सकाळी नेहमी प्रमाणे ऑफिस मध्ये mail box उघडला. एका मित्राचा forwarded e -mail आलेला. subject होता, “जेव्हा एखादी तरुणी…”. लगेचच e -mail उघडला. आणि जे काही पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसेना. अहो तो forwarded e -mail म्हणजे चक्क माझ्या ब्लोग वरचा एक पोस्त होता. cc आणि bcc लिस्ट मध्ये ढिगान भर लोकं होती. आधीही बऱ्याच जणांना गेला होता तो e -mail . बयाच जणांचे ‘छान”, “nice mail”, “must read” वगेरे comments होते. wow …….. आज पर्यंत अनेक forwarded e -mails वाचले होते, पण स्वतःचाच पोस्त असा वाचायला मिळाल्यावर फार आनंद वाटला. छान वाटत. 🙂 माझ्या ब्लोग्गीण चा आजचा दिवस म्हणजे सोनियाचा दिवस होता.
Posted in प्रेम / मुलगी, General | Tagged General | 6 Comments »
तो : गेले काही दिवस अमृता येत नाही, त्यामुळे ट्रेनिंगला तनु एकटीच येते. शक्यतो मी थोडा लवकरच येतो. ट्रेनिंग रूम मध्ये आल्यावर तीची नजर मोकळ्या सीट ऐवजी माझा वेध घेते. तशी आता थोडीफार ओळख झाली आहे. पण ट्रेनिंग मधेच भेट होत असल्याने अजून फारसे बोलणे होत नाही.
परवा मात्र ट्रेनरला यायला अजून उशीर असल्याने pantry च्या gallery मध्ये एकत्र उभे होतो. दोघेच होतो. काहीतरी सुरवात करावी म्हणून तिच्या प्रोजेक्ट विषयी विचारले, पण तिने लगेच विषय बदलत माझ्या बद्दल चोकशी चालू केली. मी कुठला वगेरे वगेरे. बर्यापैकी आमचे बोलणे झाले, म्हणजे ती माझ्याविषयी विचारात होती, मी उत्तर देत होतो. थोडे फार interview सारखेच चालले होते असे ध्यानात आल्यावर तिच्याविषयी काही विचारावे म्हणतो तोच एकदम जोरात वारा आला आणि समोरच्या झाडाची सुकलेली पाने उडत इकडे आली, वाऱ्याने तीची ओढणी एकदम माझ्या चेहऱ्यावर आली. ओढणीने माझा पूर्ण चेहरा झाकला होता, पण तरी ओढनीतून ती स्पष्ट दिसत होती. वाऱ्याने तिचे केस हलकेसे विसकटले होते, तिने लगेच ते ठीक केले, चेहऱ्यावर आलेली धूळ रुमालाने झटकली. मी अजून असाच ओढणीआड तिला पाहत उभा होतो. तिने माझ्याकडे पहिले, ती हसली आणि माझ्या चेहऱ्यावरची तीची ओढणी हळुवार काढून घेतली. वाऱ्याने माझे देखील केस विसकटले होते आणि २-३ सुकी पाने केसात अडकली होती. तिने मला ते सांगितले, मी ती काढायचा प्रयत्न केला, पण मला काय ती निघाली नाहीत. मग तिने पुढे होवून माझ्या केसातली ती पाने काढली, आणि वर-वर माझे केस ठीक केले. मग आम्ही पुन्हा ट्रेनिंगला गेलो.
……..
आज ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता. रोज तनु ट्रेनिंगमुळे दिसत होती, भेटत होती, तिच्याशी थोडे फार का होईना बोलणे होत होते. पण आता ट्रेनिंग संपणार. पुन्हा ती तिच्या दिशेला मी माझ्या दिशेला. ट्रेनिंग नंतर पुन्हा आमचे असे एकत्र भेटणे-बोलणे होईल का? इतर वेळी तिच्या कडे कितीही मनात असले तरी एकटक पाहायला मिळेल काय? ट्रेनिंग दरम्यान ती जेव्हा ट्रेनरला एखादा प्रश्न विचारात असे तेव्हा तिच्याकडे एकटक पाहायला मिळत असे. अशा वेळेस कोण आपल्याकडे पहातंय का? कोण काय म्हणेल याची काळजी नसते. कारण अशा वेळेस इतरांच्या मते आपले तिच्या प्रश्नाकडे लक्ष असते. जितके तिच्याकडे एकटक बघू तितका आपला प्रश्नामध्ये जास्त रस, असे वाटते इतरांना. 🙂 अशा वेळेस ती काय बोलत असते याकडे कधी लक्षच लागत नाही माझे, त्यावेळेस तिचा आणि इतर जगाचा volumn एकदम low झालेला असतो, सगळे आजूबाजूचे लोक तिच्यापासून लांब गेलेले असतात, आणि फ़क़्त तिचा चेहरा माझ्या दृष्टीपथात असतो. सगळं काही slow motion मध्ये चालू असतं. तिचे हातवारे, तिचे हसणे, मधूनच तिचे बट कानामागे नेणे, तिच्या ओठांच्या हालचाली हेच तेवढे मला दिसते. पण आता ट्रेनिंगनंतर या सगळ्यांना मी मुकणार. हाच विचार मला शेवटच्या दिवशी खलत होता.
ट्रेनिंग संपल्यावर आज तिच्याबरोबर कॅफेटेरियात lunch केले तर? हम्म what an idea सरजी. त्या नादाने तिच्याशी बोलणे होईल. काल pantry मध्ये ती माझ्या विषयी एवढे काही विचारात होती, मी मात्र तिच्या विषयी काहीच विचारले नाही. पण ती येईल माझ्याबरोबर lunch ला ? आणि हो तीची ती अमृता पण नाही आज. विचारायला काही हरकत नाही. मला राहवलेच नाही आणि ट्रेनिंग चालू असतानाच मी एकदम तिला उद्देशून: “आज आपण…”. तिचे ट्रेनिंग मध्ये लक्ष होते, ती: “sorry … काय म्हणालास?”. मी : “ohh nothing.” हम्म्म्म ट्रेनिंग झाल्यावरच विचारलेले बरे.
