Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘Uncategorized’ Category

२ ओक्टोम्बर, गांधी जयंती, सरकारी सुट्टीचा दिवस. त्यात या वर्षी वीकएंड ला जोडून आलेली त्यामुले बरयाचशा लोकानी लॉन्ग वीक एंडचा प्लान केला होता. त्यादिवाशिच TV वर शशी थरूर यांचे भाषण ऐकले, ते म्हणाले, गांधी नेहमी म्हणायचे ‘वर्क इज वर्कशिप’, आणि आपण लोक त्यांचीच जयंती सरकारी सुट्टी म्हणुन एन्जॉय करतो.

आहे ना गम्मत.

खरच विचार कर्न्याजोगी गोस्ट आहे.

Advertisements

Read Full Post »

आज काल राज आणि उद्धव (दोघेही ठाकरे) असे का वागतात याचे आश्चर्य वाटते.
दोघेही ‘मराठी’ माणसासाठी भांडतात (म्हणे), मग दोघे वेगळे वेगळे का? एकत्र मिळून भांडा ना इतरांशी. पण ते शक्य नाही. कारण मग श्रेष्ट कोण हे कसे समजणार, भले मग त्यासाठी मराठी लोक विभागले जाओ आणि दोघांच्या भांडणात तिसरा विजयी होवो. आता हे समजायला दोघे काय इतके राजकीय अ-परिपक्व नाहीत हे खरे, पण ego येतो ना अडवा.
दोघांचे थोडे-थोडे म्हणणेही तसे पटते, पण शेवटी दोघे कुठेतरी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी माणसालाच खाईत ढकलत आहेत असे वाटते.

एक मराठी माणूस म्हणून याचा फार त्रास होतो. specially ते हिंदी-इंग्लिश चानेल वाले दोघांच्या भांडणाला अजून मीठ-मसाला लावून सांगतात तेव्हा. ‘राज ने फिर से उगला झहेर’ वगेर वाचून खरच वाईट वाटत.

तसा राज चा आक्रमकपणा impress करतो, लोकांना संघटीत करायला, पक्ष वाढवायला, लोकांवर आपले विचार बिंबवायला, सभा जिंकायला तो नक्कीच कामी येतो. पण पुढे जाऊन राज्य चालवायचे असेल तर, समाजाला दिशा दाखवायची असेल, योग्य निर्णय घ्यायचे असतील तर, उद्धवचा शांतपणा, समंजसपणा पण तितकाच महत्वाचा.

देव दोघांना सूद-बुद्धी देवो, आणि दोघे एकत्र येवून मराठी माणसाच्या विकासासाठ्ठी काही करो हीच श्रींच्या पुढे प्राथना.

Read Full Post »

नमस्कार.

आज काल सगळेच लोक ब्लोग लिहित आहेत, म्हणून म्हटलं चला आपण पण प्रयत्न करून पाहावा.
पण लिहायचं काय?
खरच लिहायचं काय?

काहीजन आपले अनुभव लिहितात, काहीजन आपल्या आठवणी, तर काही आपले विचार ….
मी काय बर लिहू?
….. पाहू जमेल तसं काहीतरी लिहित जाईन.

पण लिहीन हे नक्की.
डोक्यात काहीतरी शिजतंय….. पूर्ण शिजून झाल्यावर आपल्यापुढे वाडेन.

– तो

Read Full Post »

Hello world!

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!

Read Full Post »