Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

वय

मागच्या आठवड्यात माझ्या कंपनी मध्ये ‘अनिल करमरकर’ यांचा saxophone या वाद्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम एकदम मस्त झाला.
saxophone हे जसे बासरी वाजवतात तसे तोंडातून फुंकरने वाजवतात, infact बऱ्याचदा फुंकर ताकदीने द्यावी लागते.
अनिल करमरकर यांचे वय जवळ पास ५८ असेल, या वयातही ते इतक्या ताकदीने आणि इतका सुंदर saxophone वाजवतात, या अनुषंगाने कार्यक्रमादरम्यान ‘वय’ विषयावर दोन किस्से सांगण्यात आले.
पहिला म्हणजे अनिल करमरकर यांचे गुरु सध्या वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा सुंदर saxophone वाजवतात. त्यांच्या ७५ व्या वाढदिवशी एका व्यक्तीने कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर म्हंटले होते, “हे वयाच्या ७५ व्या वर्षी देखील इतका सुंदर saxophone वाजवतात. आपण पहिले म्हणजे ७५ जगू का या बद्दल शंका आणि जगलोच तर तेव्हा वाढदिवसाला saxophone पकडायचे तर सोडाच पण केक वरच्या मेणबत्त्या विझवायला तरी तोंडातून फुंकर मारता आली तरी नशिबाच म्हणावे लागेल.” 🙂
दुसरा किस्सा म्हणजे, महर्षी कर्वे यांच्या ९९ व्या वाढदिवसाला एक तरुण पत्रकार त्यांची मुलाखत घ्यायला गेला होता, मुलाखत घेवून झाल्यावर जाताना तो म्हणाला, “महर्षी मी आशा करतो कि तुमच्या १०० व्या वाढदिवसाला देखील मला तुमची मुलाखत घ्यायला मिळेल”. त्यावर महर्षी लगेच म्हणाले, “का रे तुला काय झाले आहे, चांगला तरणा तर दिसतोयस”. 🙂

Advertisements

(bug) बग आया रे

सकाळी कंपनीमध्ये आल्याआल्या नेहमीप्रमाणे आउट लुक उघडलं तर एका नवीन फीचरची ‘बग’ माझ्या नावावर assign झाल्याची मेल आली होती. आणि एकदम एक पूर्वीची गोष्ट आठवली.

मी माझी पहिली कंपनी जॉईन करून ५-६ महिने झाले होते. कंपनी तशी बाहेरची होती. इथे भारतामध्ये शंबर सव्वाशे लोक होते. माझ्या विंग मध्ये जवळ पास ३५-४० लोक बसत असतील. वातावरण देखील तसे खेळीमेळीचे होते. त्यामुळे अनेकदा लहान सहाण गोष्टींसाठी ई-मेल वगेरे पाठवायची तशी गरज भासायची नाही, एका हाकेवरच गोष्टी व्हायच्या. 🙂

असेच एका दिवशी एका नवीन फीचरविषयी टीम सोबत चर्चा करून आम्ही पुन्हा आपापल्या cubicle मध्ये आलो. ५-१० मिनिट होताच तोवर पलीकडच्या टेस्टिंग टीममधल्या एका मुलाने, “अरे वेणू एक बग मिल गया रे”, म्हणून त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आम्हाला (दुसऱ्या एका जुन्या फीचरचा) बग कळवला. त्यावर माझा टीममेट, “क्या रे, अभी तो फीचर discuss किया हे, बग आना शुरू भी हो गये”. आणि काय दोन मिनिट सगळी विंग हसत होती.