ट्रेनिंग संपली, काहीजने गेलीही. आम्ही २-४ जने आणि ट्रेनर होती. वाटले आता बाहेर जाताना विचारू तनुला lunch विषयी. इतक्यात ट्रेनर म्हणाली, “lets go for lunch together”. सगळेही लगेच हो म्हणाले. सत्यानास!!!!! झाले आमच्या lunch चे तीन तेरा. मग काय आम्ही ४-५ जने जवळच्याच हॉटेल मध्ये lunch ला गेलो. ओर्डर देताना ती प्रत्येक वेळा मला काय आवडते ते विचारात होती, आणि ओर्डर मध्ये ते असेल याची काळजी घेत होती. infact आम्ही soup देखील दोघांनी शेअर केले. (वन बाय टू) 🙂 तीची आणि ट्रेनरची चांगलीच जमली होती. दोघी जवळच बसल्या होत्या. दोघींचे काहीतरी हळू आवाजात खुसुर-पुसुर चालले होते. ट्रेनरने तिला काही तरी विचारले, आणि ती एकदम लाजलीच. लाजतच “नाही असे काही नाही” असे तिने म्हंटलेले आम्ही सगळ्यांनी ऐकले. दुसऱ्या एका मुलीने विचारलेहि काय झाले, पण ट्रेनर लगेच “its secrete” म्हणाली. ती माझ्या कडे बघून हसली, ट्रेनरहि माझ्याकडे बघून हसली. मला काही कळेना, मी आपले चेहरा, केस ठीक आहेत ना ते चेक केले.
lunch घेवून आम्ही सगळे ट्रेनरला बाय करून निघालो.
पुढे काय होणार कोण जाणे, पुन्हा तनुशी बोलणे होईल का? फार फार तर येता जाता एखादी स्माईल आणि हाय, हेल्लो होईल.
Lets see.
.
ती : अमृताला सध्या बरं नाही त्यामुळे ती ऑफिसला येत नाही. त्यामुळे मला ट्रेनिंग मध्ये रोहितजवळ बसायला कोणी अडवणारे नाही 🙂 तो देखील नेहमी एखादी जवळची सीट मोकळी असेल अशाच ठिकाणी बसतो. मी देखील त्याच्या जवळच बसते. नेहमी भेट ट्रेनिंग मधेच होते त्यामुळे इतर गोष्टींवर फारसे बोलणे होत नाही पण तरीही थोडी फार मैत्री झाली आहे. …..हम्म्म्म खरच मैत्री म्हणता येईल का कि फ़क़्त तोंड ओळख. Whatever
परवा pnatry च्या galary मध्ये दोघेच उभे होतो. तेव्हा पहिल्यांदाच ऑफिस सोडून इतर बाबींवर थोडं फार बोलणं झालं. actually त्याने सुरवात “सो कसा चालू आहे प्रोजेक्ट?” म्हणतच केली. याला ना कोणत्या प्रसंगी काय बोलावे याची अक्कलच नाही …. i mean कोणत्या प्रसंगी काय बोलावे हे कधी कळणार देव जाणे. अरे समोर एखादी मुलगी आहे ना, मग त्या प्रोजेक्ट ची कशाला काळजी तुला? मला त्याच्याकडून येणारे पुढचे सर्व प्रश्न डोळ्यापुढे दिसू लागले. म्हणून मीच लगेच विषय बदलत त्याने कोठून कॉलेज केले, मुळचा कुठला, सध्या कुठे राहतो वगेरे कडे मोर्चा वळवला. तर तो मुळचा सांगलीचा. माझी मावशीही सांगलीचीच. मी लहानपणी जायचे सांगलीला. आता फारसे आठवत नाही पण छान आहे सांगली, i mean तेव्हा तरी होती. बर्यापैकी बोलणे झाले आज. बोलणे कसले हो……मी विचारत होते, आणि हा उत्तर देत होता. मी कुठे राहते, मुळची कुठली, मला काय आवडतं वगेरे विचारायची काही पद्धतच नाही. असो. थोड्याच वेळात ट्रेनर आल्याचे कळले आणि आम्ही ट्रेनिंग रूम कडे गेलो.
…………..
४-५ दिवस ट्रेनिंग सुरु होवून झाले, आणि शक्यतो आम्ही दोघे रोज एकत्रच बसतो. अजूनही एकमेकांकडे नकळत तिरक्या नजरेने पाहणे चालू असते.
अमृता आता बरी होवून ऑफिसला येत आहे, पण २-३ दिवसाच्या सुट्टी मुळे तिची काही कामे पेंडिंग आहेत म्हणून ट्रेनिंगला यावे का या बद्दल ती विचार करत होती, मी देखील तिला, “अगं इतके session मीस झाल्याने आता काही कळणार नाही ग तुला” असे सांगून तिचे बाकीच्या session ला न येणे पक्के केले 🙂
……………..
काल ट्रेनिंगचा शेवटचा दिवस होता. ट्रेनिंगला आज मोजकेच लोक होते. ट्रेनरशी सुद्धा आता चागलीच मैत्री झाली होती. त्यामुळे हसत खेळत चाललेलं. ट्रेनरचा ‘मानस शास्त्राचा’ पण चांगला आभ्यास होता. अजून वेळ होता म्हणून तिने सहजच आम्हाला बोर्ड वर आपल्या मनातील घर या विषयावर प्रत्येकाला जमेल तसं चित्र काढायला सांगितलं. प्रत्येकाने बोर्डवर चित्रे काढली. माझी चित्रकला म्हणजे अगदी दिव्य. एक घर, दारापासून पुढे जाणारा रस्ता, जवळच झाड, आजूबाजूला ५-६ लोक, मागे डोंगर आणि झाले माझे चित्र 🙂 त्यानेही त्याच्या मनातील घर काढले. चित्र काढताना त्याच्याकडे मी पहात होते, अगदी मनापासून काढत होता तो चित्र जणू काही खरच स्वतःचे घर बनवत होता. अगदी सुबक नाही पण छान काढले होते त्याने त्याचे घर. शेवटी आमच्या ट्रेनरने प्रत्येकाच्या चित्रावरून त्या व्यक्तीची स्वभाव वैशिस्ते सांगितली. एक मुलाला ट्रेनर म्हणाली तो फार ambitious आहे आणि इतरांचा तो विचार करत नाही, तर एका मुलीला ती म्हणाली, तिला तिच्या आयुष्यात कोणी लुडबुड केलेली आवडत नाही. माझ्या चित्राकडे पाहून तिने मी साधी simple आहे, मला लोकांमध्ये राहायला, मिसळायला आवडते वगेरे सांगितले. शेवटी ती त्याच्या चित्राकडे आली, थोडा वेळ त्याच्या चित्राकडे पाहून ती म्हणाली हा फार ‘romantic’ आहे. तो फ़क़्त हलकासा हसला…. कि लाजला? 