि सहन करावी लागेल , पण नंतर घरचे काय मुला-मुलीच्या मनाविरुद्ध जाणार आहेत, आणि मग घरचेच पुढाकार घेवून दोघांच ‘शुभ मंगल’ लावून देतील. आणि मग …….

असे सगळे प्लान्स ती शेजारी येवून बसल्यावर चालू होतात. (अजून यातलं काहीही घडलं नसतं, फ़क़्त ती जवळ येवून बसलेली असते) 🙂
पण अजून गाडी चालूच होते तोवर तिची एखादी मत्रिण जवळच बसली असते म्हणून ती seat बदलून तिथे बसते (आणि जेमतेम १०-१५ मिनिट काय ते बोलतात, आणि मस्तपैकी झोपतात), किवा एखादी दुसरी बाई जवळ असते म्हणून ती seat बदलून घेते (जणू काही मी तिला काही करणारच आहे), किवा जवळ बसलेल्या एका पुरुषाला वाटते म्हणून तो तिला जवळ असलेल्या बाई जवळ बसायला सांगतो, आणि नाहीच कोणी उठवलं तर दारा-दूर झोपतात  या पोरी, आणि शेवटचा stop आल्यावरच उठतात.

असेच काही आज काल होत आहे माझ्या बरोबर. एवढी लग्नापर्यंत पाहिलेली स्वप्ने एका क्षणात चकनाचूर होतात.

हे असा होतं बघा.

Read Full Post »