शिक्षण झाले, दोन-चार वर्ष नोकरी झाली, वय वर्ष २५-२६ओलांडले की नातेवाईकांकडून, ओळखीचांकडून लग्नासाठी विचारणा होवू लागते. इतर लोकच (आपले) ‘यंदा कर्तव्य आहे’ असे जाहीर करून टाकतात, घरचे देखील लगेच हो ला हो म्हणतात. घरच्यांचेदेखील प्रयत्न चालू होतात. काळ बदलला तसा घरच्यांकडून देखील कशी मुलगी हवी हे विचारले जाते. अशा वेळेस आमच्यावेळेस नव्हतं बर का असं, वडिलांनी सांगितलं त्या मुलीशी केलं लग्न, मांडवातच पहिल्यांदा पाहिलं तुझ्या आईला, वगेरे सांगणारे जुन्या सिनेमातले ‘बाप’ आठवतात, आणि आपल्या वडिलांकडून विचारला गेलेल्या या प्रश्नाबद्दल त्यांचा अभिमान वाटतो. 🙂
पण तरीही अचानक आलेल्या या बाउन्सरमुळे थोडा गोंधळच होतो. दिसायला सुंदर, चांगल्या घरातली, चांगल्या संस्कारांची, graduate वेगेरे नेहमीची (पेटेंट) उत्तरे देवून आपण बाउन्सर तात्पुरता का होईना चुकवतो. पण असे बाउन्सर आता वरचेवर येणार हे माहित झालेले असते.
यक्ष प्रश्न असतो तो म्हणजे “नोकरी करणारी” की “घरकाम करणारी”(हाउस वाईफ) करणारी मुलगी?.
लहानपणापासून आईला नेहमी घरीच पाहिलेले असते, त्यामुळे आईसारखीच घर सांभाळणारी हे उत्तर चटकन पुढे येते. पण लगेच पुण्यात राहण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची यादी पुढे येते. एकटे असतो तेव्हा मित्रांबरोबर रूम शेअर करून राहत असतो, लग्नानंतर मात्र वेगळा flat हवा. नवीन घ्यायचा म्हणाले तर EMI आला, भाड्याचा म्हटलं तर महिन्याचे भाडे आले. बर flat झाला मग तो मोकळा ठेवून कसा चालेल. फर्निचर, TV, फ्रीज, वाशिंग मशीन आले. नवीन (काय आणि जुनी काय) बायको म्हणजे तिची हौस-मौज आली. साड्या, ड्रेस, चपला, सुंदर दिसण्याचे साहित्य, (अनेक गरज नसलेल्या वस्तू), शोप्पिंग, सिनेमा, नाटक, बाहेरचे जेवण, traveling हे ना  ते शंभर शे साठ खर्च आले. आता हे सगळे खर्च तराजूच्या एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात आपली salary ठेवली तर ते खर्चाचे पारडे धापकण खाली जाते. मग आपणच आपली समजूत काढतो, म्हणतो पूर्वीचा जमाना वेगळा होता. बाबांच्या पगारात घर आरामात चालायचे, पण आता तसे नाही. आपल्या पगारात आख्खे घर काय नुसता आपला आणि आपल्या बायकोच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा खर्च निघानेपण अवघड. आपल्याला तर नोकरी करणारीच बायको बरी.
असे आपले मत पक्के होते इतक्यात आपण flashback मध्ये जातो.
सकाळी आपण हंतरुणात लोळत असतो. सकाळी (लवकर?) उठायला गजराच्या घड्याळाची गरज लागत नाही. आईच उठवते. तोंड धुवून येतो तोवर समोर गरम गरम चहा तयार. अंघोळीसाठी पाणी काढून ठेवलेच असते. अंघोळ झाली कि नाश्ता तयार. कपडे धुवून इस्त्री करून ह्यान्गरला लटकत असतात, ते घातले कि निघालो बाहेर हुंदडायला. लहान पणापासून हीच सवय असते (बहुतेक जणांना). आणि लगेच आईचे ते शब्दही आठवतात, “अरे दादू स्वतःची कामे स्वतः करायला शीक, नंतर लग्न झाल्यावर बायको नाही करणार हो ही सगळी कामे.” पण लहानपणी आपणवेगळ्याच जगात असतो. तेव्हा आपल्याला नेहमी वाटते आई जशी बाबांची सगळी कामे करत आली आहे तशी आपली बायकोही करेल (असा होणाऱ्या बायकोविषयी गोड गैरसमज असतो).
flashback मधून आज मध्ये आल्यावर नोकरीवाल्या बायको वीषयी पुन्हा ना ना सवाल पुढे येवून थांबतात.
पुन्हा आता त्याच प्रश्नावर आपण आले असतो. “नोकरी करणारी” की “घर सांभाळणारी”?
नोकरी करणारी बायको उठवेल का आपल्याला सकाळी लवकर? चहा, आंघोळीचे पाणी, नाष्टा, इस्त्रीचे कपडे सगळं काही मिळेल का आयत तयार?
संध्याकाळी ऑफिस मधून थकून आल्यावर मिळेल का गरम गरम चहा आणि कांदा भाजी? (अधिक माहितीसाठी माझ्या या पोस्त मध्ये पहिला para पहा)
आईसारखे लज्जतदार खाणं बनवेल का ती? आईने जशी माझी, माझ्या बहिणींची काळजी घेतली, जे संस्कार आमच्यावर केले ते करेल का ती आमच्या मुलांवर?
‘मी नोकरी करते’ हा attitude (टेंभा) (सगळ्या मुलींमध्ये नाही पण काही… का बहुतेकीत :-)) असल्यास आपल्या घरातल्यांशी, नातेवाईकांशी आणि हो आपल्याशी जमवुन घेईल का ती ? आई बाबांना सांभाळेल का ती?
हे ना ते अनेक प्रश्न डोक्यावर तांडव घालतात.
पण थोडा विचार केला तर समजते बऱ्याच गोष्टी आता बदलल्या आहेत. पूर्वी घराची जबाबदारी आईवर आणि बाहेरची बाबांकडे असायची. अशी सरळ लक्ष्मणरेषाच होती. आई बाहेरच्या गोष्टीत लक्ष घालत नसे, आणि बाबाही घराच्या बाबतीत लुडबुड करत नसत. जवळपास प्रत्येक घरी हेच चित्र होते.