🙂 मी देखील चिकित्सेने ट्रेनरला विचारले, “कशावरून?”. ती हसली आणि म्हणाली. “याच्या चित्रात चंद्र आहे, चांदण्या आहेत, रम्य रात्र आहे, घराजवळच्या तलावात एका बोटीत एक जोडपं आहे, नारळाची दोन झाडे एकमेकांकडे झुकलेली आहेत. या गोष्टी दर्शवतात कि…..” इतक्यात कोणीतरी आले आणि तो विषय तिथेच थांबला. पण तो romantic आहे. wow. let see 🙂
ट्रेनिंग संपल्यावर आम्ही ४-५ जन ट्रेनर सोबत lunch ला गेलो. तेव्हा ट्रेनरने मला माझ्या आणि रोहित विषयी विचारले. मी शक्य तेवढं तिला काय म्हणायचे आहे हे समजूनही न समजल्याचा भाव आणला. तेव्हा तिने स्पष्ट विचारले की, एकमेकांना अजून बोललात कि नाही?. मी एकदम लाजतच आमच्यात असे काही नसल्याचे सांगितले. लाजतच मी त्याच्याकडे पहिले तर तो पुरता गोंधळलेला होता. पण ट्रेनरच्या१२-१३ वर्ष्याच्या soft-skill क्षेत्रातल्या अनुभावापुढे माझ्या हे नाते लपवण्याच्या प्रयत्नांना काही यश आले नाही. शेवटी ती फ़क़्त म्हणाली, “he is nice guy. don’t loose him”. 🙂
या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेनिंगचा आज शेवटचा दिवस आहे हे विसरलेच होते मी. उद्या पुन्हा ते routine work, आणि ते हि त्याच्या विना. 😦
रात्री मी पहिल्यांदाच त्याच्या विषयी माझ्या लहान बहिणीला म्हणजे अनुला बोलले. actually मी तिच्यापासून काहीच लपवत नाही. पण त्याच्याविषयी कोणाला काही बोलायचे नाही हेही ठरवले होते, पण शेवटी अनुला बोललेच. ती देखील फार excite झाली त्याच्या विषयी ऐकून. तो कोण, कसा दिसतो, काय करतो, स्वभावाने कसा आहे वगेरे वगेरे एक ना शंभर प्रश्न विचारले तिने 🙂
.
अनु : काल ताईने पहिल्यांदाच रोहितबद्दल सांगितले. थोडक्यात काय तर आमच्या बहिणा बाई प्रेमात पडल्या आहेत. म्हणजे अजून ती तसे मान्य नाही करत. अगं अजून एकमेकांना ओळखत पण नाही गं, फारसे बोलणे पण नाही झाले अजून, may be just attraction असेल, त्याला काय वाटते कोणास ठाऊक वगेरे वगेरे म्हणाली, पण त्याच्या विषयी बोलताना एक वेगळाच उत्चाहा होता तिच्यात. प्रेमात असंच होतं. आपण प्रेमात पडलोय हे आपल्यालाच कळत नाही, पण आपल्या जवळचे ते लगेच हेरतात. किंवा आपण कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी इतरांना काय ते कळतेच.
तिच्या बोलण्यातून रोहित थोडा soft spoken आहे असे कळले. आता या soft spoken लोकांचा प्रोब्लेम म्हणजे जिथे बोलायची खरच गरज आहे तिथे देखील हि लोकं स्वभाव सोडून वागत नाहीत, आणि प्रेमात तर बोलूच नका. त्यांच्याकडून त्यांच्या मनातील भावना कळणे म्हणजे महा अवघड. एकवेळ रेडा द्यानेश्वरी च्या ओळी म्हणेल, पण हि लोक मनातील भावना बोलतील तर शप्पथ. त्यामुळे मी ताईलाच पुढाकार घ्यायला संगीलता. पण आमच्या ताईचे म्हणजे कसे तर ऐन लढाईत राजीनामा. म्हणजे एरवी पुढे पुढे करेन पण पाहिजे तेव्हा बाईसाहेब मुग गिळून बसतील. त्यामुळे तिला पुढाकार घ्यायचा बराच डोस पाजला. आता बघू या डोसचा काही उपयोग होतो का ते, नाहीतर पेहले आप, पेहले आप करण्यात गाडी निघून जायची.
Posted in ‘तो’ आणि ‘ती’ | Tagged 'तो' आणि 'ती' | 7 Comments »
मग एक modern टाईपची मुलगी माझ्या जवळ येवून बसली. कपड्यांवरून जरा अतीच morern वाटत होती, आणि जरा over react हि करत होती. तिने आधी याच trainer चे एक session attend केले होते त्या बद्दल काहीतरी उगाच अति हाव भाव करत सांगत होती. थोडी जास्तच express करत होती, मलाच तीच ते वागण थोडं अवघडल्यासारखं होत होतं. पण काही इलाज नव्हता.
नंतर training चालू असताना तनुकडे अधून मधून पाहिले पण ती काही इकडे पाहायला तयार नाही.