पण आता मात्र तसे नाही, काळ बदलला आहे. आज मी स्वतः माझ्या होणाऱ्या बायकोने बाहेर नोकरी करावी असे म्हणतो, मग साहजिकच मला तिच्याकडून आईने केलेल्या सगळ्या कामांची अपेक्षा करता येणार नाही. ती जर बाहेरच्या कामात लक्ष घालत असेल तर साहजिकच मला घराच्या कामात (जमेल तितके) लक्ष द्यावे लागेल. जशी ती घराची आर्थिक घडी बसवायला मला मदत करते तशी मला तिला घराची घडी बसवायला मदत करावी लागेल.
अन्यथा तिच्याकडून किती म्हणून अपेक्षा ठेवायची मी? बाहेर नोकरीपण कर आणि घरीची पण सगळी कामे कर. मला मस्त मस्त जेवण पण बनवून घाल, तोंडातून पडल्या पडल्या मला गोष्टी आणून दे. आणि मी काय करणार? नुसते हुकम सोडणार? ….याला काहीच अर्थ नाही.

थोडक्यात काय तर थोडी फार adjustment केली तर कुठे तरी गोष्टी सोप्या होतील असे वाटले. लग्नानंतर सुखी आयुष्याचा हाच मूलमंत्र आहे म्हणे.
हं आता ‘ती’चा देखील हाच दृष्टीकोन (attitude) असेल तर मग’च’ गोष्टी खरच सोप्या होतील.

पाहू काय होते ते?