दुसऱ्या दिवशी पुन्हा मी एकटा होतो, आज तनु एकटीच आली होती, तिची नेहमीची अंगरक्षक अमृता नव्हती 🙂 ती आली, तिने आजू- बाजूला पाहिले. मी माझी बाजूच्या सीट वरची bag लगेच उचलून बाजूला ठेवली. ती माझ्याजवळ आली, पुन्हा आजू – बाजूला पहिली, माझ्या जवळ कोणी बसले आहे का या बद्दल विचारले, मी नुसती नकारार्थी माण डोलावली. आणि ती माझ्या जवळच्या सीट वर बासली. देवा गजानना आभारी आहे रे (असे मनातल्या मनातच म्हंटले) इकडे आमचे हृदय नेहमीच्या सवयीप्रमाणे ८० प्रती सेकॅन्दाच्या वेगात. तिचे माझ्याकडे पाहून नेहमीचे हास्य. माझाही तोच नेहमीचाच प्रतिसाद. पुन्हा काही क्षण दोघे शांत. काय बोलावे काही समजेना. ‘हाय’ म्हणून सुरवात करावी तर मागच्या वेळेप्रमाणे संवाद ‘हाय’ वरच संपेन याची भीती. काय बर बोलावे? तुझे नाव तन्वी ना? का तुझी activa आहे ना? कि तू कोथरूड मध्ये राहतेस ? कशी बर सुरवात करावी? shut यार मुलींशी बोलायची सवय नसली कि असं होतं. पुढे मुलगी आली कि काय बोलावे हेच सुचत नाही. अखेरीस तू अनिकेतच्या टीम मध्ये आहेस ना म्हणत मी कशीबशी दबकतच सुरवात केली. तिने देखील माझ्या प्रश्नाची वाटच पाहत असल्याप्रमाणे लगेच हं म्हंटले. तिने लगेच “हाय मी तन्वी” म्हणत हात पुढे केला. मीहि तिच्या हातात माझा हलकासा थरथरणारा हात देत “मी अ ….. रोहित”. वाह काय सुंदर हात आहे तिचा, एकदम मऊ-मऊ. (I guess सगळ्या मुलींचा असाच असतो) जणू काही कापसाचा गोळाच. आयुष्यातील सोनेरी अक्षरांनी लिहायचा क्षण होता तो माझ्यासाठी. डोळ्यापुढे ती होती आणि हातात तिचा हात होता. वाटत होतं कधी ती समोरून जाऊच नये, आणि हा हात आयुषभर माझ्या हातात राहावा.stachu म्हणावस वाटत होतं. सगळं जग असंच या क्षणाला स्थिर व्हावं. मुलीचा स्पर्श current वगेरे देतो अस ऐकलेलं, हा current तर नव्हता पण संपूर्ण शरीरात एक नवं चैतन्य निर्माण करणारा होता. अक्षरशहा ४-५ सेकंद आसाच तिचा हात हातात घेवून तिच्याकडे एकटक पाहत होतो. इतक्यात trainer आली आणि मी (आणि तीही कदाचित) या उघड्या डोळ्यांनी पाहत असलेल्या स्वप्नातून जागा झालो. लगेच मी माझा हात सैल केला, आणि तिने तिचा हात माझ्या हातातून काढून घेतला. तिचा हात जरी माझ्या हाती नसला तरी तिच्या हाताच्या ओलाव्याने माझ्या हातावर छाप सोडली होती. नंतर पूर्ण traing मध्ये मी ज्या हाताने तिचा हात पकडला होता त्याचा सुगंध घेत होतो. infact दिवस भर त्या हाताने काम करायचे, इतर गोष्टीना स्पर्श करायचे मी टाळत होतो. 🙂
नंतर training session संपले आणि आम्ही दोघे एकत्र बाहेर पडलो. अजून फारशी ओळख नसल्याने जगात कधी कोठेही दोन संगणक अभियंते एकत्र आल्यावर त्यांचे जे प्रश्न असतात तेच सध्यातरी आमचेही होते, whcih platform? which technology? how much experimence? 🙂
पहिल्या दिवशी मी ट्रेनिंग साठी रूम मध्ये गेले, अमृताही होती बरोबर. अजून बर्याचशा सीट्स मोकळ्या होत्या एखादी मोकळी सीट शोधावी म्हणून समोर दोन्ही बाजूने नजर फिरवली तर पुढे ‘तो’ ….. रोहित माण खाली घालून कसला तरी विचार करत (साऱ्या विश्वाची चिंता मला वगेरे टाईप मुद्रा करून :-)) बसला होता, हळुवार त्याची नजर वर माझ्याकडे गेली, आणि त्याच्या चेहऱ्यावरचा भाव एकदम बदलला. जेवढे मला त्याला पुढे पाहणे उनपेक्षित पण हवेसे होते, तेवढेच त्यालाही होते. त्याची विश्वाची चिंता संपली होती कदाचित :-). दोघे काही क्षण असेच होतो, अमृताला हे लगेच जाणवले आणि तिने मला दुसरीकडे बसायला नेले. मी २-३ वेळा नकळत त्याच्याकडे नजर वळवली, त्याची नजर देखील नकळत माझ्या नजरेचीच प्रतीक्षा करत असल्याचे जाणवले.
इतक्यात एक टाइट jeans आणि short t-shirt घातलेली एक बया आली, आणि ती सगळ्या मोकळ्या जागा सोडून त्याच्या जवळ जाऊन बसली. दिसायला सो-सो च होती पण तोडक्या कपड्यांमुळे(च) उठून दिसत होती. नंतर सहज पाहिले तर काय नखरे करत होती ती बया. जरा over-react च करत होती. सारखे केस काय सावरतेय (अंबाडा करून बांध म्हणाव), t-shirt सारखा मागे कबरेखाली काय घेतेय (मी म्हणते घालायचाच कशाला इतका तोडका तो t-shirt), लिपस्टिक खराब होवू नये म्हणून सारखी ओठ काय चेक करतेय, उगाच ती कृत्रिम हास्य काय देतेय. आणि बघतेय तर काय दोघे एकमेकांशी अगदी हसत खेळत बोलत होती. वाह रे बहाद्दरा. माझ्याशी बोलायला तोंडातून शब्द पडेल तर शप्पथ, आणि तिच्याशी मात्र अगदी गुलु-गुलु बोलत होता. नाही …. अमृता म्हणते तेच बरोबर. शेवटी सगळी मुले सारखीच. जरा चांगली…. चांगली कसली…. कमी कपड्यातली मुलगी दिसली कि चालले माग-माग. मी पण नंतर नाही लक्ष दिले माग त्याच्याकडे. पण नंतर जाणवलं तिच्या या over react करण्याने तोच कुठतरी ऑकवर्ड फील करत होता. so cute ना. एकदम साधा आहे तो.
दुसऱ्या दिवशी अमृता सुट्टीवर होती, त्यामुळे मी एकटीच होते. त्याच्या जवळ देखील कोणी नव्हते मीही मग त्याच्या जवळ जाऊन बसले. पहिले काही क्षण दोघे ढम्म होतो, तरी मी स्माईल देवून त्याला ग्रीट केले, तोही हसला. पण पुन्हा दोघे शांतच. बस म्हंटले आता पुरे हा अबोला, आपणच बोलावे काही, इतक्यात तो काहीतरी बोलला, मला काही कळलेच नाही मी आपली उगाच हं म्हणाले. लगेच मी माझी ओळख करून देत शेक हंड्ससाठी हात पुढे केला, त्यानेही त्याची ओळख करून देत माझा हात त्याच्या हातात घेतला. हलकासा कापत होता त्याचा हात. कदाचित या नवीन नात्यासाठी तो तयार नव्हता की कोणती शंका होती त्याला या नात्याविषयी? की आणखी काही, i don’t know. मी त्याचा हात firmly पकडत हलकासा त्याच्या हातावर दाब देत मी या नात्यासाठी पूर्णपणे तयार आहे असे सूचित करत माझा trust आणि confidence दाखवला. दोघे काही क्षण असेच स्वतःचे हात दुसऱ्याच्या हातात देवून जगापासून दूर गेलो होतो. आम्ही कुठे आहोत, इथे का आहोत, आजू- बाजूला कोण आहे हे सगळं विसरलो होतो. त्या क्षणाला एकमेकांशिवाय सार जग शुल्लक झालं होतं. आजूबाजूला असलेल्या AC च्या थंड वातावरणात देखील त्याच्या हाताची उब मी जाणवू शकत होते. काही वेळा पूर्वी हलकासा कापणारा त्याचा हात आता स्थिर झाला होता, जणू काही या सुंदर नात्यासाठी आता तो तयार असल्याची अनुमतीच तो दर्शवत होता. मला हा क्षण असाच माझ्या डोळ्यात साठवून ठेवायचा होता.