हेमंत आठलेंचा हा पोस्त वाचला आणि पुन्हा संगणक क्षेत्रात मराठी लोकांना नोकरी मिळण्यासाठी काहीतरी करावे हे विचार पुन्हा डोकं वर काढू लागले.
संगणक क्षेत्रामध्ये नवीन लोक घेण्यासाठी कंपनी त्यांच्या कॉलेज मध्ये जाते ज्याला कॅमपस रेक्रुइत्मेन्त म्हणतात. ज्या लोकांना त्यातून नोकरी मिळते ते नशीबवान. पण ज्या लोकांना नाही मिळत किंवा ज्या लोकांच्या कॉलेजमध्ये कंपनीच येत नाही त्यांना मात्र नोकरीसाठी फार कस्त करावे लागतात. अनेक वेळा कुठे नोकरी आहे हेच कळत नाही, किंवा काल इथे नोकरीसाठी interviews होवून गेले असे कळते. कंपन्यासुद्धा आपल्या कर्मचार्यांनाच नोकरीबद्दल सांगते आणि त्यांचे मित्र कोणी असतील तर त्यांना नोकरी साठी बोलावते (रेफेरल वाल्क-इन).
याच पद्धतीमुळे आपल्याला एकाच कंपनीमध्ये एका विशिष्ट भाषेचे, समाजाचे लोक सर्रास दिसतील. म्हणजे नोकरीसाठी जागा असते पुण्यात, पण त्याची माहित पुण्यातील कोणाला समजण्याआधी ती हैदराबादपर्यंत गेलेली असते आणि लगेच तेथून एखाद मुलगा येवून ती नोकरी घेवूनही जातो आणि इथले त्यांचे लोक सुद्धा त्याला इथे नोकरी मध्ये प्रस्थापित व्हायला मदत करतात, थोड्याफार चुका माफ करतात. (आपले मराठी तरुण मात्र प्रत्येक कंपन्यांच्या पायऱ्या चढत त्यांचे बूट झिजवतात). अन असे हे सर्रास चालते हं. अशावेळेस देश, राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी सोयीस्कर बाजूला ठेवल्या जातात, पण इथे बाकीच्या वेळेस मात्र आम्हाला राष्ट्रीय एकात्मतेचे धडे शिकवले जातात. असो. तो या पोस्टचा विषय नाही.

तर मला इतकेच सांगायचे आहे कि आपल्याला एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी जागा आहे असे माहित असेल तर ती आपल्या मराठी मित्रांना नक्की कळवा. आपल्या कंपनीत जर अशा जागा असतील तर आपल्या मित्रांना त्या आवर्जून कळवा. तसेच आपल्या ब्लोग चा सुद्धा अशा जागा इतर मराठी लोकांना कळवण्यासाठी वापर करावा. थोडी फार प्राथमिक मदतही त्यांना करा. कोणी मराठी व्यक्तीने त्याचा resume पाठवला तर शक्य तेवढ्या ठिकाणी तो जाईल असा प्रयत्न करा. कोणजाणे आपल्या अशाच प्रयत्नातून आपल्या एका मराठी बांधवाला ती जागा मिळून जाईल. इथे इतर कुणा ‘योग्य’ व्यक्तीला त्या जागेसाठी डावराने हा मुळीच हेतू नाही. पण फक्त एका मराठी व्यक्तीला त्या जागेची माहिती देणे आणि थोडी फार प्राथमिक मदत करणे हाच आहे. पुढे तो आपल्या ज्ञानावर  ती मिळवेलच.

एका नोकरी विषयी :
sqs-india.

Testing साठी requirement आहे.
sqs-india.com वर resume upload करा.
जागा:  नळ स्तोप जवळ

‘तो’ आणि ‘ती’ भाग ९

 ती  : काल सकाळी, pantry मध्ये चहासाठी गेले होते, तेव्हा आधी ३-४ जणे तेथे चहाच्या मशीन मधून चहा घायला उभे होते. मी देखील कप घेवून उभी राहिले. इतक्यात ‘तो’  आला. तोही कप घेवून उभा राहिला, माझ्या जवळच. अर्धा-एक मिनिट दोघे चहासाठी नंबर येईल याची वाट पाहत उभे राहिलो. मग मीच त्याला स्मित हास्य दिले. तोहि हलकासा हसला. पण वाटले काही उपयोग नाही. तो नेहमीप्रमाणे शांतच उभा राहील, आणि चहा घेवून निघून जाईल. म्हंटले आपणच बोलावे आज. काय बर बोलावे याचा विचार करत होते इतक्यात ‘हाय’ म्हणून आवाज आला. बघते तर काय चक्क त्याने मला ‘हाय’ म्हंटले. तो माझ्या समोरच होता पण मी आपली त्याच्याशी काय बोलावे या विचारात होते, त्यामुळे पहिल्यांदा काही कळलेच नाही. पण समोर तोच होता आणि ते त्याचेच शब्द होते. माझा माझ्या कानावर आणि डोळ्यावर विश्वासच बसेना, त्याने चक्क स्वतःहून मला ‘हाय’ म्हंटले. wow…. अखेर आली म्हणायची याला थोडी अक्कल.  पण त्यासाठी आज काय सूर्य पश्चिमेला उगवला की काय? 🙂 पश्चिमेला असो वा उत्तरेला, पण तो स्वतःहून माझ्याशी बोलला. आणि यासाठी सूर्याच्या उगवण्याची दिशा कारणीभूत असेल तर जरूर सूर्याने रोज पश्चिमेला वा उत्तरेला उगवावे. 🙂 पण त्याच्याकडून ‘हाय’ म्हणणे  मला बिलकुल अपेक्षित नव्हते. तो जरा मितभाषी आहे. एवढा नाही मुलींशी बोलत, म्हणजे नाही दिसत. मग मीही स्मित हास्य देत “हाय” म्हणाले. (ते हास्य स्मित पेक्षा जरा जास्तीच होते :-)). तोवर आधीच्या लोकांचे चहा घेवून झालेले, मी चहा घेतला, त्यानेही घेतला. आता त्याच्या बरोबर galary मध्ये चहा घ्यावा असा विचार करते  इतक्यात “अगं तनु तुला कळले का?” असे म्हणत एक ब्रेकिंग न्यूज घेवून माझी मैत्रीण अमृता आली. ही अमृता नं, नको त्या वेळी कडमडते. हे पाहून ‘तो’ ही निघून गेला. पण आज गाडी कुठेतरी रुळावर आली असे वाटले, आता अशीच जोरात धावूदे म्हणजे झालं.

तो : सकाळी चहासाठी pantry मध्ये जातो तर काय पुढे ‘ती’ होती. काही करून आज तिच्याशी बोलायचेच म्हंटले. परवा लिफ्ट मध्ये झालेल्या प्रकाराबद्दल आधीच स्वतःला भरपूर शिव्या घातलेल्या. एवढा देवाने योग घडवून आणलेला, दोघंच लिफ्ट मध्ये होतो आणि माझ्या तोंडातून ब्र देखील निघाला नाही. ‘काही नाही उपयोग रे रोहीत्या तुझा, तुझ्या हातून काही होणार नाही. तू आपला ‘ में और मेरी तन्हाई’ करत बस,  चुल्लू भर पाणी में डूब जा’ वगेरे  बोल रूम मेट्स कडून ऐकायला मिळाले होते. हो रूम मेट्सला तिच्या बद्दल बोललो. परवा असाच मुली, प्रेम यावर रूममध्ये चर्चासत्र चालू असताना मी ‘ती आणि  तीच्या बद्दलचे माझे विचार’ हा विषय घेवून त्या चर्चासत्रात उडी मारली.  आणि त्यानंतर विचारू नका, हे माझे रूम मेट्स मी जणू काही आत्ताच शाळा संपवून कॉलेजमध्ये पहिले पाऊल ठेवले असल्यासारखे मुलीला पटवायचे नाना तर्हेचे फोर्मुले सांगत असतात. हा आता  त्यांच्या बोलण्यामुळे कधी प्रेरणाहि  मिळते तर कधी इर्षा पण होते.

असो पण आज तिच्याशी बोलायचे हे नक्की. चहासाठी उभा राहीलो. तीने माझ्याकडे पाहून नेहमीची पेटेन्ट स्माईल दिली. त्याने तर मला आणखीणच हुरूप आला. ‘हाय तनु’ नको तनु नको, तन्वीच बरे. पहिल्यांदा एकदम तनु जरा जास्तीच होते.  ‘हाय तन्वी’ ‘हेलो तन्वी’ ‘Excuse mi तन्वी’. Excuse mi काय? तिला काय request करतोयस का?  ‘हाय तन्वी’ च बरे. असे तिच्याशी कसे बोलायचे याचे विचार चालू होते. आणि अखेरीस मी म्हंटले. हो हो मी म्हंटले. ‘हाय’.  हं …… म्हणजे नुसतेच ‘हाय’ म्हंटले. पण म्हंटले खरं. दोन सेकंद तिचा काही प्रतिसादाच नाही, मी जाम tension मध्ये. आमचे हृदय नेहमी प्रमाणे ८० प्रती  मिनिटाच्या वेगात.  पण मग तीही हसली आणि ‘हाय’ म्हणाली. हुशशश….. माझा जीव भांड्यात पडला. खळळळ……..  आवाजही जोरात आला. हममम… कोणाच्यातरी  हातातून कप पडल्याचा आवाज होता तो. 🙂 पण शेवटी मी गड सर केलाच. सर नाही म्हणता येणार पण पहिले पाऊल तरी टाकले हे नक्कीच.