इतक्यात दरवाजाचा आवाज आला आणि मी ध्यानावर आले, लगेच त्याच्या हातातून माझा हात काढून घेतला. पुन्हा त्याच्याकडे पहिले आणि लाजून लगेच माण दुसरीकडे वळवली. पुढे पूर्ण ट्रेनिंगमध्ये अधून मधून केस कानामागे घेत माण तिरकी करत त्याच्याकडे नजर फिरवत होते, तिरक्या नजनेने त्याच्या हालचाली टिपत होते. तो देखील नकळत अधून मधून माझ्याकडे पाहत होता. चुकून भिडलीच एकमेकांच्या नजरेला नजर तर लगेच दोघ एकमेकांना जाणवू न देत लाजून पुढ पाहत होतो, पण पुन्हा एकमेकांकडे पाहायला मात्र राहवत नव्हतं.
ट्रेनिंग संपल्यावर दोघे एकत्रच बाहेर पडलो. बोलत-बोलतच आमच्या floor वर आलो आणि आपापल्या डेस्क वर गेलो.
Posted in ‘तो’ आणि ‘ती’ | Tagged 'तो' आणि 'ती' | 1 Comment »
नवीन account असल्यामुळे पैसे शेअर मार्केट मध्ये घालायला हात अगदी शिवशिवत होते.
तरी इतरांच्या सल्ल्यानुसार थोडा धीर धरला. तसा काही महिन्यांपासून मार्केट study करतोय. tax saving साठी Mutual Fund मध्ये पण ३-४ वर्षापासून पैसे टाकतोय. पण actual शेअरची हे पहिलीच वेळ.
आणि एका खास व्यक्ती कडून ‘आतल्या गोटातून’ माहिती मिळाली कि एक शेअर २-३ महिन्यात दुप्पट -तिप्पट वाढणार आहे. पहिले काही दिवस थांबलो. आणि अचानक तो शेअर १०-१५ % ने वाढला. आणि काय मग मी पण टाकले माझे पैसे त्यात. आणि काय म्हणता तो शेअर २५-३०% ने खाली आला. 😦 पुन्हा खाली आला मग पुन्हा दोनदा त्यात पैसे टाकून average केले.
२-३ महिन्यांनंतर काल पहिल्यांदाच तो शेअर माझ्या portfolio मध्ये positive (ग्रीन) दाखवत होता. फार बरे वाटले. 🙂
या वरून मार्केटचा पहिला नियम (जो मी विसरलो होतो) तो सांगतो, कधीही कोणावर विश्वास ठेवू नका, TV वरच्या लोकांवर, वेग-वेगळ्या sites वर, किंवा ब्रोकर्स वर तर मुळीच नको.
हा त्यांचे ऐका. पण शेवटचा निर्णय स्वतः त्या कंपनीचे fundamentals , future plans, management वगेरे पाहून करा.
Happy Trading.
Posted in शेअर मार्केट | Tagged शेअर मार्केट | 1 Comment »
राष्ट्रीय वाहिनीवर प्रादेशिक भाषेतून जाहिरात प्रसारणाची आवशकताच काय?
का अशा वेळेस ‘राष्ट्रीय एकात्मता’ नाही का धोक्यात येत? या वेळेस नाही का राष्ट्रीय भाषेचा अपमान होत?
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी लोकांपुढे मराठीला डावरून हिंदीत शपथ घ्यायला विरोध केला तर राष्ट्रीय भाषेचा अपमान होतो, आणि साऱ्या भारतापुढे हिंदीला डावरून तमिळ का तेलगुत जाहिरात दाखवली तर तो नाही का मग राष्ट्रीय भाषेचा अपमान?
असे दोन मापदंड का?
आता कुठे आहेत हिंदी TV news channel वाले? आता का सगळे मुग गिळून बसले आहेत?
Posted in क्रिकेट, Politics | Tagged Politics | Leave a Comment »
तो : शेवटी मी तिच्याशी बोललो, आणि तेहि स्वताहुन. हं आता हे बोलणे फ़क़्त ‘हाय’ पर्यंतच सीमित होते, पण तरीही सुरवात मी केली. रूमवर मित्रांना अगदी छाती फुगवून माझा हा पराक्रम सांगितला.
यावेळचा valentine डे रविवारी आलेला. सालाबाद प्रथेप्रमाणे मी आपला एकटाच होतो. बाहेर जायचं म्हटलं तर हि जोडपी पहिली कि जास्तच एकट असल्याचं जाणवतं. म्हणून सगळा दिवस रूमवर निवांत झोपून काढला. रात्री relationship status ‘single’ आसलेल्या मित्रांबरोबर मदिरा प्राशन करत हा valentine डे, आणि तो साजरा करणारे किती मूर्ख आहेत या विषयावर चर्चासत्र केलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सोमवारी मात्र ऑफिसला जाताना रोडवरती फुलांच्या दुकानात तो टवटवीत लाल गुलाब पाहिल्यावर मात्र राहवलं नाही. कसलाही विचार न करता तिला देण्यासाठी एक गुलाब घेतला आणि bag मध्ये ठेवला. (पण काय हो साधा एक गुलाब एवढा महाग?)
ऑफिसमध्ये कालजरी valentine डे झाला असला तरी बर्यापैकी इफेक्त जाणवत होता. खास करून नवीन भारती झालेल्या फ्रेशर मुला-मुलींमध्ये.
पण अजून ती काही दिसली नव्हती. ती दिसेनम्हणून ३-४ वेळा प्रिंटऔट, कॉफी वगेरे घ्यायच्या नादाने तिच्या cubicle कडून फेऱ्या मारल्या होत्या पण तिचे काही दर्शन झाले नव्हते. ११ च्या सुमारास सहजच टीम लीड (TL) शी बोलण्यासाठी उभा होतो, तर पुढून ती येताना दिसली. सोबत दोन मैत्रिणी होत्या. गुलाबी सलवार कमीज मध्ये ती एकदम गुलाबाच्या कळीप्रमाणे खुलून दिसत होती. (आणि आता कळले चित्रपटात हिरोईन बरोबर सुमार दिसणाऱ्या तिच्या मैत्रिणी नेहमी का असतात ते :-)) पुढे TL होती आणि समोर ती, TL कडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते, आणि तिच्याकडे काही केल्या दुर्लक्ष होत नव्हते. कसेबसे TL शी बोलणे संपवले. एकदम लक्ष bag मध्ये ठेवलेल्या गुलाबाकडे गेले. हात bag कडे जाणार तोच अनेक प्रश्न समोर येवून ठाकले.
तिला देण्यासाठी गुलाब घेतला खरा, पण काय म्हणून देणार? आता पर्यंत फ़क़्त ‘हाय’ हेच बोलणं झालं होतं. तिच्या मनात काय आहे कोणास ठावूक? कोण जाणे ती प्रत्येकाशी इतक्या चांगल्याप्रकारे वागत असेल, आणि मी आपला याला ‘प्रेम’ समजत असेल. कोण जाणे तिचा कोणी तरी असेलही. आणि जर मी तिला गुलाब दिलाच, आणि तिने नाही म्हटलं तर? ऑफिसमध्ये जायची पंचायत होईल. परवा कंपनीच्या induction document manual मध्ये ‘woman harrasement’ बद्दल वाचलं होतं असंच काहीतरी. बापरे!!!
पण खरच ती कशी चुलबुली आहे, नेहमी हसत-खेळत असते, लोकांमध्ये लगेच मिसळते. या उलट मी, तसा थोडा soft spoken, लगेच लोकांमध्ये मिसळायला नाही जमत मला, हो पण एकदा चांगली मैत्री झाली कि मग बिन्दास्त जमते त्याचाशी. ती पुण्यात वाढलेले, मी आपला लहान शहरातून पुण्यात आलेला. किती फरक आहे आमच्या मध्ये, कस काय जमेण आमचं?
मघाशी अगदी लगबगीनं घेतलेलं पाऊल थोडं मागे घेतलं.
पण मन काही मानेना, सारखं लक्ष bag मध्ये ठेवलेल्या गुलाबाकडे जात होतं. वाटत होत बिनधास्त जावं आणि तिला गुलाब देवून यावं. पण काही ध्येर्य होत नव्हतं.
तेवढ्यात client कडून दोन बग असाईन झाले, आणि मी ते सोडवण्यात व्यस्त झालो.
संध्याकाळी ऑफिस मधून निघताना communicator (कंपनीत इंटर्नल चालणारा messenger) वर तिचं status offline दिसलं.
रात्री रूमवर आल्यावर bag मधला गुलाब पहिला, त्यानं देखील माझी वाट बघून बघून कंटाळून मान टाकलेली. :-(.
मी त्याची मान सरळ केली आणि त्याला “Java Complete Reference” च्या पुस्तकामध्ये ठेवले.
ती : या वेळेस रविवारी valentine डे होता. दिवसभर friends कडून Valentine डे चे SMS, call येत होते. TV वर, रेदिओ वर सकाळपासून मस्त romantic गाणी येत होती. मस्त वाटत होतं. दुपारी एक फोन आला आणि माझा मूडच ऑफ झाला. एका जुन्या मित्राचा, रवीचा होता तो फोन. valentine डे वीश करायला. आम्ही आधीच्या कंपनीत दोघे एकत्र होतो. रवी तसा बोलका, दिसायला हंड्सम. म्हणजे प्रथम दर्शनी कोणत्याही मुलीला आवडेल असा. माझी आधीची कंपनी तशी लहानच होती, ३०-४० लोक असतील. त्यात मुली आणि त्याही सिंगल कमीच. रवी कोणत्याही मुलीशी येवून बिनधास्त बोलायचा. माझ्याशीही एकदा असाच येवून बोलला आणि हळू हळू आमचे वरचेवर बोलणे वाढले. कॅफेटेरियामध्ये एकटे lunch, snacks घेणे चालू झाले. ऑफिसनंतर बाहेर जाणे वाढले. आमची जवळीक वाढली. मला तो आवडू लागला. मी तसे त्याला बोलूनही दाखवले, पण त्याने ते चेष्टेवारी नेले. त्याच्याकडून तशी काहीच commitment नव्हती. मला वाटले त्याला थोडा वेळ हवा असेल. पण नंतर कळले माझ्यासारख्या त्याच्या आधीहि ‘मात्रिणी’ होत्या. मी म्हणजे त्यांतली एक. आयुष्यात पहिल्यांदाच कोणी इतका जवळचा वाटलेला, पण तोही असा निघाला. तेव्हापासून मी त्याला टाळू लागले. नंतर कंपनी बदलली आणि त्याच्याशी संपर्कही तुटला.
पण मला माहित होते ‘रोहित'(‘तो’) रवीसारखा नाही. तसा फारसा बोलका नाही. भले अजून आमची फारशी ओळख नाही, आमचे प्रत्यक्ष बोलणे झाले नाही, पण कुठे तरी वाटते फार जुनी ओळख आहे, आणि डोळ्यांच्या भाषेत भरपूर बोलणे होते.
आज valentine डे नंतरचा ऑफिसचा पहिला दिवस. सारखं वाटतं होतं त्याने यावं आणि मला एक गुलाब द्यावा. पण आता त्याचा स्वभावही थोडाफार माहित झालेला, त्यामुळे असे काही व्हायची चिन्हे कमीच, पण तरी वाटतं होतं त्याने यावं.