तुम्ही कामात व्यस्त आहात, ‘bug’ solve करण्यासाठी आटापिटा करत आहात, आपल्या प्रियसीबरोबर एकांतात बसला आहात, आणि अशा वेळेस नेमका एखाद्या क्रेडीट कार्ड कंपनीचा, बँक मधून लोन साठी किंवा विमा कंपनीचा फोन येतो. अशा वेळेस तिकडची व्यक्ती काही केल्या ऐकायला तयार नसते, माहिती सांगण्यासाठी हट्टी असते.

अशा वेळी त्यांना कसे टाळायचे.

अशा वेळेस, “मला हिंदी आणि इंग्रीजी येत नाही, कृपया मराठीतून आपली माहिती द्या.” असे नम्र भाषेत सांगावे. अनेकदा हि लोकं इंग्रजाळलेले असतात त्यामुळे, त्यांना मराठी यायची शक्यता कमीच असते. आणि जर का एखादा असलाच मराठी मुलगा किंवा मुलगी तर नंतर मला यात फारसा रस नाही म्हणावे.

यातून दोन फायदे. एकतर लगेच फोन बंद करत येतो, आणि जर का सगळ्या मराठी लोकांनी हा मार्ग स्वीकारला तर नक्कीच या लोकांना मराठी शिकायला त्या कंपन्या सांगतील अथवा मराठी लोकांना या कामासाठी प्राधान्य देतील.

नक्की करून पहा.

टीप : जो पर्यंत आपण मराठीसाठी आग्रह धरणार नाही तोवर कोणीही स्वताहून मराठी शिकणार नाही. प्रत्येकाशी मराठीतून ‘च’ बोला (महाराष्ट्रात तरी, आणि हो मुंबई महाराष्ट्रातच आहे, भले हे मोबाईल फोनवाले मुंबई वेगळी धरत असले तरी).

‘तो’ आणि ‘ती’ भाग ८

तो: काल सकाळी मी माझी बाईक पार्क करत होतो इतक्यात ती आली. अतिरेकी स्टाईल स्कार्फ काढला, आरशामध्ये पाहून केस ठीक केले. तिने तो जुन्या काळात लहान मुली कसा झंपर-परकर घालायच्या तसा परकर टाईप लाँग skirt घातलेला. गाडीचे साईडचे stand लावत असताना तिचा पाय ड्रेस मध्ये अडकला आणि एकदमच तीचा तोल गेला. मी जाऊन तिला आधार देणार इतक्यात दुसरा एक मुलागा तिथे आला आणि त्याने गाडी पकडली, आणि ती त्यातून व्यवस्थित सावरली. तिच्या जवळ जायची, तिला स्पर्श करायची संधी हुकली. 😦
संध्याकाळी ऑफिसमधून निघताना मी माझ्या मित्राला भेटायला वरच्या मजल्यावर गेलो आणि तेथूनच खाली लिफ्ट मधून निघालो. लिफ्ट मध्ये आणखीन एक मुलगी होती. लिफ्ट खाली माझ्या नेहमीच्या मजल्यावर थांबली. एक मुलगा आणि ‘ती’ लिफ्ट मध्ये आले. ती अगदी माझ्या उजव्या बाजूला पुढे उभी होती. म्हणजे माझ्यात आणि तिच्यात एका हाताचे देखील अंतर नव्हते. पहिल्यांदाच तिला इतक्या जवळून पाहत होतो. तिच्या perfume चा छान सुगंध येत होता. तिचा तो परकर स्टाईल पांढरा लॉंग skirt, त्यावर लाल रंगाचा top, खांद्याला लावलेली पर्स, मोकळे सोडलेले केस, छोटस हलणार कानातलं, गळ्यात नाजूक चेन आणि त्यात बदामाच पेन्दल, हातात रंगीबेरंगी बांगड्या, एकदम मस्त दिसत होती ती. लहान घुंगरू देखील होते त्या top आणि लॉंग skirt ला. त्यामुळे ती जरा हलली कि ते छुम-छुम आवाज करायचे. आणि ती मुद्दाम हलायचीहि :-). वाटले या क्षणी फ़क़्त दोघंच लिफ्ट मध्ये असावं, मग एका गुढग्यावर वाकून तिचा एक हात हातात घ्यावा आणि म्हणावं, “तनु तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो गं मी. सारखं वाटत तू समोर असावीस. डोळे झाकले तरी तूच समोर दिसतेस, प्रत्येक मुलीत तूच दिसतेस, coding करताना सुधा तुझाच चेहरा monitor वर दिसतो. कधी एकदा सकाळी ऑफिसला येतो आणि तुला पाहतो असं होतं बघ.”, हे ऐकून तिने देखील तिचा हात तिच्या चेहऱ्याजवळ न्यावा, माण खांद्याकडे नेत लाजत म्हणाव, “ईश्य्य”. असे माझे विचार चालू होतेच इतक्यात काय तर, लिफ्ट एका मजल्यावर थांबली आणि तो मुलगा आणि दुसरी मुलगी लिफ्ट मधून उतरले. काय देवा, आज सूर्य काय पश्चिमेला उगवला का? इतक्या लगेच आमची request approved. 🙂 पण इकडे ज्या गुढग्यावर वाकायचे आणि ज्या हातात तिचा हात धरायचे वगेरे विचार केलेला ते मात्र थरथरायला लागले. (काही गोष्टी विचार करायलाच सोप्या वाटतात). आता आम्ही दोघं त्या छोट्याशा लिफ्ट मध्ये एकटे. मझं हृदय नेहमीच्याच सवयीप्रमाणे तिला पाहून ८० प्रती मिनिटाच्या वेगाने धावू लागले होते. ती देखील एका बाजूला झाली, आणि माझ्याकडे तिचा चेहरा केला, दोन सेकंद मला काही कळेनाच. तिने तिचे पेटेंत स्मित हास्य दिले, मी आपला स्तब्ध उभा. मी आपले दोन्ही ओठ शक्य तसे थोडे पसरवायचा प्रयत्न केला (त्याला हास्य तर नक्कीच म्हणता येणार नाही). मग म्हंटल, ती इतकी स्वतः होवून smile देतेय तर मग आता आपण पण थोडा पुढाकार नको का घायला. म्हंटल कुठून तरी सुरवात करू, ‘hi’ तरी म्हणू. …….. come on रोहित. say hi. yes you can do it. come on चल म्हण hi. (ह.. ह हत्तीचा, आ … आईचा … नको आईचा विचार नको उगाच). माझे शक्य तेवढे स्वतःला