सकाळ पासून दिसला नाही तो. म्हणून त्याच्या डेस्क पुढूनही जाऊन आले. पण तिथे नव्हता तो. नंतर दुपारी मात्रीनिबरोबर जाताना डेस्कपाशीच उभा होता त्याच्या TL शी बोलत. मी माझ्या मैत्रीन्बरोबर होते, त्याचे एकदम माझ्याकडे लक्ष गेले, आणि दोन सेकंद तो माझ्याकडेच पाहत उभा होता. पुढे TL असल्याने लगेच त्याने त्याचे बोलणे continue केले. अमृतालाही (माझ्याबरोबरची मैत्रीण) त्याचे माझ्याकडे पाहणे जाणवले. लगेच तिने मला भरभर चालायला सांगितले. अमृताला तो तितकासा नाही आवडत, म्हणजे तसे तिने स्पष्ट बोलून नाही दाखवले, पण तिच्या वागण्यावरून वाटते तसे. का कोण जाणे?
पण नंतर पूर्ण दिवस नाही दिसला तो.
वाटले त्याच्या डेस्क जवळ जाऊन बसावे आणि म्हणावे, अरे मुर्खा आजचा दिवस काय, आणि तू करतोयस काय? एवढी सुंदर मुलगी समोर असताना त्या निर्जीव कॉम्पुटरच्या स्क्रीन कडे लक्षच कसे जाते तुझे? मी समोर असताना माझ्याशी बोलावे, मला एखादा गुलाब द्यावा, खरा-खुरा नाही तर एखादे e -greeting तरी पाठवावे. पण नाही. पुरता अरसिक, unromantic आहे. मंदच आहे कुठला.
शेवटी संध्याकाळी निघताना त्याच्या डेस्क पुढूनच गेले, पण तो त्याच्या कॉम्पुटरच्या स्क्रीन मध्ये डोक खुपसून बसलेला.
मी देखील लगेच निघाले.
Posted in ‘तो’ आणि ‘ती’ | Tagged 'तो' आणि 'ती' | 4 Comments »
नवरा ऑफिस मधून दमून घरी येतो. बायको (इतर गृहीनीन्प्रमाणे) निवांत सोफ्यावर बसली असते. तेवढ्यात त्यांचा ७-८ वर्षाचा मुलगा बाहेरून खेळून येतो.
बायको त्यांचा मुलगा पुन्हा रोजच्याप्रमाणे उशिरा आल्याची तक्रार नवऱ्याकडे करते. तक्रार करताना ‘तुम्हारा लडका’ असा उल्लेख करते. नवरा लगेच, उशिरा आला कि माझा मुलगा आणि शाळेत पहिला आला तर तुझा मुलगा म्हणत बायकोचीच तक्रार करतो. बायकोहि लगेच त्याला थांबवत आपले म्हणणे पुढे करण्याचा प्रयत्न करते, तो वर नवरा लगेच मुलालाच विचारतो, “बेटा बताओ तुम किसके बेटे हो?”
मुलगा आपल्याच नादात असतो.
मुलगा : “मल्होत्रा अंकल का…..”
२ क्षण पिन ड्रोप सायलेन्स. नवरा बायको एकदम शांत. (नवरा तर जाम tension मध्ये)
मुलगा : (मगाचचे बोलणे continue)” …. काच तोड दिया छक्का मारके” (मुलाची दोन्ही वाक्ये एकत्र वाचावीत :-))
मग नवरा आणि बायको दोघे हसायला लागतात.
Posted in General, time pass | Tagged time pass | 2 Comments »
मागच्या आठवड्यात माझ्या कंपनी मध्ये ‘अनिल करमरकर’ यांचा saxophone या वाद्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम एकदम मस्त झाला.
saxophone हे जसे बासरी वाजवतात तसे तोंडातून फुंकरने वाजवतात, infact बऱ्याचदा फुंकर ताकदीने द्यावी लागते.
अनिल करमरकर यांचे वय जवळ पास ५८ असेल, या वयातही ते इतक्या ताकदीने आणि इतका सुंदर saxophone वाजवतात, या अनुषंगाने कार्यक्रमादरम्यान ‘वय’ विषयावर दोन किस्से सांगण्यात आले.
पहिला म्हणजे अनिल करमरकर यांचे गुरु सध्या वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा सुंदर saxophone वाजवतात. त्यांच्या ७५ व्या वाढदिवशी एका व्यक्तीने कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर म्हंटले होते, “हे वयाच्या ७५ व्या वर्षी देखील इतका सुंदर saxophone वाजवतात. आपण पहिले म्हणजे ७५ जगू का या बद्दल शंका आणि जगलोच तर तेव्हा वाढदिवसाला saxophone पकडायचे तर सोडाच पण केक वरच्या मेणबत्त्या विझवायला तरी तोंडातून फुंकर मारता आली तरी नशिबाच म्हणावे लागेल.” 🙂
दुसरा किस्सा म्हणजे, महर्षी कर्वे यांच्या ९९ व्या वाढदिवसाला एक तरुण पत्रकार त्यांची मुलाखत घ्यायला गेला होता, मुलाखत घेवून झाल्यावर जाताना तो म्हणाला, “महर्षी मी आशा करतो कि तुमच्या १०० व्या वाढदिवसाला देखील मला तुमची मुलाखत घ्यायला मिळेल”. त्यावर महर्षी लगेच म्हणाले, “का रे तुला काय झाले आहे, चांगला तरणा तर दिसतोयस”. 🙂
Posted in जीवन Life, General | Tagged General | 1 Comment »
सकाळी कंपनीमध्ये आल्याआल्या नेहमीप्रमाणे आउट लुक उघडलं तर एका नवीन फीचरची ‘बग’ माझ्या नावावर assign झाल्याची मेल आली होती. आणि एकदम एक पूर्वीची गोष्ट आठवली.
मी माझी पहिली कंपनी जॉईन करून ५-६ महिने झाले होते. कंपनी तशी बाहेरची होती. इथे भारतामध्ये शंबर सव्वाशे लोक होते. माझ्या विंग मध्ये जवळ पास ३५-४० लोक बसत असतील. वातावरण देखील तसे खेळीमेळीचे होते. त्यामुळे अनेकदा लहान सहाण गोष्टींसाठी ई-मेल वगेरे पाठवायची तशी गरज भासायची नाही, एका हाकेवरच गोष्टी व्हायच्या. 🙂
असेच एका दिवशी एका नवीन फीचरविषयी टीम सोबत चर्चा करून आम्ही पुन्हा आपापल्या cubicle मध्ये आलो. ५-१० मिनिट होताच तोवर पलीकडच्या टेस्टिंग टीममधल्या एका मुलाने, “अरे वेणू एक बग मिल गया रे”, म्हणून त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आम्हाला (दुसऱ्या एका जुन्या फीचरचा) बग कळवला. त्यावर माझा टीममेट, “क्या रे, अभी तो फीचर discuss किया हे, बग आना शुरू भी हो गये”. आणि काय दोन मिनिट सगळी विंग हसत होती.