प्रेरणा द्यायचे प्रयत्न चालू होते. पण hi चा ‘ह’ काही तोंडातून बाहेर पडेना. तरी मी माझे प्रयत्न चालूच ठेवले. कुठेतरी प्रयत्नांची चिझ झाल्यासारख वाटल, कारण आख्खा ‘hi’ अगदी ओठांपर्यंत आलेला. तो ओठातून बाहेर पडणार इतक्यात, ‘you are at ground floor’ म्हणून लिफ्ट मधून सुंदर बाईचा आवाज आला. सत्यानास!!!!!! झालं!!!!! बोंबल्ल!!!! लिफ्टचे दार उघडले आणि ती तरा तरा निघून गेली. मी देखील मागून गेलो. पण बाई साहेब गाडीवर बसल्या आणि लगेच निघूनही गेल्या. मी देखील लगेच बाईक वर बसलो, पण आमच्या बाईकचे पण आमच्या सारखेच. ऐन लढाईत राजीनामा. चालूच होईना.
ती : मधल्या काही दिवसाचा वनवास संपला आहे. पण गाडी काही पुढे सरकत नाहीये. म्हणजे काल्चच पहा, नाही म्हंटले तर दोन अशा घटना घडल्या कि ज्याद्वारे पुढे काही घडले असते, एकमेकांची ओळख झाली असती, पण नाही, काही नाही. आम्ही जिथे होतो तिथेच आहोत.
काल सकाळी पार्किंग मध्ये तो होता, मी माझी activa पार्क करत होते, इतक्यात माझ्या लाँग skirt मध्ये पाय अडकला, आणि माझा तोलच गेला, ‘तो’ तसा पुढेच होता, मी त्याच्याकडे पाहिलेही, त्यानेही माझ्याकडे पहिले, आणि तो मला आधार देण्यासाठी लगेच पुढे सरसावलाहि, माझ्याकडे येणार तोच दुसऱ्याच एका मुलाने माझी गाडी पकडली, आणि मला उभे राहण्यास मदत केली. हे पाहून तो देखील लगेच मागे सरकला. वास्तविक आधार दिल्याबद्दल मला त्या मुलाचे आभार मानायला हवे, पण त्याला दोन थोबाडीत द्याव्याशा वाटत होत्या. कशाला मध्ये कडमाडायाचे. त्याला नुसते thanks म्हणून तिथून मी गेले.
संध्याकाळी ऑफिस मधून जायला लिफ्ट पाशी थांबले. लिफ्ट मध्ये पाहते तर काय पुढे ‘तो’ होता. देवाला मनातल्यामनात thanks म्हणाले. लिफ्ट मध्ये आम्ही दोघांखेरीच एक मुलगा आणि एक मुलगी होती. मी त्याच्या पुढे होते. जरा तिरकी माण केली, तेव्हा तो माझ्याकडेच पाहत होता. पुढे खालच्या मजल्यावर तो मुलगा आणि मुलगी उतरले. देवाला पुन्हा एकदा thanks म्हणाले. (हं काल दगडूशेठ हलवायीला गेलेले ना :-)). आता आम्ही दोघेच लिफ्टमध्ये. मी देखील लिफ्टच्या एका बाजूला टेकून उठे राहिले, जेणेकरून त्याच्या पुढे चेहरा येईन. दोन सेकंद दोघेही शांत. मग मीच त्याचाकडे पाहून एक स्माईल दिली. तो जरा डोंधळलाच होता. त्याने देखील एक हलकीशी स्माईल दिली. जणूकाही स्माईल द्यायला काही पैसेच पडतात. वाटले आता दोघे एकटेच आहोत, बोलेल काही तरी, नुसतं ‘hi’ तरी. पण नाही, कुठले काय. दोघे असेच शांत उभे. वाटले म्हणाव, “अरे मुर्खा एवढी समोर मुलगी उभी आहे अन इकडे तिकडे काय बघतोयस. आणि मुग गिळून शांत उभारायला काय झाले, दोन शब्द बोल कि खडा खडा”. आता मी दिली ना त्याला स्माईल, आणि काय करायचे मी. शेवटी मी एक मुलगी आहे. पुढाकार त्यानेच घायला पाहिजे ना. मी स्माईल देवून, हलकीशी माण हलवून कानामागे केस ढकलत शक्य तेवढे दिले ना इशारे. पण त्याला काही समजेल तर शप्पथ. शेवटी संगणक अभियंताच तो, प्रत्तेक गोष्टीत logic हुडकणार. मग वाटले काल दगडूशेठला गेलेले खरे, पण दुर्वा आणि गुलाबाचे फुल ठेवायला विसले वाटत. 😦  शेवटी लिफ्ट थांबली. मला जरा रागच आलेला, झटकन लिफ्टमधूननिघून गेले.
आणि असे हे कालचे दोन्ही प्रसंग हातचे निघून गेले.