Posted in time pass | Tagged time pass | Leave a Comment »
लहानपणापासून आईला नेहमी घरीच पाहिलेले असते, त्यामुळे आईसारखीच घर सांभाळणारी हे उत्तर चटकन पुढे येते. पण लगेच पुण्यात राहण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची यादी पुढे येते. एकटे असतो तेव्हा मित्रांबरोबर रूम शेअर करून राहत असतो, लग्नानंतर मात्र वेगळा flat हवा. नवीन घ्यायचा म्हणाले तर EMI आला, भाड्याचा म्हटलं तर महिन्याचे भाडे आले. बर flat झाला मग तो मोकळा ठेवून कसा चालेल. फर्निचर, TV, फ्रीज, वाशिंग मशीन आले. नवीन (काय आणि जुनी काय) बायको म्हणजे तिची हौस-मौज आली. साड्या, ड्रेस, चपला, सुंदर दिसण्याचे साहित्य, (अनेक गरज नसलेल्या वस्तू), शोप्पिंग, सिनेमा, नाटक, बाहेरचे जेवण, traveling हे ना ते शंभर शे साठ खर्च आले. आता हे सगळे खर्च तराजूच्या एका पारड्यात आणि दुसऱ्या पारड्यात आपली salary ठेवली तर ते खर्चाचे पारडे धापकण खाली जाते. मग आपणच आपली समजूत काढतो, म्हणतो पूर्वीचा जमाना वेगळा होता. बाबांच्या पगारात घर आरामात चालायचे, पण आता तसे नाही. आपल्या पगारात आख्खे घर काय नुसता आपला आणि आपल्या बायकोच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा खर्च निघानेपण अवघड. आपल्याला तर नोकरी करणारीच बायको बरी.
असे आपले मत पक्के होते इतक्यात आपण flashback मध्ये जातो.
सकाळी आपण हंतरुणात लोळत असतो. सकाळी (लवकर?) उठायला गजराच्या घड्याळाची गरज लागत नाही. आईच उठवते. तोंड धुवून येतो तोवर समोर गरम गरम चहा तयार. अंघोळीसाठी पाणी काढून ठेवलेच असते. अंघोळ झाली कि नाश्ता तयार. कपडे धुवून इस्त्री करून ह्यान्गरला लटकत असतात, ते घातले कि निघालो बाहेर हुंदडायला. लहान पणापासून हीच सवय असते (बहुतेक जणांना). आणि लगेच आईचे ते शब्दही आठवतात, “अरे दादू स्वतःची कामे स्वतः करायला शीक, नंतर लग्न झाल्यावर बायको नाही करणार हो ही सगळी कामे.” पण लहानपणी आपणवेगळ्याच जगात असतो. तेव्हा आपल्याला नेहमी वाटते आई जशी बाबांची सगळी कामे करत आली आहे तशी आपली बायकोही करेल (असा होणाऱ्या बायकोविषयी गोड गैरसमज असतो).
flashback मधून आज मध्ये आल्यावर नोकरीवाल्या बायको वीषयी पुन्हा ना ना सवाल पुढे येवून थांबतात.
पुन्हा आता त्याच प्रश्नावर आपण आले असतो. “नोकरी करणारी” की “घर सांभाळणारी”?
नोकरी करणारी बायको उठवेल का आपल्याला सकाळी लवकर? चहा, आंघोळीचे पाणी, नाष्टा, इस्त्रीचे कपडे सगळं काही मिळेल का आयत तयार?
संध्याकाळी ऑफिस मधून थकून आल्यावर मिळेल का गरम गरम चहा आणि कांदा भाजी? (अधिक माहितीसाठी माझ्या या पोस्त मध्ये पहिला para पहा)
आईसारखे लज्जतदार खाणं बनवेल का ती? आईने जशी माझी, माझ्या बहिणींची काळजी घेतली, जे संस्कार आमच्यावर केले ते करेल का ती आमच्या मुलांवर?
‘मी नोकरी करते’ हा attitude (टेंभा) (सगळ्या मुलींमध्ये नाही पण काही… का बहुतेकीत :-)) असल्यास आपल्या घरातल्यांशी, नातेवाईकांशी आणि हो आपल्याशी जमवुन घेईल का ती ? आई बाबांना सांभाळेल का ती?
हे ना ते अनेक प्रश्न डोक्यावर तांडव घालतात.
पण थोडा विचार केला तर समजते बऱ्याच गोष्टी आता बदलल्या आहेत. पूर्वी घराची जबाबदारी आईवर आणि बाहेरची बाबांकडे असायची. अशी सरळ लक्ष्मणरेषाच होती. आई बाहेरच्या गोष्टीत लक्ष घालत नसे, आणि बाबाही घराच्या बाबतीत लुडबुड करत नसत. जवळपास प्रत्येक घरी हेच चित्र होते.
पण आता मात्र तसे नाही, काळ बदलला आहे. आज मी स्वतः माझ्या होणाऱ्या बायकोने बाहेर नोकरी करावी असे म्हणतो, मग साहजिकच मला तिच्याकडून आईने केलेल्या सगळ्या कामांची अपेक्षा करता येणार नाही. ती जर बाहेरच्या कामात लक्ष घालत असेल तर साहजिकच मला घराच्या कामात (जमेल तितके) लक्ष द्यावे लागेल. जशी ती घराची आर्थिक घडी बसवायला मला मदत करते तशी मला तिला घराची घडी बसवायला मदत करावी लागेल.
अन्यथा तिच्याकडून किती म्हणून अपेक्षा ठेवायची मी? बाहेर नोकरीपण कर आणि घरीची पण सगळी कामे कर. मला मस्त मस्त जेवण पण बनवून घाल, तोंडातून पडल्या पडल्या मला गोष्टी आणून दे. आणि मी काय करणार? नुसते हुकम सोडणार? ….याला काहीच अर्थ नाही.
थोडक्यात काय तर थोडी फार adjustment केली तर कुठे तरी गोष्टी सोप्या होतील असे वाटले. लग्नानंतर सुखी आयुष्याचा हाच मूलमंत्र आहे म्हणे.
हं आता ‘ती’चा देखील हाच दृष्टीकोन (attitude) असेल तर मग’च’ गोष्टी खरच सोप्या होतील.
पाहू काय होते ते?
Posted in लग्न | Tagged लग्न | 10 Comments »